News Flash

Corona: केरळमध्ये लॉकडाउन पुन्हा वाढवला; आता राज्यात २३ मे पर्यंत निर्बंध

केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांची माहिती

सौजन्य- Indian Express

करोनाचा फैलाव रोखण्यासाठी अनेक राज्यांनी लॉकडाउनचा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. लॉकडाउनचा सकारात्मक प्रभाव पाहता केरळमध्ये पुन्हा एकदा लॉकडाउनचा अवधी वाढवण्यात आला आहे. केरळमध्ये आता लॉकडाउन २३ मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

केरळमध्ये लॉकडाउन १६ मे पर्यंत होता. मात्र करोनाचा फैलाव आणि रुग्णसंख्या कमी करण्यासाठी आता एका आठवड्यांचा लॉकडाउन वाढवण्यात आला आहे. राज्यातील स्थितीचा आढावा घेतल्यानंतर लॉकडाउन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तिरुवनंतपुरम, एर्नाकुलम, त्रिशूर आमि मलाप्पुरममध्ये ट्रिपल लॉकडाउन लावला जाणार आहे. या शहरांमध्ये करोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे.

केरळमध्ये गेल्या २४ तासात ३४,६९६ करोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर एका दिवसात ९३ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत १६ लाख ३७ हजार लोकांनी करोनावर मात केली आहे.

लपवाछपवी! गुजरातमध्ये दिवसाला १,७४४, तर ७१ दिवसात सव्वालाख लोकांचा मृत्यू

देशात गेल्या २४ तासात ३ लाख ४३ हजार १४४ नवीन रुग्ण आढळले. पण दिलासादायक वृत्त म्हणजे सर्वाधीक रुग्ण बरे होऊण घरी गेले आहेत. ३ लाख ४४ हजार ७७६ रुग्णांनी करोनावर मात केली. तर ४००० रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली. देशात करोनाची लागण होण्याचे प्रमाण दोन कोटींच्या पुढे गेले आहे. तर करोनामुळे मृत्यूंचा आकडा २.६२ लाखांच्या वर पोहोचला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 14, 2021 6:59 pm

Web Title: keral state extend lockdown till 23 rd may rmt 84
टॅग : Corona,केरळ
Next Stories
1 लपवाछपवी! गुजरातमध्ये दिवसाला १,७४४, तर ७१ दिवसात सव्वालाख लोकांचा मृत्यू
2 बारावीच्या परीक्षांबाबत CBSE चा अद्याप निर्णय नाही, विद्यार्थी-पालक संभ्रमात!
3 “प. बंगालमध्ये पोलीसच तृणमूलच्या कार्यकर्त्यांना घाबरतायत”, निकालांनंतर राज्यपाल वि. ममतादीदी वाद सुरू!
Just Now!
X