पुढच्या शनिवारपासून अमेरिकेला जाणाऱ्या प्रवाशांना हँड बॅगमधून ३५० ग्रॅमपेक्षा जास्त पावडर सोबत नेता येणार नाही. मागच्या वर्षी ऑस्ट्रेलियात पावडरमधून स्फोट घडवण्याचा प्रयत्न उधळून लावण्यात आला होता. त्यामुळे अमेरिकेच्या वाहतूक सुरक्षा प्रशासनाने पुढच्या आठवडयापासून विमानातून ३५० ग्रॅमपेक्षा जास्त पावडरचा कुठलाही पदार्थ नेण्यावर बंदी घातली आहे.
सुरक्षा रक्षकांना कळलं नाही तर ते पावडरचा तो पदार्थ फेकून देणार त्यामुळे तपासणीसाठी जाणाऱ्या चेक इनच्या बॅगांमध्ये अशा वस्तू ठेवाव्यात असा सल्ला हवाई कंपन्या अमेरिकेला जाणाऱ्या प्रवाशांना देत आहेत. मुंबई आणि दिल्लीमधून एअर इंडियाची अनेक विमाने दररोज अमेरिकेच्या न्यूयॉर्क, शिकागो, वॉशिंग्टन, सॅन फ्रान्सिस्को या शहरांमध्ये जातात.
अमेरिकेतूनही नेवार्क ते दिल्ली आणि मुंबई अशी थेट विमाने आहेत. डेल्टा पुढच्यावर्षीपासून मुंबईसाठी विमान सेवा सुरु करणार आहे. पुढच्या आठडयापासून अमेरिकेला जाणाऱ्या प्रवाशांकडे ३५० ग्रॅमपेक्षा जास्त मसाले, टॅलकम किंवा कॉसमॅटिक पावडर असेल तर त्यांना तपासणी करावी लागणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 23, 2018 7:08 pm