26 May 2020

News Flash

धक्कादायक! महिलेला हिप्नोटाइज करुन डिलिव्हरी एजंटचा बलात्काराचा प्रयत्न

ऑनलाइन शॉपिंग वेबसाइटच्या डिलिव्हरी एजंटने एका ४३ वर्षीय महिलेला हिप्नोटाइज करुन तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला.

ऑनलाइन शॉपिंग वेबसाइटच्या डिलिव्हरी एजंटने एका ४३ वर्षीय महिलेला हिप्नोटाइज करुन तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला. उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये सोमवारी सकाळी ही धक्कादायक घटना घडली. आरोपी वस्तू परत नेण्यासाठी महिलेच्या फ्लॅटवर गेला होता. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.

महिलेने नोंदवलेल्या तक्रारीनुसार आरोपीने रजिस्टरमध्ये भूपेंद्र पाल असे आपले नाव लिहिले होते. बॉक्स परत नेण्यासाठी सकाळी ११.२० च्या सुमारास तो महिलेच्या फ्लॅटवर पोहोचला. त्याने पाचही बॉक्स परत घेण्यास नकार दिल्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. महिलेने कस्टमर केअर विभागाकडे डिलिव्हरी बॉयची तक्रार केली. त्यानंतर तो निघून गेला अशी माहिती तक्रारदार महिलेच्या बहिणीने दिली.

काही वेळाने आरोपी पुन्हा महिलेच्या फ्लॅटवर पोहोचला. आपण सर्व बॉक्स परत नेण्यासाठी आलो आहोत असे त्याने सांगितले. कस्टमर केअर विभागाने दुसऱ्या दिवशी पिकअपची व्यवस्था केल्याने महिलेने ते बॉक्स त्याला देण्यास नकार दिला. दरम्यान डिलिव्हरी बॉयने आपल्याला हिप्नोटाइज केल्यामुळे शुद्ध हरपली असा आरोप महिलेने केला आहे.

जेव्हा मी शुद्धीवर आले तेव्हा डिलिव्हरी बॉय स्वत:चे कपडे उतरवत होता. मी मदतीसाठी आरडाओरडा केला व वॉशरुममध्ये पळाली. माझ्या हाताला वायपर लागल्यानंतर मी त्याने मारहाण सुरु केली. त्यामुळे डिलिव्हरी बॉयला पळ काढावा लागला असे पीडित महिलेने पोलिसांना सांगितले. महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी भूपेंद्र पाल विरोधात गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी बलात्काराच्या कलमाखाली आरोपी विरोधात गुन्हा नोंदवला आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 10, 2019 4:16 pm

Web Title: in noida delivery agent try to hypnotised woman molested dmp 82
Next Stories
1 बंगालमध्ये पतीसह गरोदर पत्नी आणि आठ वर्षाच्या मुलाची हत्या, पीडित RSS कार्यकर्ता असल्याचा भाजपाचा दावा
2 पीएमसी बँक घोटाळ्याशी केंद्र सरकारचा संबंध नाही : निर्मला सीतारामन
3 विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाच्या १५० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
Just Now!
X