scorecardresearch

Premium

“मनमोहन सिंग असामान्य व्यक्ती पण…”, नारायण मूर्ती यांची यूपीए सरकारच्या कारभारावर टीप्पणी

युवा पिढीच्या जोरावर भारत दुसऱ्या क्रमाकांची अर्थव्यवस्था असलेल्या चीनचा स्पर्धेक बनू शकतो, असा विश्वास मूर्ती यांनी व्यक्त केला आहे

infosys founder narayan murthy
इन्फोसिसचे संस्थापक एन. आर. नारायण मूर्ती (संग्रहित छायाचित्र)

काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारमध्ये आर्थिक घडामोडी ठप्प झाल्या होत्या. मनमोहन सिंग सरकारमध्ये आर्थिक बाबींसंदर्भात निर्णय घेतले जात नव्हते, असे विधान आयटी क्षेत्रातील दिग्गद आणि इन्फोसिसचे सहसंस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांनी केले आहे. मनमोहन सिंग यांचे व्यक्तीमत्व असामान्य आहे, मात्र, तरीही त्यांच्या काळात आर्थिक विकास रखडला, असे मूर्ती यांनी म्हटले आहे.

UN General Assembly: “पाकिस्तानला भारतासोबत शांततापूर्ण संबंध हवेत मात्र…”; संयुक्त राष्ट्रांसमोर शेजाऱ्यांची दुटप्पी भूमिका

Rahul-Gandhi-Dog-pet-noorie
‘हा तर मुस्लीम मुलींचा अवमान’, राहुल गांधी यांच्या कुत्र्याच्या नावावरून एमआयएमची टीका
Kevin McCarthy
विश्लेषण : केविन मॅकार्थींच्या हकालपट्टीचे नाट्य कसे रंगले? बायडेन प्रशासनाची पुन्हा आर्थिक कोंडी?
Gulabrao Patil on Sanjay Raut Khalistan issue
VIDEO: संजय राऊतांनी खलिस्तान आणि पुलवामाबाबत केलेल्या ‘त्या’ वक्तव्याला गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया, म्हणाले…
saudi mohammed al narendra modi g20 delhi
G20 Summit 2023: भारत-सौदी अरेबिया भागीदारी जागतिक स्थैर्यासाठीही महत्त्वाची; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

“मनमोहन सिंग हे असामान्य व्यक्ती आहेत. त्यांचा मी खूप आदर करतो. मात्र, त्यांच्या नेतृत्वातील यूपीएच्या काळात निर्णय घेतले जात नव्हते आणि त्यामुळे सर्वच गोष्टी रखडत गेल्या. दुर्देवाने हे असे का घडले मला माहित नाही”, असे मूर्ती यांनी म्हटले आहे. अहमदाबादमधील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट’मध्ये (IIMA) तरुण उद्योजक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मूर्ती यांनी यूपीए काळातील भारताच्या आर्थिक स्थितीवर भाष्य केले. भारतातील युवा पिढीच्या जोरावर भारत दुसऱ्या क्रमाकांची अर्थव्यवस्था असलेल्या चीनचा स्पर्धेक बनू शकतो, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

युक्रेन युद्धावर तोडग्यासाठी मोदी, पोप, गुटेरेस यांची समिती नेमा ; मेक्सिकोचा संयुक्त राष्ट्रांना प्रस्ताव

“२००८ ते २०१२ या कालावधीत मी लंडनमधील एचएसबीसी बोर्डावर होतो. पहिल्या काही वर्षांमध्ये बैठकांमध्ये जेव्हा चीनच्या नावाचा उल्लेख दोन ते तीनदा यायचा, तेव्हा भारताचे नाव केवळ एकदा घेतले जायचे. २०१२ साली एचएसबीसी सोडताना भारताचा क्वचितच उल्लेख व्हायचा, त्यावेळी चीनचे नाव जवळपास ३० वेळा बैठकांमध्ये घेतले जायचे”, असे मूर्ती यांनी यावेळी सांगितले.

दहशतवादावर दुटप्पी भूमिकेचा ‘ब्रिक्स’कडून निषेध ; आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वसमावेशक भूमिकेचा आग्रह

इतर देशांचा उल्लेख होत असताना विशेषत: चीनचा भारत देशाचाही उल्लेख व्हायला हवा याची जबाबदारी युवा पिढीची असल्याचे मूर्ती या कार्यक्रमात म्हणाले. मनमोहन सिंग अर्थमंत्री असताना १९९१ मध्ये झालेली आर्थिक सुधारणा आणि भाजपाच्या नेतृत्वातील एनडीए सरकारमधील ‘मेक इन इंडिया’ आणि ‘स्टार्ट अप इंडिया’ या योजनांमुळे भारताच्या विकासाला हातभार लागल्याचे मूर्ती यावेळी म्हणाले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Infosys co founder and it giant narayan murthy commented on manmohan sing upa goverment and economics and china rvs

First published on: 24-09-2022 at 08:04 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×