29 September 2020

News Flash

INX Media case: सीबीआयच्या विशेष कोर्टाकडून चिदंबरम यांच्या कोठडीत चार दिवसांनी वाढ

सुप्रीम कोर्टात सुनावणी होण्यापूर्वीच चिदंबरम यांना सीबीआयने अटक केल्याने त्यांच्या अटकपूर्व जामिनावर सुप्रीम कोर्टाने सुनावणीस नकार दिला.

(संग्रहित छायाचित्र)

आयएनक्स मीडिया प्रकरणात माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना सीबीआयच्या अटकेपासून संरक्षण देण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला असला तरी ईडीच्या अटकेपासून त्यांना उद्यापर्यंत (२७ ऑगस्ट) संरक्षण दिले आहे. दरम्यान, सीबीआयच्या विशेष कोर्टाने चिदंबरम यांच्या कोठडीत चार दिवसांनी वाढ केली आहे.

आयएनएक्स मीडिया प्रकरणात नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सीबीआयने तर आर्थिक घोटाळाप्रकरणी ईडीने चिदंबरम यांच्याविरोधात स्वतंत्र एफआयआर दाखल केले आहेत. त्यामुळे या दोन्ही प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी चिदंबरम यांनी सुरुवातीला दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली होती, ही याचिका फेटाळल्यानंतर चिदंबरम यांच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. मात्र, सुप्रीम कोर्टात सुनावणी होण्यापूर्वीच त्यांना सीबीआयने अटक केल्याने त्यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणीस सोमवारी सुप्रीम कोर्टाने नकार दिला.

दरम्यान, सुप्रीम कोर्टाने चिदंबरम यांना ईडीपासून उद्यापर्यंत (२७ ऑगस्ट) अटकेपासून संरक्षण दिले आहे. त्यामुळे त्यांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर सीबीआयच्या विशेष कोर्टाने चिदंबरम यांच्या कोठडीत ३० ऑगस्टपर्यंत वाढ केली आहे.

आयएनएक्स मीडिया भ्रष्टाचारप्रकरणी चिदंबरम यांना २१ ऑगस्ट रोजी त्यांच्या निवासस्थानावरुन सीबीआयने नाट्यमयरित्या अटक केली होती. सीबीआयबरोबरच ईडी देखील या प्रकरणाची चौकशी करीत आहे. त्यामुळे सीबीआयनंतर आता ईडी देखील चौकशीसाठी चिदंबरम यांच्यावर अटकेची कारवाई करु शकते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 26, 2019 5:44 pm

Web Title: special cbi court extends cbi remand of p chidambaram by 4 days in connection with inx media case aau 85
Next Stories
1 काश्मीर दौऱ्यावरून राहुल गांधीसह विरोधकांवर भडकल्या मायावती
2 काश्मीर द्विपक्षीय मुद्दाच, ट्रम्प यांच्यासमोर मोदींनी केलं स्पष्ट
3 अधीर रंजन यांनी स्वतःच्या पक्षाला जमिनीत गाडलं – राज्यपाल मलिक
Just Now!
X