पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी चार वाजता देशाला संबोधित करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नेमके कुठल्या विषयावर बोलणार याविषयी प्रचंड उत्सुक्ता आहे. एकाबाजूला पूर्व लडाखमध्ये नियंत्रण रेषेजवळ भारत-चीनमधील तणाव सर्वोच्च पातळीवर आहे तसेच दुसऱ्या बाजूला दररोज देशात करोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढतेय तसेच देश अनलॉक २ च्या दुसऱ्या टप्प्यात प्रवेश करणार आहे.

या परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमक्या कुठल्या विषयावर जनतेशी संवाद साधणार याबद्दल कुतूहल आहे. अनलॉक २ संदर्भात काल रात्रीच मार्गदर्शकतत्वे जारी झाली आहेत. करोना व्हायरसच्या या संकटकाळात मोदी सहाव्यांदा देशाला संबोधित करणार आहेत. काल रात्री टि्वटरवरुन पंतप्रधान कार्यालयाने मोदींच्या संबोधनाची माहिती दिली.

यापूर्वी पाच वेळा मोदींनी देशाला संबोधित केलेय
– १९ मार्च जनता कर्फ्यूची घोषणा
– २४ मार्च – २१ दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा
– ०३ एप्रिल – दीप प्रज्वलनाचे आवाहन
– १४ एप्रिल – लॉकडाउन २ ची घोषणा
– १२ मे – लॉकडाउन चारची घोषणा

काल रात्रीच केंद्र सरकारने टिकटॉकसह ५९ चिनी अॅपवर बंदीचा निर्णय जाहीर केला. गलवान खोऱ्यातील संघर्षात भारताचे २० जवान शहीद झाले होते. एकूणच चीन बरोबर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी काय भूमिका जाहीर करतात याबद्दल उत्सुक्ता आहे.