उत्तर प्रदेशमधील अनेक तरुण महाराष्ट्रात नोकरीसाठी येतात. तर अगोदर भूमिपुत्रांचा विचार व्हावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून केली जाते. असे असताना आता भाजपा नेते कृपाशंकर सिंह यांनी उत्तर प्रदेशमध्ये माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी मराठीचा पर्यायी भाषा म्हणून समावेश करण्याची विनंती केली आहे.

हेही वाचा >> स्थलांतरित मतदार कुठूनही मतदान करू शकणार? निवडणूक आयोगाचा समिती स्थापन करण्याचा निर्णय

कृपाशंकर सिंह यांनी उत्तर प्रदेशमधील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शालेय शिक्षण अभ्यासक्रमात मराठीचा पर्यायी भाषा म्हणून समावेश करावा अशी विनंती करणारे पत्र उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लिहलं आहे. या पत्रात त्यांनी “अनेक उत्तर भारतीय लोक नोकरीसाठी महाराष्ट्रात येतात. मात्र मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान नसल्यामुळे त्यांना नोकरी मिळण्यात अडचणी येतात,” असा उल्लेख केला आहे.

हेही वाचा >> मोबाईल गेम खेळू न दिल्याने आईची हत्या; बहिणीला खोलीत कोंडलं; तीन दिवस मृतदेहासोबतच वास्तव्य

तसेच, “महाराष्ट्रात अशा अनेक नोकऱ्या आहेत, ज्यामध्ये मराठी भाषेचे ज्ञान गरजेचे असते. मात्र उत्तर प्रदेशमधील लोकांना ही भाषा अवगत नसल्यामुळे त्यांना नोकरी मिळू शकत नाहीत. याच कारणामुळे उत्तर प्रदेशमध्ये माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रमात मराठी या भाषेचा पर्यायी भाषा म्हणून समावेश केला तर उत्तर प्रदेशमधील तरुणांना येथे नोकरी मिळणे सोपे जाईल,” असे कृपाशंकर सिंह यांनी आपल्या पत्रामध्ये म्हटले आहे.

हेही वाचा >> “कतारने भारताला धडा शिकवला, पण भाजपा…”; पंतप्रधानांचा झालेला अवमान चुकीचा असल्याचे म्हणत शिवसेनेची टीका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, याआधी मनसेने भूमिपुत्रांना नोकऱ्यांत प्राधान्य देण्याची मागणी केलेली आहे. तर आता भाजपा नेत्याने उत्तर प्रदेशमधील लोकांना महाराष्ट्रात नोकरी मिळावी म्हणून तेथे मराठी भाषा शिकवण्याचा आग्रह केला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रात काय प्रतिक्रिया उमटणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.