कोणत्याही व्यक्तीची जात नाहीतर त्याचे कर्म नीच असतात, असे प्रत्युत्तर कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांना दिले आहे. आपण खालच्या जातीतून आल्यामुळेच प्रियांका गांधी यांनी आपले राजकारण नीच वाटते असल्याचे वक्तव्य नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केले होते. आपल्या वक्तव्यातून त्यांनी प्रियांका गांधींच्या आरोपांना उत्तरही दिले होते. मात्र, राहुल गांधी यांनी बुधवारी बहिणीची बाजू सावरून घेत मोदींवर पुन्हा एकदा टीका केली. आपल्या वक्तव्यातून मोदी कशा पद्धतीने दिशाभूल करीत आहेत, अशा आशयाचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.
एखाद्या व्यक्तीचा विचार नीच असतो. त्याचप्रमाणे राग आणि क्रोधाचा विचारही नीच असतो, असे सांगून राहुल गांधी म्हणाले, जास्तीत जास्त मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा आणि महिलांचे सक्षमीकरण व्हावे, याकडेच आपले लक्ष असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
संग्रहित लेख, दिनांक 7th May 2014 रोजी प्रकाशित
व्यक्तीची जात नाही, कर्म नीच असतात – राहुलबाबाचे मोदींना उत्तर
कोणत्याही व्यक्तीची जात नाहीतर त्याचे कर्म नीच असतात, असे प्रत्युत्तर कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांना दिले आहे.

First published on: 07-05-2014 at 11:25 IST
TOPICSनरेंद्र मोदीNarendra Modiराहुल गांधीRahul Gandhiलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha Election
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul counters modiss attack says actions low not caste