जगभरातील संशोधक सध्या करोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आणि करोनाचा खात्मा करण्यासाठी कोणतं औषध परिणामकारक ठरेल यासंदर्भातील शोध घेत आहे. जगातील १०० हून अधिक संस्थांमध्ये याबद्दल सध्या संशोधन सुरु आहे. असं असतानाच कॅनडामधील एका विद्यापीठाने गांजाचा वापर करुन करोनाचा सर्वाधिक धोका असणाऱ्या वयोगटातील आणि गंभीर आजार असणाऱ्यांना वाचवता येऊ शकतं असा दावा केला आहे. या संशोधनानुसार शरीरामधील रोगप्रतिकारशक्ती आणखीन सक्षम करण्यासाठी गांजाचं सेवन करणं फायद्याचं ठरतं. करोना तसेच इतर गंभीर आजार असणाऱ्या व्यक्तींवर गांजाचा अंश असणाऱ्या औषधांचा वापर करण्यास सुरुवात करता येईल असंही या अभ्यास म्हटलं आहे.

नक्की वाचा >> भारतातील करोना लसीकरणात कंडोम बनवणारी कंपनी बजावणार महत्त्वाची भूमिका

Tirgrahi Yog In Mesh
१०० वर्षांनंतर सूर्य, शुक्र आणि गुरूची होणार युती! त्रिग्रही योगामुळे या राशीच्या लोकांच्या आयुष्यात होईल आनंदी आनंद
Why you must never drink fruit juice on an empty stomach
तुम्ही सकाळी उठल्या उठल्या फळांचा रस पिता का? उपाशीपोटी फळांचा रस का पिऊ नये? डॉक्टरांनी सांगितले कारण…
china people punished for not paying debt
जीवनावश्यक वस्तू खरेदी करणेही कठीण; कर्ज फेडू न शकणाऱ्यांना चीन कशी शिक्षा करत आहे?
Vasai Virar
शहरबात… वन्यप्राण्यांच्या अधिवासांवर अतिक्रमणाचे परिणाम

डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार कॅनडामधील लेथब्रिज विद्यापिठामधील संशोधकांच्या एका गटाने दावा केला आहे की मानवी शरीरामधील रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्याने शरीरामध्ये ‘साइटोकाइन स्टार्म’ नावाची प्रक्रिया सुरु होते. यामुळे शरीरामधील निरोगी पेशींवरही परिणाम होतो. करोनाचा संसर्ग झालेल्या आणि इतर आजार असलेल्या अनेक रुग्णांचा याच कारणामुळे मृत्यू झाला आहे.

गांजाच्या पानांमध्ये आढळणारं तत्व या साइटोकाइन स्टार्मला थांबवू शकतं. साइटोकाइन स्टार्म निर्माण होण्यासाठी इंटरलुकीन-६ (interleukin-6 म्हणजेच IL-6) आणि ट्युमर नेसरोसीस फॅक्टर अल्फा (Tumour necrosis factor alpha म्हणजेच TNF-a ) ही दोन रसायनं कारणीभूत असतात. याच रसायनांचे प्रमाण गांजामधील तत्वाच्या मदतीने कमी करता येतं, असं संशोधकांनी म्हटलं आहे.

करोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव सुरु झाल्यापासूनच जगभरातील अनेक संशोधक साइटोकाइन स्टार्मचा प्रभाव कमी करण्यासाठी काय करता येईल याबद्दल संशोधन करत होते. एखादा विषाणू शरीरामधून नष्ट करण्यात आल्यानंतरही ही प्रक्रिया सुरु असते. यामुळे अक्यूट रेस्पिरेट्री डिस्ट्रेस सिंड्रोम म्हणजेच एआरडीएसचा त्रास होऊ शकतो. या एआरडीएसमुळे मृत्यूही ओढावू शकतो. यामुळे लंग फ्रायब्रेसिसचा त्रासही होऊ शकतो. लंग फ्रायब्रेसिसमध्ये फुफ्फुसांच्या पेशी खराब होऊन फुफ्फुसं निकामी होतात.

नक्की वाचा >> Corona Vaccination : कर्मचाऱ्यांचे लसीकरण करणार देशातील ‘या’ बड्या कंपन्या; लस खरेदीसाठी हलचाली सुरु

कॅनडामधील लेथब्रिज विद्यापिठामधील संशोधकांनी गांजामधील २०० वेगवेगळ्या स्ट्रेन्सचा अभ्यास केला. त्यापैकी सात स्ट्रेनवर त्यांनी सविस्तर संशोधन केलं. हे संशोधन ‘रिसर्च स्केयर’मध्ये प्री-प्रिंट करण्यात आलं आहे. यामध्ये तीन महत्वाचे स्ट्रेन संशोधकांना सापडले असून ते साइटोकाइन स्टार्मवर परिणामकारक ठरतील असं सांगितलं जात आहे. या स्ट्रेनला नंबर फोर, नंबर एट आणि नंबर फोर्टीन अशी नाव देण्यात आली आहेत. आता या स्ट्रेनचा वापर करोनाचा संसर्ग झाल्याने प्रकृती चिंताजनक असणाऱ्या आयसीयूमधील रुग्णांवर करण्याचा विचार केला जात आहे.