News Flash

नागपुरातून चालत नाही सरकार, कधीच फोन करत नाही – मोहन भागवत

'आरएसएस आपल्या स्वयंसेवकांना एखाद्या विशिष्ट पक्षासाठी काम करण्यास सांगत नाही, मात्र राष्ट्रहितासाठी काम करणाऱ्यांना पाठिंबा देण्याचा सल्ला जरुर देतं'

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) कधीही आपल्या स्वयंसेवकांना एखाद्या विशिष्ट पक्षासाठी काम करण्यास सांगत नाही, मात्र राष्ट्रहितासाठी काम करणाऱ्यांना पाठिंबा देण्याचा सल्ला जरुर देतं असं आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी सांगितलं आहे. आरएसएसकडून आयोजित ‘भविष्य का भारत’ कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी बोलताना मोहन भागवत यांनी आरएसएस राज्यघटनेचा आदर करत असून, त्यानुसारच चालतं असंदेखील म्हटलं आहे.

‘आम्ही कधीही स्वयंसेवकांना एखाद्या विशिष्ट पक्षासाठी काम करण्यास सांगत नाही. मात्र राष्ट्रहितासाठी काम करणाऱ्यांना पाठिंबा देण्याचा सल्ला नक्की देतो. आरएसएस राजकारणापसून दूर राहतं, मात्र राष्ट्रहितावर त्यांची भूमिका असते’, असं मोहन भागवत बोलले आहेत.

‘आम्ही कधीही राज्यघटनेविरोधात जाऊन कोणतं काम केलेलं नाही. असं कोणतंच उदाहरण तुम्हाला सापडणार नाही’, असं मोहन भागवत यांनी यावेळी सांगितलं. यावेळी त्यांनी आरएसएस सरकारच्या कामकाजात दखल देत असल्याच्या आरोपांवर उत्तर देताना सांगितलं की, ‘अनेक लोक अंदाज लावतात की नागपुरातून फोन जातात. मात्र हे साफ चुकीचं आहे’. मोहन भागवत यांनी नागपुरातून सरकार चालत नसल्याचं सांगत आरोप फेटाळले आहेत.

‘केंद्रात काम करणारे अनेकजण स्वयंसेवक आहेत. प्रधानमंत्री, राष्ट्रपती आरएसएसचे स्वयंसेवक राहिले आहेत. या मुद्द्यांवर अनेकदा चर्चा होत असते. खरंतर हे सगळे माझ्या वयाचे आहेत, मात्र राजकारणात मला सीनिअर आहेत. संघ कार्याचा मला जितका अनुभव आहे, त्याहून जास्त त्यांचा राजकारणाचा अनुभव आहे. त्यांना राजकीय वाटचालीसाठी कोणत्या सल्ल्याची गरज नाही. आम्ही तो देऊही शकत नाही’, असं मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. सरकारच्या धोरणांवर संघाचा कोणताही प्रभाव नसल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 18, 2018 7:57 pm

Web Title: government not controlled by rss says mohan bhagwat
Next Stories
1 पायलटने असे वाचवले ३७० प्रवाशांचे प्राण
2 दिल्लीत सात वर्षांच्या चिमुरडीवर अमानुष अत्याचार, रक्तबंबाळ अवस्थेत पोहोचली घरी
3 जगातील पहिली हायड्रोजन ट्रेन आली ट्रॅकवर, ताशी वेग १४० किलोमीटर
Just Now!
X