राष्ट्रीय स्तरावरील कबड्डीपटूची रोहतकमधील रिथाल गावात दोन अज्ञातांनी गोळ्या घालून हत्या केली. हा संपूर्ण प्रकार घराजवळी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सुखविंदर सिंग असे या गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या कबड्डीपटूचे नाव आहे. मंगळवारी संध्याकाळी तो दैनंदिन सराव करून घरी परतत असताना त्याच्या घराजवळच दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींकडून त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. हल्लेखोरांनी अगदी जवळून सुखविंदरवर एका मागून एक गोळी झाडली. त्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रीकरणाच्या साह्याने पोलीस हल्लेखोरांचा तपास करीत आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 16th Mar 2016 रोजी प्रकाशित
राष्ट्रीय स्तरावरील कबड्डीपटूची गोळ्या घालून हत्या
हा संपूर्ण प्रकार घराजवळी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे
Written by वृत्तसंस्था
First published on: 16-03-2016 at 15:46 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: National level kabbadi player shot dead