बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भरसभेत पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाया पडण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, मोदींना त्यांना थांबवत आपल्या बाजुला बसवून घेतलं. पंतप्रधान मोदींच्या या कृतीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतलं. त्यांनी जोरदार टाळ्या वाजवत प्रतिसाद दिला. दरम्यान, याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे.

नेमकं काय घडलं?

बिहारमधील दरभंगा येथे आज १२ हजार कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं भूमिपूजन तसेच लोकार्पण पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते पार पडलं. यावेळी मुख्यमंत्री नितीश कुमार भाषण आपटून त्यांच्या जागेवर जात होते. मात्र मध्येच पंतप्रधान मोदी यांची खुर्ची होती. नितीश कुमार जात असतानाच पंतप्रधान मोदी नितीश कुमार यांच्याकडे बघितलं. त्यानंतर नितीश कुमार यांनी थेट मोदींच्या पाया पडण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा – तिरुपती लाडू भेसळ वाद आणि नितीश कुमारांकडून राम मंदिराचे कौतुक; भाजपाच्या मित्रपक्षांनीही रेटला हिंदुत्वाचा मुद्दा

दरम्यान, नितीश कुमार हे पाया पडणार हे लक्षात येताच मोदींनी उभ राहून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांच्याशी हातमिळवत त्यांना आपल्या बाजुने बसवून घेतलं. पंतप्रधान मोदी यांच्या या कृतीमुळे उपस्थितांनी जोरदार टाळ्या वाजवल्या. तसेच घोषणाबाजी केली.

महत्त्वाचे म्हणजे अशाप्रकारे नितीश कुमारांनी पंतप्रधान मोदींच्या पाया पडण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. यापूर्वी जून महिन्यात संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये एका कार्यक्रमातही त्यांनी पंतप्रधान मोदींच्या पाया पडण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळीही मोदींनी त्यांना थांबवले होते. तेव्हा अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता.

हेही वाचा – बिहारमध्ये ११४ वर्षांनंतर भूमी सर्वेक्षण; नितीश कुमार सरकारच्या निर्णयावर विरोधकांची टीका कशासाठी?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, नितीश कुमार यांनी बिहारमधील जंगलराज संपवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यासाठी त्यांचं करावं तितकं कौतुक कमी आहे. एनडीएच्या डबल इंजिनच्या सरकारमुळे बिहारमध्ये झपाट्याने विकास होतो आहे.