News Flash

…तर २०२१ च्या सुरुवातीलाच करोना रुग्णसंख्येचा विस्फोट होईल; WHO चा इशारा

नाताळाच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने सर्व सामान्यांसाठी दिल्या सूचना

प्रातिनिधिक फोटो (फोटो सौजन्य : एएफपी)

जागतिक आरोग्य संघटनेनं (डब्यूएचओ) बुधवारी जारी केलेल्या एका इशाऱ्यामध्ये युरोपीयन देशांमध्ये करोनाचा प्रादूर्भाव वाढत असल्याचं म्हटलं आहे. डब्यूएचओने नाताळ साजरा करताना लोकांनी मास्क घातलं नाही आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले नाहीतर तर युरोपीयन देशांमध्ये करोनाचे संकट अधिक गंभीर होऊ शकतं, असंही म्हटलं आहे. लोकांनी नाताळानिमित्त चर्चमध्ये जाताना किंवा पार्ट्यांना जाताना मास्क नाही घातले तर नवीन वर्षामध्ये करोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होऊन रुग्णसंख्येचा विस्फोट झाल्याचे पहायला मिळू शकतं असा धोक्याचा इशाराही डब्ल्यूएचओनं दिला आहे.

डब्यूएचओने ब्रिटन, इटली, स्पेन, जर्मनी आणि फ्रान्ससारख्या देशांना नताळाच्या कालावधीमध्ये करोनासंदर्भातील नियमांचे काटेकोरपणे पालन केलं जाईल याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूनचा केल्याचं असोसिएट फ्री प्रेसने म्हटलं आहे. नाताळाच्या कालावधीमध्ये किती लोकांनी एकत्र यावे यासाठी नियम करावेत, एका ठिकाणी जास्त लोकांनी गर्दी होणार नाही हे पहावे असंही डब्यूएचओने या देशांना सांगितलं आहे. नाताळानिमित्त कोणाला पार्टी करायची असल्यास मोकळी मैदाने, घराचं अंगण आणि उघड्या जागांना प्राधान्य द्यावे. बंद जागी अनेकांनी भेटणं धोकादायक ठरु शकतं, असंही डब्यूएचओ आपल्या इशाऱ्यामध्ये म्हटलं आहे. हवा खेळती असणाऱ्या ठिकाणांना प्राधान्य दिल्यास संसर्गाचा धोका कमी आहे असंही डब्यूएचओने नमूद केलं आहे.

नक्की वाचा >> युरोपीयन देशांचे न्यू इयर लॉकडाउनमध्येच; जास्तीत जास्त दोन पाहुणे, १९ जानेवारीपर्यंत निर्बंधात सूट नाही अन् बरंच काही

डब्यूएचओने लोकांनी नाताळ साजरा करण्यासंदर्भातील निर्णय गांभीर्याने घ्यावेत असाही सल्ला दिला आहे. तुमचे निर्णय या कठीण प्रसंगी महत्वाचे ठरणार असून सुट्ट्या आणि कुटुंबामधील सर्वजण एकत्र येताना अधिक काळजी घ्यावी असं डब्यूएचओने म्हटलं आहे. आपल्या घरातील व्यक्ती आणि जवळचे मित्र सोबत असताना मास्क घालणं थोडं अवघडल्यासारखं वाटेल, सोशल डिस्टन्सिंग ठेवणं अडचणीचं वाटेल मात्र असं केल्यास सर्वजण हे सुरक्षित आणि ठणठणीत राहण्यास मदत होणार आहे हे लक्षात घेतलं पाहिजे, असंही डब्यूएचओने पत्रात म्हटलं आहे. युरोपीयन प्रदेशामधील ५३ देश आणि रशियाबरोबरच काही आशियामधील देशांसाठी हा इशारा प्रामुख्याने जारी करण्यात आला आहे. या देशांमध्ये आतापर्यंत पाच लाख जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

ब्रिटनमध्ये सूट देण्याची मागणी जोर धरु लागली

ब्रिटनममध्ये नाताळाच्या कालावधीमध्ये करोनासंदर्भातील निर्बंधांमध्ये सूट देण्यासाठी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यावर दबाव वाढत असल्याचं चित्र दिसत आहे. अनेक नेत्यांनी तसेच अनेक बड्या चर्चेच्या प्रतिनिधींनी पंतप्रधानांकडे निर्बंधांमध्ये सूट देण्याची मागणी केली आहे. लोकांना नाताळ मोकळेपणे साजरा करता यावा यासाठी सूट देण्याची मागणी केली जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 17, 2020 11:33 am

Web Title: who warns of high risk of virus resurgence in europe in early 2021 scsg 91
टॅग : Coronavirus
Next Stories
1 “कमलनाथ सरकार पाडण्यात नरेंद्र मोदींची होती महत्त्वाची भूमिका”; भाजपा नेत्याचा गौप्यस्फोट
2 विवाहाचं वचन देऊन केलेलं सेक्स म्हणजे बलात्कारच असं नाही – हायकोर्ट
3 भारताला करोना लसीकरणासाठी पहिल्या टप्प्यात १० हजार कोटींचा खर्च – रिपोर्ट
Just Now!
X