बिल्किस बानो सामुहिक बलात्कार प्रकरणातील दोषींची सोमवारी गोध्रा उप-कारागृहातून मुक्तता करण्यात आली. एकीकडे जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेल्या या दोषींच्या सुटकेचा निषेध होत असताना दुसरीकडे मात्र त्यांचा हारतुरे घालून सन्मान करण्यात येत आहे. गुजरातच्या विश्व हिंदू परिषदेच्या कार्यालयात बलात्कार प्रकरणातील या दोषींचे हार घालून स्वागत करण्यात आले.

विश्लेषण : बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणी ११ दोषसिद्ध आरोपींची मुदतपूर्व सुटका कशी झाली?

बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणातील या दोषसिद्ध आरोपींनी १५ वर्षांचा तुरुंगवास भोगला आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त कैद्यांची सुटका करण्याचे आदेश केंद्र सरकारने एका विशेष धोरणाद्वारे राज्यांना दिले होते. परंतु या धोरणातून बलात्काराच्या आरोपात दोषी ठरलेल्या आरोपींना वगळण्यात आले होते. असे असताना बिल्किसवर बलात्कार करणाऱ्यांची सुटका करण्यात आल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. गुन्ह्याचे स्वरुप, वय आणि तुरुंगातील वागणूक लक्षात घेता दोषींनी दाखल केलेल्या मुदतपूर्व सुटका अर्जाचा विचार करण्यात आला, अशी माहिती गुजरातच्या गृह सचिवांनी दिली आहे.

Bilkis Bano Case: दोषींच्या सुटकेनंतर बिल्किस नि:शब्द, व्यथित आणि उदास, पीडितेचे कुटुंबीय सुन्न

मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयाने बिल्किस बानोवरील सामुहिक बलात्कार आणि तिच्या सात कुटुंबीयांच्या हत्येप्रकरणी ११ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. ही शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवली होती. १५ वर्षांची शिक्षा भोगल्यानंतर या प्रकरणातील एका आरोपीने मुदतपूर्व सुटकेसाठी अर्ज केला होता. या अर्जाकडे लक्ष देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारला दिले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बिल्कीस बानो कोण होती?

गोध्रा हत्याकांडानंतर २००२ रोजी गुजरातमध्ये दंगली उसळल्या. या दंगलखोरांपासून जीव वाचवण्यासाठी बिल्किसने तिची तीन वर्षीय मुलगी सालेहा आणि कुटुंबीयांसह गावातून पळ काढला. एका शेतात आश्रयाला असताना २० ते २५ लोकांच्या जमावाने या कुटुंबावर हल्ला चढवला. हल्लेखोरांनी बिल्किसच्या कुटुंबातील सात सदस्यांची हत्या केली. त्यात तिच्या मुलीचाही समावेश आहे. पाच महिन्यांच्या गर्भवती बिल्कीसवर दंगलखोरांकडून सामुहिक बलात्कार करण्यात आला. या प्रकरणातील दोषींची गुजरात सरकारने तुरुंगातून मुक्तता केली आहे.