बंगळूरु: कर्नाटकमध्ये सध्या एवाय ४.२ च्या दोन नव्या प्रकरणांसह करोनाच्या डेल्टा प्लस या उत्परिवर्तित प्रकाराची ७ प्रकरणे आहेत, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने बुधवारी सांगितले. यापैकी ३ प्रकरणे बंगळूरुतील असून उर्वरित ४ प्रकरणे राज्याच्या उर्वरित भागांतील आहेत, असे राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण आयुक्त डी. रणदीप यांनी सांगितले. नव्या प्रकारामुळे मृत्यू झाल्याचे वृत्त नाही, मात्र एक-दोन जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे ते म्हणाले. दरम्यान, परदेशातून कर्नाटकात येणाऱ्या प्रवाशांसाठी राज्य सरकारने नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. सर्व प्रवाशांजवळ करोनाच्या आरटी-पीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल असला पाहिजे. ही चाचणी प्रवास सुरू होण्यापूर्वी ७२ तासांच्या आत करण्यात आलेली असायला हवी, असे यात म्हटले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 28th Oct 2021 रोजी प्रकाशित
कर्नाटकात करोनाच्या उत्परिवर्तित प्रकाराची सात प्रकरणे
नव्या प्रकारामुळे मृत्यू झाल्याचे वृत्त नाही, मात्र एक-दोन जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे
Written by लोकसत्ता टीम
Updated:

First published on: 28-10-2021 at 00:15 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 7 cases of new covid variant found in karnataka zws