JNU मध्ये पुन्हा हाणामारी; ABVP आणि AISAच्या सदस्यांमध्ये खडाजंगी, पोलिसांत तक्रार दाखल

रविवारी हिवाळी अधिवेशनासाठी नोंदणीवरून ही हाणामारी झाल्याचे विद्यार्थ्याने सांगितले आहे

jnu clashes between abvp and left alliance many injured in fight
(एक्सप्रेस फाईल फोटो)

जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (एबीव्हीपी) आणि डावी आघाडी ऑल इंडिया स्टुडंट असोसिएशन (एआयएसए) आणि स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) यांच्या सदस्यांमध्ये हाणामारी झाली. ज्यामध्ये सुमारे अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत तर काही जण गंभीर जखमी आहेत. हाणामारीत गंभीर जखमी झालेल्यांवर नवी दिल्लीतील एम्समध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेची औपचारिक तक्रार दिल्ली पोलिसांकडे करण्यात आली आहे, असे विद्यार्थी संघटनेच्या सदस्यांनी सांगितले.

रविवारी रात्री दहाच्या सुमारास विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेच्या कार्यालयात ही घटना घडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. दोन्ही संघटनांचे सदस्य एकमेकांवर हिंसाचार सुरू केल्याचा आरोप करत आहेत. जेएनयूमध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारची घटना झालेली नाही. जेएनयू यापूर्वीही वादात सापडले आहे. यापूर्वी ६ जानेवारी २०२० रोजी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांनी या हल्ल्यासाठी डाव्या संघटनांना जबाबदार धरले होते.

जेएनयूमध्ये शिकणारे काही अभाविपचे सदस्य माध्यमांसमोर आले होते. त्यांनी डाव्या संघटनांवर हल्ल्याचा आरोप केला. हिवाळी अधिवेशनासाठी नोंदणीवरून ही हाणामारी झाल्याचे विद्यार्थ्याने सांगितले. विद्यार्थ्याच्या म्हणण्यानुसार, ७०० लोक (डाव्या संघटनांचे) शांती मोर्चासाठी जमले होते आणि त्यांनीच सर्व्हर रूमचे नुकसान केले जेणेकरून नोंदणी विस्कळीत होईल.

या घटनेनंतर स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) च्या नेत्या आणि जेएनयू स्टुडंट्स युनियनच्या अध्यक्षा आयेशी घोषने ट्विट करत याबाबत माहिती दिली. ‘एबीव्हीपीच्या गुंडांनी आज जेएनयूमध्ये हिंसाचार पसरवला. या गुन्हेगारांनी वेळोवेळी विद्यार्थ्यांवर हिंसाचार करून कॅम्पसमधील लोकशाही विस्कळीत केली आहे. तरीही जेएनयू प्रशासन गप्प राहणार का? गुंडांवर कारवाई होणार नाही का?’ असे आयेशी घोषने म्हटले आहे. यासोबतच हल्ल्यात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांचे फोटोही शेअर केले आहेत.

जेएनयूमध्ये पुन्हा एकदा अभाविप आणि आयसा या विद्यार्थी संघटना आमनेसामने आल्या होत्या. एबीव्हीपीचा आरोप आहे की त्यांचे कार्यकर्ते बैठक घेत असताना आयसाचे विद्यार्थी आले आणि त्यांना मारहाण केली, ज्यामध्ये अनेक विद्यार्थी जखमी झाले. रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. यावेळी विद्यार्थ्यांमध्ये जोरदार घोषणाबाजीही झाली. या मारामारीत काही विद्यार्थीही जखमी झाले आहेत. अभाविपने वसंत कुंज पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे, मात्र अद्याप गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Jnu clashes between abvp and left alliance many injured in fight abn

Next Story
पेट्रोल, डिझेल, एलपीजी दरात पुढील आठवडय़ात वाढ?
ताज्या बातम्या