देशात करोना बाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. एका दिवसात करोनाच्या सर्वाधिक रुग्णांची आणि बळींची नोंद मंगळवारी झाली. देशात गेल्या २४ तासांत ३,८७५ नवे रुग्ण आढळले असून, १९४ करोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे देशातील करोना रुग्णांची संख्या ४६,७११ तर, एकूण मृतांची संख्या १,५८३ झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य सहसचिव लव अगरवाल यांनी दिली.
महाराष्ट्रात करोनाचे ८४१ नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर २४ तासात ३४ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्राची रुग्णसंख्या १५ हजार ५२५ इतकी झाली आहे. मुंबईची रुग्णसंख्या ९ हजार ७०० च्या पुढे गेली आहे तर महाराष्ट्रातली रुग्णसंख्या ही १५ हजार ५०० च्या पुढे गेली आहे. महाराष्ट्रासाठी ही चिंता वाढवणारी बातमी आहे.
पुणे शहरात दिवसभरात ८६ करोनाबाधित रुग्ण आढळून आले. त्यामुळं जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या २०२९ रुग्ण संख्या झाली आहे. तर आज सात करोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आजअखेर ११८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. १४ दिवसानंतर रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने ५२ जणांना घरी सोडण्यात आले आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात आज आणखी तीन जण करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या १४५ वर पोहचली आहे. तर आत्तापर्यंत ६३ जणांना घरी सोडण्यात आलं आहे. पैकी आज एकाला डिस्चार्ज देण्यात आला. यातील पॉझिटिव्ह रुग्ण हे मोशी आणि मोहननगर परिसरातील आहेत.
शहरात उद्भवलेल्या करोना महामारीचा मुकाबला करताना अधिकारी-कर्मचारी अपुऱ्या संरक्षक साधनांसह जोखमीची अत्यावश्यक कामे करीत असतांना करोनापासून बचाव करण्यासाठी असलेले संरक्षक साधने त्यांना वाटप न करता तसेच गोदामात पडून असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महापालिकेच्या भांडारपाल विभागाच्या या सावळ्या गोंधळामुळे शहरात संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे. सविस्तर वृत्त वाचा
सोलापुरात बुधवारी करोनाची बाधा झालेले आठ नवे रूग्ण आढळून आले. यातील एका पोलीस हवालदाराचा मृत्यू झाला आहे. करोनाबाधा झालेल्यांपैकी तीन पोलिसांचा समावेश आहे. आतापर्यंत करोनाबाधित रूग्णांची संख्या १५३ तर मृतांची संख्या दहापर्यंत गेली आहे. आज बुधवारी आढळून आलेले सर्व रूग्ण पुरूष असून बहुसंख्य दाट लोकवस्त्यांसह झोपडपट्टी परिसरात राहणारे आहेत. सविस्तर वृत्त वाचा
महाराष्ट्रातील परवाना धारक वाईन शॉप्समध्ये ४३ कोटी ७५ लाख रुपयांची मद्यविक्री झाल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. राज्य शासनाने ३ मे २०२० पासून लॉकडाउन कालावधीत सीलबंद मद्यविक्री करण्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहे आहेत. या तत्त्वांना अनुसरुन राज्यातील ३३ जिल्ह्यात (गडचिरोली, चंद्रपूर आणि वर्धा वगळून) काही जिल्ह्यांमध्ये परवानाधारक जिल्ह्यांमध्ये सशर्त विक्री सुरु आहे तर काही जिल्ह्यांमध्ये मद्यविक्री बंद आहे. दरम्यान सशर्त संमती दिल्यानंतर आत्तापर्यंत १२.५० लाख लिटर मद्यविक्री झाली आहे. म्हणजेच आत्तापर्यंत ४३ कोटी ७५ लाखांची मद्यविक्री देशभरात झाली आहे अशी माहिती दिलीप वळसे पाटील यांनी दिली.
नवी मुंबईत बुधवारी नव्या ४५ करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे शहरातील एकूण रुग्णांची संख्या ४४० वर पोहोचली आहे.
मालेगावात आज दिवसभरात ३२ नवीन करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. याशिवाय आणखी दोन आधीच्या बाधित रुग्णांची दुसऱ्यांदा घेतलेली चाचणी सकारात्मक आली आहे. नवीन बाधित रुग्णांमध्ये दाभाडी येथील एकाचा समावेश आहे.मालेगाव तालुक्यातील बाधितांची संख्या आता ४४१ झाली आहे.
