01 March 2021

News Flash

VIDEO : चक्क माकडाच्या हाती बसचं स्टेअरिंग, ड्रायव्हर निलंबित

प्रवाशांचा जीव धोक्यात घातल्याप्रकरणी चालक निलंबित

माकडाच्या हाती कोलीत अशी म्हण तर प्रसिद्ध आहेच. पण आज कर्नाटकातल्या एका बस चालकाचा व्हिडीओ एएनआयने ट्विट केला आहे. या व्हिडीओत कर्नाटक राज्य परिवहन मंडळ अर्थात KSRTC च्या बसचालकाने चक्क माकडाच्या हाती स्टेअरिंग दिलं आहे. माकड ही बस चालवताना दिसतं आहे. बसचा चालक त्याच्यामागे गिअर धरून बसला आहे. माकड स्टेअरिंग फिरवून बस चालवत आहे असं या व्हिडीओत दिसतं आहे. प्रवाशांचा जीव धोक्यात घातल्याप्रकरणी या बस ड्रायव्हरला निलंबित करण्यात आलं आहे.

पाहा व्हिडीओ

हा व्हिडीओ सोशल मीडियावरही चांगलाच व्हायरल होतो आहे. ज्याची दखल घेत प्रवाशांचा जीव धोक्यात घातल्याप्रकरणी चालकाला निलंबित करण्यात आलं आहे. हा व्हिडीओ 1 ऑक्टोबरचा आहे अशीही माहिती समोर आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 6, 2018 6:43 pm

Web Title: viral video from karnatakas davanagere of a ksrtc bus driver driving with a langur perched on the steering wheel
Next Stories
1 Nalasopara Explosive Case : अमोल काळे, अमित बद्दी, गणेश मिस्त्रे यांना एटीएसची कोठडी
2 पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; ११ डिसेंबरला होणार मतमोजणी
3 जम्मू काश्मीरमध्ये बस दरीत कोसळून २० जणांचा मृत्यू, १३ जण जखमी
Just Now!
X