08 March 2021

News Flash

ममता बॅनर्जीवर कुमार विश्वास भडकले; म्हणाले, “दीदी इतकी क्रुरता”

...तेव्हा तुमचा आदर वाटायचा

पश्चिम बंगालमध्ये भाजपा आमदाराचा मृतदेह आढळून आल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. एका छताला टांगलेल्या अवस्थेत आमदारांचा मृतदेह होता. या घटनेवरून कवि कुमार विश्वास यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सरकार विरोधात संताप व्यक्त केला आहे.

पश्चिम बंगालमध्ये ही घटना घडल्यानंतर कुमार विश्वास यांनी एक ट्विट केलं आहे. “ममता दीदी इतकी क्रुरता! जेव्हा आपण डाव्यांविरोधात लढत होतात. त्यावेळी कार्यकर्त्यांच्या सरकारकडून होणाऱ्या हिंसक छळावर तुम्ही राग व्यक्त करायच्या. त्यामुळे तुमचा आदर वाटायचा. पण गेल्या काही वर्षात तुमच्या राजकीय असहिष्णुतेमुळे तुमच्याविषयी राग निर्माण करत आहे. हे खूप लाजिवाणे आहे,” असं कुमार विश्वास यांनी म्हटलं आहे.

पश्चिम बंगालमधील उत्तर दिनाजपूर येथील एका दुकानाच्या बाहेर आमदार देवेंद्र नाथ रे यांचा मृतदेह आढळला होता. ही हत्या असल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात आला आहे. घरापासून एक किमी अंतरावर देवेंद्र यांचा मृतदेह आढळला. देबेंद्र यांच्या कुटुंबातील एका सदस्याने केलेल्या दाव्यानुसार, काही लोक मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास घरी आले आणि त्यांना आपल्यासोबत घेऊन गेले होते. देवेंद्र यांच्या कुटुंबाने याप्रकरणी चौकशीची मागणी केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2020 8:53 pm

Web Title: kumar vishwas slam to mamata banerjee bmh 90
Next Stories
1 मे महिन्यातील CA च्या परीक्षा रद्द, ICAI ची सर्वोच्च न्यायालयात माहिती
2 “सचिन पायलट गांधी कुटुंबीयांच्या संपर्कात नाहीत, भाजपाशी सुरू आहे चर्चा”
3 Good news: बायोकॉननं आणलं करोनावर नवीन औषध; एक इंजेक्शन आठ हजार रुपयांना
Just Now!
X