काँग्रेससाठी काम करणाऱ्या कंपनीवर आयकर विभागाची छापेमारी; बेहिशेबी मालमत्ता आणि कागदपत्रे जप्त

काँग्रेस पक्षाशी संबंधित एका कंपनीवर आयकर विभागाने छापेमारी केली आहे. या छापेमारीत बेहिशेबी मालमत्ता सापडल्याचं आयकर विभागाने म्हटलंय.

income

काँग्रेस पक्षाशी संबंधित एका कंपनीवर आयकर विभागाने छापेमारी केली आहे. या छापेमारीत बेहिशेबी मालमत्ता सापडल्याचं आयकर विभागाने म्हटलंय. काँग्रेस पक्षासाठी आसाम आणि इतर राज्यांमध्ये निवडणूक व्यवस्थापन आणि डिजिटल मार्केटींग करणाऱ्या डिझाईन बॉक्स्ड या कंपनीवर आयकर विभागाने छापा टाकला. आयकर अधिकाऱ्यांनी कंपनीच्या चंदीगड, मोहाली, सुरत आणि बेंगळुरू येथे एकूण सात ठिकाणी शोधमोहीम राबवली. याशिवाय कंपनीच्या एमडीच्या हॉटेल रूमचीही झडती घेण्यात आली आहे.

प्राप्तिकर विभागाने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, छाप्यादरम्यान अनेक संशयास्पद कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत, ज्यात बेहिशेबी उत्पन्नाचे आणि मालमत्तेचे हस्तांतरणाचे पुरावे आहेत. प्राप्तिकर विभागाच्या म्हणण्यानुसार, कंपनी एंट्री ऑपरेटरद्वारे अकॉमोडेशन संदर्भातील नोंदणी करत होती. कंपनीवर हवालाच्या माध्यमातून व्यवसाय केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

कंपनीने कर चुकवण्याच्या उद्देशाने महसूल कमी नोंदवला आहे आणि जाणीवपूर्वक खर्च वाढवला आहे. हा समूह बेहिशेबी रोख देयकांमध्येही सहभागी असल्याचे आढळून आले आहे. विभागाच्या मते, छाप्यांमधून मिळालेल्या कागदपत्रांमध्ये असेही आढळून आले आहे की कंपनीच्या संचालकांचा वैयक्तिक खर्च देखील कंपनीचा व्यवसायिक खर्च म्हणून नोंदवला गेला आहे. तसेच संचालक आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या वापरासाठी कंपनीच्या कर्मचारी आणि प्रवेशकांच्या नावावर आलिशान वाहने खरेदी केली गेली आहेत, असेही आयकर विभागाने म्हटले आहे. या कंपनीवर १२ ऑक्टोबर रोजी छापा टाकण्यात आला होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Income tax department raids a company affiliated to the congress party unaccounted assets and documents confiscated hrc

ताज्या बातम्या