रायगड जिल्ह्यातील करोना बाधितांचा आकडा १६७ वर पोहोचला आहे. जिल्ह्यात १२ नव्या करोना बाधितांची भर पडली आहे. यात पनवेल मनपा हद्दीतील ६ पनवेल ग्रामीणमधील ५ तर महाडमधील एका रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यातील ५८ जणांनी करोनावर मात केली आहे. तर १०५ जणांवर मुंबई, नवीमुंबई आणि पनवेल येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
वसईमध्ये आज नव्याने १० करोनाबाधित रुग्ण आढळले. यामध्ये नालासोपाऱ्यातील करोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील ९ रुग्ण आहेत, एक विरारमधील रुग्ण आहे. त्यामुळे वसई-विरार महापालिका हद्दीतील एकूण रुग्णांची संख्या १७० वर पोहोचली आहे. तर आजवर ९० रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर ७० रुग्णांवर अद्याप उपचार सुरु आहेत. त्याचबरोबर १० जणांचा मृत्यू झाला आहे.
करोना टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वत्र दारूची दुकानं सुरू केल्याने सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी राज्य सरकार अतार्किक असल्याची टिका केली होती. त्यांच्या या टिकेला पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी उत्तर दिले आहे. दारूबंदी या विषयावर डॉ. बंग यांनी आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सल्ला देऊन देशातच दारूबंदी घडवून आणावी अशी विनंती केली आहे. सविस्तर वृत्त वाचा
ठाण्यातही अत्यावश्यक सेवा म्हणजे दूध डेअरी, किराणा मालाची दुकानं आणि मेडिकल्स हे वगळता सर्व दुकानं बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वाईनशॉप्सही बंद करण्यात आली आहे. लॉकडाउनच्या काळात दुकानं उघडण्याची मुभा दिली तरीही सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नसल्याने शहरातील संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळून इतर दुकानं बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त विजय सिंघल यांनी हे आदेश दिले आहेत.
चंद्रपूरमधील करोनाबधित रुग्णाचे कुटुंबीय आणि सदनिकेतील ३० जणांची करोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याने जिल्हा प्रशासनाने करोना रुग्णाची पुन्हा करोना चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या १४ आणि १५ मे रोजी ही चाचणी होणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एकमेव पॉझिटिव्ह ठरलेल्या रुग्णाची प्रकृती स्थिर आहे.
करोना व्हायरसनं देशात तसंच राज्यात थैमान घातलं आहे. देशात, राज्यात करोनाग्रस्तांचा आकडा वाढत आहे. दरम्यान एका दिवसता महाराष्ट्रात तब्बल १ हजार २३३ नवे रुग्ण समोर आल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागानं दिली आहे. तर दिवसभरात ३४ करोनाग्रस्तांचा मृत्यू झाल्याचंही सांगण्यात आलं आहे. राज्यात करोनाग्रस्तांची संख्या आता १६ हजार ७५६ वर पोहोचली आहे.
पालघर ग्रामीण रुग्णालयात शिकाऊ (इंटर्न) डॉक्टरला करोनाचा संसर्ग झाल्याचे उघडकीस आले आहे. एप्रिल महिन्याच्या मध्यावर पालघरमधील इंटर्नशिप संपवून हा इंटर्न डॉक्टर मुंबईतील जोगेश्वरी येथे राहण्यास गेला होता. मात्र, पालघर येथील आपल्या वास्तव्यादरम्यान निर्माण झालेल्या मैत्रीसंबंध टिकवण्यासाठी हा डॉक्टर पालघर येथे टाळेबंदीच्या काळात येऊन गेल्याची माहिती पुढे आली आहे.
टाळेबंदीमुळे वर्धा आणि चंद्रपूरमध्ये अडकलेले हजारो परप्रांतीय मजूर आज विशेष रेल्वे गाडीने वर्ध्यातून त्यांच्या बिहार राज्याकडे रवाना झाले. यावेळी पालकमंत्री सुनील केदार, खासदार रामदास तडस, आमदार रणजीत कांबळे यांनी या मजुरांशी रेल्वे स्थानकावर संवाद साधत त्यांच्या सुखरूप प्रवासाच्या शुभेक्षा दिल्या. सविस्तर वृत्त वाचा
वसई विरार शहरात बुधवारी १० नव्या रुग्णांची नोंद झाली. हे सर्व रुग्ण नालासोपारा येथील असून करोनाग्रस्त रुग्णांच्या संपर्कातील आहेत. यामुळे शहरातील रुग्णसंख्या आता १७० एवढी झाली आहे. वसई-विरार शहरातील सामान्य नागरीक करोनाबाधित सापडत नसून मुंबईत ये-जा करणाऱ्या आणि करोनाग्रस्तांच्या संपर्कातील लोकांना करोनाची लागण होण्याचे सत्र सुरूच आहे. या दहा रुग्णांमध्ये ४ महिला, १० वर्षांची बालिका तसेच ५ पुरूषांचा समावेश आहे. आता पर्यंत ९० जण करोनामुक्त झाले असून ७० जण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.
