News Flash

उत्तराखंडमध्ये चार धाम यात्रेला परवानगी, वाचा कोण जाऊ शकेल?

उत्तराखंड सरकारने चार धाम यात्रा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि सरकारचे प्रवक्ते सुबोध उनियाल यांनी ही माहिती दिली.

उत्तराखंडमध्ये चार धाम यात्रेला परवानगी ( photo Financial express)

देशातील करोना संसर्गाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. अनेक राज्यांमध्ये अनलॉक प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. तर, करोना परिस्थिती पाहून निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथिल केले जात आहेत. दरम्यान, उत्तराखंड सरकारने चार धाम यात्रा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि सरकारचे प्रवक्ते सुबोध उनियाल यांनी ही माहिती दिली. तसेच करोना परिस्थिती लक्षात घेता राज्यात २२ जूनपर्यंत कर्फ्यू ठेवण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. मंगळवारी (१५ जून) सकाळी ६ वाजता कर्फ्यूचा कालावधी संपेल, असे उनियाल यांनी सांगितले.

उनियाल म्हणाले की, या कालावधीत जुन्या प्रमाणित कार्यप्रणाली (एसओपी) काही बदलांसह कायम राहतील. ज्या जिल्ह्यात चारधाम आहेत. त्या जिल्ह्यातील रहिवाशांना निगेटिव्ह आरटीपीसीआर कोविड चाचणी अहवालासह मंदिरात जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.

“आरटीपीसीआरच्या निगेटिव्ह अहवालामुळे चमोली जिल्ह्यातील रहिवासी बद्रीनाथ धाम, रुद्रप्रयाग जिल्ह्यातील केदारनाथ आणि उत्तरकाशी जिल्ह्यातील गंगोत्री आणि यमुनोत्रीचे दर्शन घेतील. लग्नात आणि अंत्यसंस्कारात येणाऱ्या लोकांची संख्या २० वरून ५० करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. लग्नाला उपस्थित राहणाऱ्यांसाठी आरटीपीसीआर कोविड चाचणी अहवाल अनिवार्य आहे”, अशी माहिती उनियाल यांनी दिली.

हेही वाचा- राम जन्मभूमी जमीन खरेदी भ्रष्टाचार; ट्रस्टनं आरोप फेटाळले, केला खुलासा…

सुबोध उनियाल म्हणाले, याशिवाय आठवड्यात पाच दिवस मिठाईचे दुकानेसुद्धा खुले राहतील. दुकानदारांनी मिठाई खराब होत असल्यामुळे सरकारने हा निर्णय घेतला. कर्फ्यू कालावधीत टेंपो आणि ऑटो सूरु राहतील. महसूलची प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी २० जणांच्या मर्यादित संख्येत महसूल न्यायालये सुरू करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

 ७२ दिवसांमधल्या सर्वात कमी करोना बाधितांची नोंद

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या दिलेल्या माहितीनुसार देशात सलग सातव्या दिवशी १ लाखांपेक्षा कमी रुग्णांची नोंद झाली आहे. देशात एकूण सक्रिय रुग्णांची संख्या १० लाखांपेक्षा कमी झाली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासात ७०,४२१ नवीन करोनाचे रुग्ण आढळले आणि ३९२१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर १ लाख १९ हजार ५०१ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. म्हणजेच, आठवड्याच्या शेवटी ५३,००१ सक्रिय रुग्ण कमी झाले आहेत. यापूर्वी ३० मार्च  रोजी ५३,४८० रुग्णांची नोंद झाली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 14, 2021 4:33 pm

Web Title: char dham yatra to start in uttarakhand read who can go srk 94
Next Stories
1 देशात लसीकरणानंतर ४८८ जणांचा मृत्यू; तर २६ हजार २०० जणांमध्ये दिसले गंभीर Side Effects
2 तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी केला सहा वर्षांच्या नातवासमोर सामूहिक बलात्कार; महिलेची सुप्रीम कोर्टात धाव
3 मोदींनी जगाला दिलेली शिकवण आधी स्वत: अंमलात आणावी – पी चिदंबरम
Just Now!
X