Rishabh Pant Car Accident Video: भारतीय क्रिकेटर ऋषभ पंतचा भीषण अपघात झाला असून, त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पंतच्या अपघाताची माहिती मिळताच सोशल मीडियावरुन त्याचे चाहते काळजी व्यक्त करत असून लवकर बरं होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. बॉलिवूड, राजकीय, क्रीडासह सर्वच क्षेत्रातून ऋषभ पंतच्या अपघातावर प्रतिक्रिया उमटत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्वीट करत आपण व्यथित असल्याची भावना व्यक्त केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट केलं असून “ऋषभ पंतच्या अपघातानंतर आपण व्यथित आहोत. तो लवकर बरा व्हावा यासाठी मी प्रार्थना करत आहे”.

wardha lok sabha seat, Sushma Andhare, BJP MP Ramdas Tadas Family, Injustice Towards Daughter in law, Pooja Tadas, Demands Justice, pm narendra modi, modi Wardha Meeting, bjp,
पंतप्रधान मोदी साहेब पीडित पूजा तडस तुमचा परिवारात नाही का? सुषमा अंधारे म्हणाल्या…
S Somnath
चांद्रयान ४ मोहिमेबाबत इस्रोच्या प्रमुखांकडून मोठी अपडेट; म्हणाले “पुढील टप्पा…”
What Devendra Fadnavis Said?
“पंतप्रधान मोदींच्या आशीर्वादाने चांद्रयान चंद्रावर उतरलं, त्याचप्रमाणे चंद्रपूरचं यान..”, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य चर्चेत
Sanjay Mandlik
नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी संजय मंडलिक यांना खासदार करूया; हसन मुश्रीफ यांचे आवाहन

ऋषभ पंतचा शुक्रवारी सकाळी भीषण अपघात झाला असून, देहरादूनमधील मॅक्स रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत. पंत दिल्ली येथून देहरादूनला जात असताना डुलकी लागल्याने हा अपघात झाला. अपघातानंतर कारला आग लागल्याने बाहेर पडण्यासाठी पंतला काच फोडावी लागली. पंतच्या अपघाताचं सीसीटीव्ही समोर आलं असून यामध्ये अपघात किती भीषण होता याची कल्पना येत आहे.

Rishabh Pant Accident Video: पंतचा अपघातानंतरचा पहिला व्हिडीओ आला समोर, रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर होता उभा

ऋषभ पंत आपल्या मर्सिडीज कारने दिल्लीहून रुरकीला जात होता. यावेळी पहाटे गुरुकुल नरसन परिसरात हा अपघात झाला. अपघातानंतर स्थानिक लोकांनी तात्काळ १०८ ला फोन करून पंतला रुग्णालयात दाखल केलं. पंतला गंभीर दुखापती झाल्या असून त्याच्यावर प्लास्टिक सर्जरी होण्याची शक्यता आहे.

Rishabh Pant Accident CCTV: ऋषभ पंतच्या अपघाताचं सीसीटीव्ही आलं समोर, पाहा व्हिडीओ

उत्तराखंडचे पोलीस महासंचालक अशोक कुमार यांनी अपघात झाला तेव्हा कारमध्ये पंत एकटाच होता याला दुजोरा दिला आहे. तसंच अपघातानंतर कारला आग लागल्याने काच फोडून तो बाहेर आल्याची माहिती दिली आहे.

“पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास पंतच्या कारचा अपघात झाला. पंतने दिलेल्या माहितीनुसार, त्याला झोप लागल्याने कारने रस्ता सोडला आणि दुभाजकाला जाऊन आदळली. अपघातानंतर कारला आग लागली होती. त्याला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. नंतर त्याला देहरादूनला हलवण्यात आलं,” अशी माहिती अशोक कुमार यांनी दिली आहे.

Rishabh Pant Car Accident News: ६७ लाखांच्या Mercedes GLCमध्ये झाला ऋषभचा अपघात; जाणून घ्या, पंतची एकूण संपत्ती किती

पंतचं डोकं, गु़डघ्याला गंभीर दुखापत झाली आहे. तसंच पाय मोडला असल्याची शक्यता असून देहरादूनमधील मॅक्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पंतची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.