पुणे जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्र वगळता सर्व भागांमध्ये आता पेट्रोल-डिझेलचा पूर्वीसारखाच पुरवठा करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आता आपल्या वाहनांसाठी पेट्रोल-डिझेल मिळू शकणार आहे. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी याबाबत सुधारित आदेश जारी केला आहे. सविस्तर वृत्त वाचा
देशभरात पसरलेल्या करोना विषाणूचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने लॉकडाउनचा टप्पा १७ मे पर्यंत वाढवलेला आहे. राज्यातील अनेक महत्वाच्या शहरांमध्ये करोना बाधित रुग्ण सापडत आहेत. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत अनेक करोना बाधित रुग्ण सापडले आहेत. रुग्णांच्या वाढत्या संख्येवर आळा घालण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेने यावर नवीन तोडगा काढला होता. महापालिका क्षेत्रात वास्तव्यास असणाऱ्या व कामानिमीत्त मुंबईत ये-जा करणाऱ्या शासकीय, खासगी कर्मचाऱ्यांना मुंबईला जाण्यास मनाई करण्यात आली होती. परंतु बुधवारी पालिकेनं पत्रक काढून या निर्णयाला तुर्तास स्थगिती दिली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात ८ जण करोना बाधित आढळले आहेत. यात बहुतांश तरुणांचा समावेश आहे. तर आज एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. संबंधित महिला पुण्यातील शिवाजी नगर परिसरातील आहे. करोनाबाधितांची एकूण संख्या १४२ वर पोहचली असून ६२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरातील आणि शहराबाहेर एकूण सहा जणांचा मृत्यू करोनामुळे झाला आहे. आज आढळलेले करोना पॉझिटिव्ह रुग्ण हे मोशी, पिंपळे गुरव, चिंचवड या परिसरातील आहेत.
करोना व्हायरस महामारीचे परिणाम आता हळूहळू दिसायला सुरूवात झाली असून बहुतांश देशांमध्ये लॉकडाउन असल्याने अनेक कंपन्यांना मोठा तोटा सहन करावा लागतोय. हॉटेल आणि ट्रान्सपोर्ट व्यवसायाशी निगडीत कंपनी Airbnb Inc ने जवळपास 1900 कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी केले आहे. करोना व्हायरसमुळे आर्थिक संकटातून जात असल्याने कंपनीने आपल्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी 25 टक्के कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय घेतलाय. (वाचा सविस्तर)
अमेरिकेतील सर्व व्यवहार सुरु करा अशी भूमिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मांडली आहे. डोनाल्ड ट्रम्प सातत्याने अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा मुद्यावर भर देत आहेत. ‘करोना व्हायरसमुळे जास्त मृत्यू झाले किंवा नागरिक आजारी पडले तरी अमेरिकन जनतेने त्यांचे दैनंदिन कामकाज सुरु करावे’ असे विधान डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे. वाचा सविस्तर बातमी.
जम्मू-काश्मीरच्या अवंतिपोरामध्ये बुधवारी झालेल्या चकमकीत जवानांनी हिजबुल मुजाहिद्दीनचा टॉपचा कमांडर रियाज नायकूचा खात्मा केला आहे. दक्षिण काश्मीरमधील अवंतिपोरमध्ये सुरक्षा पथकं आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु होती. हिजबुलचा हा टॉपचा दहशतवादी कमांडर जाळयात सापडला होता. वाचा सविस्तर बातमी.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणखी एक करोनाबाधित रूग्ण सापडल्यामुळे कणकवलीचे आमदार नितेश राणे यांनी प्रशासनाला जबाबदार धरले आहे. नव्याने सापडलेला रुग्ण हा आंबा वाहतुकीतील चालक आहे. ‘सिंधुदुर्गमध्ये करोना नाही पण प्रशासनाच्या हलगर्जीपणमुळे अजून एक रुग्ण सापडला’ असे नितेश राणे यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे. वाचा सविस्तर बातमी.
करोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबादमध्ये करोना रुग्ण संख्याची संख्येत मागील काही दिवसांत झपाट्याने वाढ झाली असताना आज, शहरात 28 नव्या करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. परिणामी शहारतील करोनाबाधितांची एकूण संख्या 349 वर पोहचली आहे.
Aarogya Setu अॅपनंतर आता नीती आयोगाने ‘आरोग्य सेतू मित्र’ (AarogyaSetu Mitr)वेबसाइट लॉन्च केली आहे. या वेबसाइटद्वारे घरबसल्या लोकांना आरोग्य सेवा पुरवण्याचा उद्देश आहे. या वेबसाइटद्वारे नागरिकांना घरबसल्या वैद्यकीय सुविधा पुरवल्या जातील. AarogyaSetu Mitr या वेबसाइटवर तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला, ई-फार्मसी आणि होम लॅब टेस्ट यांसारख्या सेवा मिळतील. (वाचा सविस्तर)
सध्या फेस मास्क अत्यंत महत्वाचा आहे. करोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी चेहऱ्याला मास्क बांधणे आवश्यक आहे. पण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कदाचित याचा विसर पडला असावा. वाचा सविस्तर बातमी.
जगभरात थैमान घालणाऱ्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव देशात दिवसेंदिवस वाढत आहे. करोनाबाधितांची देशातील एकूण संख्या 49 हजार 391 वर पोहचली आहे. यामध्ये सध्या उपचार सुरू असलेले 33 हजार 514 रुग्ण, रुग्णालयातून उपचारानंतर सुट्टी देण्यात आलेले 14 हजार 182 जण व एक स्थलांतरित तसेच आतापर्यंत मृत्यू झालेल्या 1 हजार 694 जणांचा समावेश आहे.
जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील पम्पोर येथे सुरक्षा पथकं आणि दहशतवा्दयांमध्ये चकमक सुरु आहे. अवंतिपोराच्या शारशाली भागात लष्कराचे जवान आणि जम्मू-काश्मीर पोलीस पोहोचले आहेत.
राज्यात वेगाने पसरणाऱ्या करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. त्यांनी सर्व जिल्ह्यांच्या प्रमुख अधिकाऱ्यांसोबत व्हिडीओ क़ॉन्फरन्सिंगवरुन बैठक घेतली व ३१ मे पर्यंत राज्य करोनामुक्त करण्याचे आदेश दिले. वाचा सविस्तर बातमी.
लॉकडाउनमुळे राज्याच्या विविध भागात अडकलेल्या मजुरांची स्वगृही परतण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, यासाठी विशेष ट्रेन सोडण्यात येत आहे. पण काही राज्ये आता या मजुरांना स्वगृही घ्यायला तयार नाहीत. याच मुद्दावरुन शिवसेनेने आजच्या सामनाच्या अग्रलेखातून योगी सरकारला सुनावले आहे. वाचा संपूर्ण बातमी.
काही चक्रांची गती बदलणं अजून तरी कोणाला शक्य झालेलं नाही. म्हणजे एखाद्याकडे रग्गड पैसा आहे म्हणून त्याच्या कुटुंबीयांसाठी नऊ महिन्यांची गर्भावस्था कमी करता येते, असं काही होत नाही. किंवा महासत्ताधीश आहे म्हणून काही त्याला अमावास्या-पोर्णिमा यातलं अंतर कमी करता येतं असं नाही. म्हणजे काही काही गोष्टींना वेळ लागतो तो लागतोच. तो काही कमी करता येत नाही. वाचा संपूर्ण कोविडोस्कोप
मुंबईत जीवनावश्यक वस्तूंची दुकानं वगळता सगळी दुकानं बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी यासंदर्भातले आदेश दिले आहेत. यामधे मुंबईत मद्यविक्रीची घाऊक आणि किरकोळ दुकानं बंद राहतील असंही सांगण्यात आलं आहे. वाचा सविस्तर बातमी.
करोना उपाययोजना करताना केंद्र-राज्य सरकारमध्ये योग्य समन्वय आवश्यक असून चर्चेतून निर्णय घेतले गेले पाहिजेत. परंतु समन्वयाचा अभाव असल्यानेच गोंधळ उडाला. टाळेबंदीचा निर्णय नोटाबंदीसारखा अचानक लागू करण्याऐवजी आठवडाभराचा अवधी दिला असता, तर देशभरात लाखो मजूर व नागरिक अडकून पडले नसते, असे मत माजी मुख्यमंत्री व सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी ‘लोकसत्ता’तर्फे आयोजित वेबसंवादात बोलताना व्यक्त केले. वाचा सविस्तर बातमी.