News Flash

हाफिज सईदला बाळासाहेब ठाकरेंना धडा शिकवायचा होता- हेडली

सध्या हेडलीची टेलिकॉन्फरन्सद्वारे उलट तपासणी सुरू आहे.

David Headley : मी शिवसेना भवन आणि बाळासाहेब ठाकरे राहत असलेल्या मातोश्रीच्या परिसराची रेकी केली होती. मातोश्रीच्या प्रवेशद्वारावर असणाऱ्या सुरक्षारक्षकांबरोबरही मी त्यावेळी बोललो होतो.

हाफिज सईदला बाळासाहेब ठाकरेंना धडा शिकवायचा होता, असा खळबळजनक गौप्यस्फोट मुंबईवरील २६\११ हल्ल्याच्या सूत्रधारांपैकी एक असलेल्या डेव्हिड हेडली याने शनिवारी केला. सध्या हेडलीची टेलिकॉन्फरन्सद्वारे उलट तपासणी सुरू आहे. यावेळी त्याने अनेक खळबळजनक खुलासे केले.
मला बाळासाहेब ठाकरेंना धडा शिकवायचा आहे, असे हाफिज सईदने आपल्याला एकदा सांगितले होते. ही कामगिरी मी सहा महिन्यांत पूर्ण करू शकतो, असे मी त्यावेळी हाफिज सईदला सांगितल्याचे हेडलीने म्हटले. त्यासाठी मी शिवसेना भवन आणि बाळासाहेब ठाकरे राहत असलेल्या मातोश्रीच्या परिसराची रेकी केली होती. मातोश्रीच्या प्रवेशद्वारावर असणाऱ्या सुरक्षारक्षकांबरोबरही मी त्यावेळी बोललो होतो. याशिवाय, आपण टन्ना हाऊस येथील सीबीआयचे मुख्यालय आणि विधिमंडळाची रेकी केल्याचे हेडलीने चौकशीदरम्यान कबुल केले.
इशरत जहाँप्रकरणाबाबत लख्वीने मला सांगितले होते. मात्र, त्यापूर्वी वृत्तपत्रांच्या माध्यमातून मला याप्रकरणाची माहिती होती. मी भारतातील राष्ट्रीय तपास यंत्रणेला(एनआयए) इशरत जहाँबद्दल माहिती दिली होती. मात्र, त्यांनी या माहितीची नोंद का घेतली नाही, हे मला माहित नाही. मी एनआयएला लष्कर-ए-तोयबातील महिला शाखेविषयी सांगितले असल्याचे सांगत हेडलीने बचावपक्षाच्या वकिलांचा दावा फेटाळून लावला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 26, 2016 11:19 am

Web Title: hafiz saeed told me that bal thackeray needed to be taught a lesson
Next Stories
1 आयसिसचा दुसऱ्या क्रमांकाचा नेता ठार
2 काश्मीरमध्ये पुन्हा पीडीपी-भाजप सरकार
3 सत्तेत आल्यास बांगलादेशासोबतची सीमा बंद करू!
Just Now!
X