प्रतिस्पर्धी पक्षातील एका ज्येष्ठ नेत्याने ‘आप’च्या उमेदवारांविरुद्ध खोटय़ा बातम्या पसरविण्याचा कट रचला असल्याचा आरोप ‘आप’चे नेते अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
विरोधी पक्षांना सध्या नैराश्याने ग्रासले असून त्यापोटीच ते अशा प्रकारचे प्रयत्न करीत आहेत. यापूर्वीही अनेकदा असे प्रयत्न करण्यात आले होते, असे केजरीवाल म्हणाले. गेल्या वर्षी निवडणुकीपूर्वी काही दिवस अगोदर आपच्या सहा उमेदवारांविरुद्ध खोटे स्टिंग ऑपरेशन दाखवून बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, असेही ते म्हणाले.
संग्रहित लेख, दिनांक 29th Jan 2015 रोजी प्रकाशित
‘आप’ उमेदवारांच्या बदनामीचा कट
प्रतिस्पर्धी पक्षातील एका ज्येष्ठ नेत्याने ‘आप’च्या उमेदवारांविरुद्ध खोटय़ा बातम्या पसरविण्याचा कट रचला असल्याचा आरोप ‘आप’चे नेते अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.
First published on: 29-01-2015 at 12:04 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Opposition plotting fake sting operations against aap candidates says kejriwal