नवी दिल्ली : दक्षिण दिल्लीत सीजीओ संकुलात सामाजिक न्याय मंत्रालयाच्या कार्यालयामध्ये लागलेल्या आगीत केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचा (सीआयएसफ) एक उपनिरीक्षक मरण पावला.

आगीनंतर पसरलेल्या धुरामुळे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलांचे उपनिरीक्षक एम. पी. गोदरा हे गुदमरून बेशुद्ध पडले. नंतर  त्यांना अखिल भारतीय आयुर्विज्ञान केंद्रात दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाला.

अग्निशमन दलास पंडित दीनदयाळ अंत्योदय भवनात पाचव्या मजल्यावर लागलेल्या आगीची माहिती सकाळी ८.३४ वाजता दूरध्वनीवर मिळाली असता तेथे २५ अग्निशामक बंब पाठवण्यात आले होते. दिल्ली अग्निशमन सेवेने दिलेल्या माहितीनुसार सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयात ही आग लागली होती. त्याच्या ज्वाळा आटोक्याच आणल्या गेल्या. मुख्य अग्निशमन अधिकारी अतुल गर्ग यांनी सांगितले, की आगीचे कारण समजू शकलेले नाही. गोदारा हे त्या वेळी पाळीप्रमुख होते. ते परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गेले असता नाकातोंडात कार्बन मोनॉक्साइड वायू गेल्याने ते बेशुद्ध पडले.