प्रत्येक कॅलेंडर वर्षाच्या सुरूवातीला, आर्थिक वर्ष सुरु होण्यापूर्वी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया देशातील रोख वार्षिक गरजेनुसार चलन निर्मितीचा निर्णय घेत असते. यासाठी चलनात असणाऱ्या सर्व नोटा, नष्ट झालेल्या नोटा नोटांची संख्या आणि बदलले चलन याच्या आधारावर पतधोरण आखले जाते. खात्यात पुढील आर्थिक वर्षातील जीडीपी वाढ आणि महागाई यांचा अंदाज घेऊन पतधोरण आखण्यात येते. आरबीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने  इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या माहितीनुसार देशातील १९ क्षेत्रीय कार्यालयाकडून मिळालेल्या डेटाच्या आधारावर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पतधोरण ठरवत असते. व्यवहारात येणाऱ्या चलनाबाबत अर्थमंत्रालय आणि रिझर्व्ह बँक यांच्यामध्ये गुप्तता बाळगली जाते.

नोटांची सुरक्षा-

भारतीय रिझर्व्ह बँकेद्ववारे (आरबीआय) चलनी नोटा छापल्या जातात. नोटा छापण्यासाठी कापसापासून बनवण्यात आलेला कागद व विशिष्‍ट शाईचा वापर केला जातो. महाराष्ट्रातील नाशिक येथील करन्सी नोट प्रेस (सीएनपी) व मध्य प्रदेशातील होशंगाबाद पेपर मिलमध्ये या कागदाची निर्मिती केली जाते. विदेशातूनही कागद आयात करण्यात येतो. हौसंगाबादच्या कारखान्यातून ६ हजार मेट्रिक टन पर्यंत कागद मुद्रीत करणे शक्य आहे. तर म्हैसुरमध्ये १२ हजार मेट्रीक टन किंवा १६ अब्ज टीप तुकडे उत्पन्न केले जातात. नोटांच्या सुरक्षिततेसाठी नोटांची रचना, तीन प्रकारचे वॉटर मार्क, सुक्ष्म अक्षरे आणि सुरक्षा थ्रेड या दोन कारखान्यामध्ये निश्चित केले जाते.

नोटांची छपाई-
नोटांसाठी वापरण्यात येणारी शाई, विविध रंग प्रतिबिंब यासारख्या वैशिष्ट्यासह कागद सील बंद कंटेनमधून रवाना केला जातो. एका पेपर शीटमध्ये २००० रुपयाच्या जवळपास ४० नोटा छापल्या जातात. छपाई झाल्यानंतर त्याचे नोटांनुसार गठ्ठे बांधले जातात.  नोटांचे बंडल पॅक केले जाते. पॅकिंगनंतर नोटांचे बंडल विशेष सुरक्षेत रेल्वेने भारतीय रिझर्व्ह बॅंकेपर्यंत पोहोचवले जातात.

पैशाची आदान प्रदान-
रिझर्व्ह बँकेच्या १९ क्षेत्रीय कार्यालयातून   उच्च तंत्रज्ञान प्रणाली, सीसीटीव्ही कॅमेरे सुरक्षिततेच्या देखरेखीखाली व्यावसायिक, सहकारी आणि देशातील ग्रामीण बँका यांना चलन पुरवठा कण्यात येतो. रिझर्व्ह बँक दररोज होणाऱ्या  व्यवहारांची नोंद ठेवत असते.

एटीएममध्ये रक्कम भरणा-
एटीएममध्ये रक्कम भरण्याची प्रकिया अंत्यत जोखमीची आहे. सध्या अस्तित्वात असणाऱ्या २.२ लाख एटीएममध्ये मागणीनुसार रक्कम भरणा करण्यासाठी  ७ नोंदणीकृत वाहतूक कंपनीच्या जवळजवळ ८,८०० वाहने कार्यरत असून या वाहनाच्या माध्यमातून देशातील वेगवेगळ्या  एटीएमम मशीनमध्ये पैसा भरणा केला जातो.