01 March 2021

News Flash

TRP Scam : बार्कचे माजी सीईओ पार्थो दासगुप्ता यांचा कोर्टानं फेटाळला जामीन

दासगुप्ता यांचा कोठडीतील मुक्काम वाढणार

बहुचर्चित टीआरपी घोटाळ्यातील आरोपी ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काउन्सिलचे (बार्क) माजी सीईओ पार्थो दासगुप्ता यांचा जामीन अर्ज मुंबईतील सत्र न्यायालयाने फेटाळला. यामुळे दासगुप्ता यांचा कोठडीतला मुक्काम वाढणार आहे.

टीआरपी वाढविण्यासाठी बार्कचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थो दासगुप्ता आणि रिपब्लिक वाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्यात आर्थिक व्यवहार झाल्याचा दावा गुन्हे शाखेने मागच्या महिन्यात न्यायालयात केला होता.

दरम्यान, गेल्या महिन्यात पुण्यातून अटक केल्यानंतर पार्थो दासगुप्ता (वय ५५) यांना न्यायालयात हजर करण्यात आले. तसेच त्यांची पोलीस कोठडी वाढवून मिळावी, अशी मागणी गुन्हे शाखेने न्यायालयाकडे केली. त्यानुसार कोर्टाने त्यांची पोलीस कोठडी वाढवली होती. त्यावेळी गुन्हे शाखेने गोस्वामी-दासगुप्ता यांच्यात घडलेल्या आर्थिक व्यवहाराबाबतही माहिती दिली. टीआरपी वाढविण्यात सर्वतोपरी सहकार्य करत असल्याबद्दल पार्थो यांना अर्णब हे लाखांची लाच देत होते. त्यातून दासगुप्ता यांनी मोठय़ा प्रमाणात स्थावर मालमत्ता व दागिने विकत घेतल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती.

दरम्यान, अर्णब-दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअॅप चॅटिंगही समोर आले आहेत. यामध्ये अनेक कथित धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. यानुसार, अर्णब गोस्वामी यांना बालाकोट एअर स्ट्राईक आणि जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याबाबतची माहिती आधीच कळाली होती, हे देखील कथित स्वरुपात समोर आलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 20, 2021 3:52 pm

Web Title: mumbai sessions court rejects bail plea of former barc ceo partho dasgupta who is an accused in the trp scam aau 85
Next Stories
1 जम्मू-काश्मीर – एलओसीवर तीन दहशतवाद्यांचा खात्मा, चार जवान जखमी
2 “आम्ही आदेश देणार नाही,” शेतकऱ्यांचा मोर्चा रोखण्याची केंद्राची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली
3 ‘बेपत्ता’ जॅक मा यांच्यासंदर्भातील मोठी बातमी; चीनच्या सरकारी वृत्तवाहिनीने पोस्ट केला व्हिडीओ
Just Now!
X