राजधानी दिल्लीतल्या सीमापुरी भागातून एक अपहरण झालेली मुलगी तब्बल १७ वर्षांनी सापडली आहे. सीमापुरी पोलीस स्टेशनला १७ वर्षांपूर्वी अपहरण झालेल्या मुलीला शोधण्यात यश मिळालं आहे. पोलिसांनी त्यांच्या खबऱ्यांकडून माहिती मिळाल्यानंतर त्यांनी आधी मुलीची ओळख पटवली आणि मग तिला सुरक्षित परत आणलं. पोलीस याप्रकरणी पुढील कार्यवाही करत आहेत. या मुलीचं अपहरण झालं तेव्हा तिचं वय १६ वर्ष इतकं होतं. आता तिचं वय ३२ वर्षांपेक्षा जास्त आहे. आपल्या मुलीचं अपहरण झाल्याची तक्रार मुलीच्या पालकांनी दिल्लीतल्या गोकलपुरी पोलीस ठाण्यात २००६ मध्ये दाखल केली होती.

या प्रकरणाची माहिती देताना शाहदरा जिल्ह्याचे पोलीस उपायुक्त रोहित मीणा म्हणाले, सीमापुरी पोलीस ठाण्याच्या क्रॅक पथकाने गुप्त माहितीच्या आधारावर अपहृत मुलीला सीमापुरी भागातून शोधून काढलं. या मुलीचं वय आता ३२ वर्षांहून अधिक आहे. अपहण झालं तेव्हा तिचं वय १६ वर्ष इतकं होतं. गोकलपुरी पोलीस ठाण्यात २००६ मध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Accused who absconded after killing arrested after 34 years
हत्या करून फरार झालेल्या आरोपीला ३४ वर्षांनी अटक; गुन्हे शाखा १ ची कारवाई
murder of girlfriend, mumbai,
मुंबई : प्रेयसीच्या हत्येप्रकरणी ३० वर्षीय व्यक्तीला अटक
pune city, sales of electric vehicles, last year, Gudi Padwa festival
पुणे : कुणी इलेक्ट्रिक वाहन घेता का? गेल्या वर्षीपेक्षा पाडव्यानिमित्त विक्रीत तब्बल ८५ टक्क्यांची घट
youth murder
वसई : अपघात नव्हे ही तर हत्या, ३ वर्षांनी हत्येला फुटली वाचा

या मुलीने पोलिसांना सांगितलं की, तिने घर सोडल्यानंतर दीपक नावाच्या एका व्यक्तीसोबत ती उत्तर प्रदेशातल्या बलियांमध्ये राहत होती. ती म्हणाली, लॉकडाऊनच्या काळात माझं आणि दीपकचं मोठं भांडण झालं. त्यानंतर मी दीपकला सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मी गोकलपुरीला आले. येथे एक घर भाड्याने घेतलं आणि तिथेच राहू लागले.

हे ही वाचा >> “२०२४ मध्ये मोदींचं सरकार येईल आणि आपण…”, खासदार कुमार केतकरांनी काँग्रेसच्या लेट लतिफ नेत्यांचे कान टोचले

पोलिसांनी या मुलीला गोकलपुरी पोलीस ठाण्यात पाठवलं आहे. कारण याप्रकरणी पुढील कारवाई ही गोकलपुरी पोलीस ठाण्याद्वारे केली जाईल. दरम्यान, पोलीस उपायुक्तांनी सांगितलं की, क्रॅक पथकाला या कामगिरीसाठी सन्मानित केलं जाईल. दिल्ली पोलिसांच्या क्रॅक पथकाने कौतुकास्पद असं काम केलं आहे.