व्हॉट्सअ‍ॅप संदेश सेवेत एकदा पाठवलेला संदेश पुन्हा रद्द करता येत नव्हता. नंतर अलीकडे तो काढून टाकता येऊ लागला होता, पण तो सात मिनिटांच्या आतच काढून टाकणे शक्य होते. यापुढे डिलिट फॉर एव्हरीवन या वैशिष्टय़ाच्या मदतीने ६८ मिनिटे म्हणजे ४०९६ सेकंदात तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपवरचा संदेश काढून टाकू शकता.

व्हॉट्सअ‍ॅपच्या बिटा आवृत्ती वापरणाऱ्यांना ही सोय उपलब्ध आहे. बिटा २.१८.६९ ही ती आवृत्ती आहे. याशिवाय आता स्टिकर्स पाठवता येणार आहे. आयओएसवर डिलिट फॉर एव्हरीवन सेवा दिली जाणार आहे, जी अँड्राइड बिटा आवृत्तीत आहे. डिलिट फॉर एव्हरीवन ही सोय फार महत्त्वाची होती. त्यामुळे चुकीने पाठवलेले संदेश रद्द करता येतात. स्नॅपचॅट व फेसबुक मेसेंजरवर ही सोय आधीच होती. आतापर्यंत डिलिट फॉर एव्हरीवन वैशिष्टय़ात तुम्ही संदेश डिलिट करण्यापूर्वी जर तो दुसरा कुणी उद्धृत केला तर तो पुन्हा जात नसे. डिलिट केलेला संदेश पुन्हा मिळवण्यासाठी तुम्ही सात मिनिटांनंतर परत मिळू शकत होता.