केंद्र सरकारने पॅन कार्ड आधार कार्डला जोडण्याची मुदत आणखी वाढवली आहे. सरकारने पॅन कार्ड आधार कार्डला जोडण्याची मुदत आणखी सहा महिन्यांसाठी म्हणजे ३० सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे. त्यामुळे अजूनही ज्यांनी आपले पॅन कार्ड आधारशी जोडलेले नाही त्यांना आणखी एक संधी मिळाली आहे.

पॅन कार्ड आधार कार्डला जोडण्याची मुदत वाढवून देण्याची ही सहावी वेळ आहे. मागच्यावर्षी जून महिन्यात पॅन कार्ड आधारला जोडण्याची ३१ मार्च शेवटची तारीख असेल असे सरकारने जाहीर केले होते. एक एप्रिल २०१९ पासून इन्कम रिटर्न टॅक्स फाईल करताना आधार नंबर बंधनकारक करण्यात आले आहे.