पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा पार पडला आहे. पर्णकुटीत राहणाऱ्या रामलल्लाचे भव्य मंदिर उभं राहणार असल्याचं नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितलं. भूमिपूजन झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांना संबोधित केलं. नरेंद्र मोदींनी यावेळी मला निमंत्रण देत या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्याचा मान दिल्याबद्दल विश्वस्त मंडळाचे आभार मानले. भूमिपूजनापूर्वी पंतप्रधानांनी हनुमान गढी मंदिरात पूजा केली आणि त्यानंतर वृक्षारोपणही केलं.

Kangana Ranaut Vikramaditya Singh Himachal Pradesh Mandi Loksabha Election 2024
Celebrity Fight: कंगनासमोर राजघराण्यातील वंशजाचे आव्हान; सोनिया गांधींनी केली वाट बिकट
Pm narendra modi on ram mandir nirman
‘देशात राम मंदिर झाले पण आग लागली नाही’, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी का म्हणाले? वाचा
Prime Minister Modi asserted that the gaming industry does not need regulation
‘गेमिंग उद्याोगा’ला नियमनाची गरज नाही! पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन; आघाडीच्या गेमर्सशी संवाद
Ramdas Tadas sure about Prime Minister Narendra Modis meeting in Vardha
पंतप्रधान मोदींची वर्धेतही सभा? रामदास तडस यांना खात्री, ते म्हणतात…

Live Blog

14:57 (IST)05 Aug 2020
व्यंकय्या नायडू यांनी कुटुंबासोबत पाहिला राम मंदिर भूमिपूजनाचा कार्यक्रम

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी घरी कुटुंबासोबत टीव्हीवर राम मंदिर भूमिपूजनाचा कार्यक्रम पाहिला.

14:50 (IST)05 Aug 2020
अयोध्या : पंतप्रधान मोदींनी दिला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचा दाखला, म्हणाले...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंत्रोच्चाराच्या गजरात भूमिपूजन सोहळा पार पडला. या भूमिपूजन सोहळ्यानंतर उपस्थितांशी संवाद साधताना पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्याचा उल्लेख केला. अयोध्येमध्ये राम मंदिर बांधण्यासाठी भारतामधील सर्व सामान्यांनी सहकार्य केल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी सर्वच देशवासियांचे कौतुक केलं. नक्की काय म्हणाले मोदी जाणून घ्या येथे क्लिक करुन...

14:35 (IST)05 Aug 2020
हे मोदींच्या निर्णायक नेतृत्त्वाचं उदाहरण - अमित शाह

राम मंदिर भूमिपूजन पार पडल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विट केलं आहे. अयोध्येत उभं राहत असलेलं राम मंदिर हे मोदींच्या निर्णायक नेतृत्त्वाचं उदाहरण असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

14:22 (IST)05 Aug 2020
पर्णकुटीत राहणाऱ्या रामलल्लाचे भव्य मंदिर उभं राहणार – नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राम मंदिर भूमिपूजनाचा सोहळा पार पडला आहे. नरेंद्र मोदींनी यावेळी मला निमंत्रण देत या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्याचा मान दिल्याबद्दल विश्वस्त मंडळाचे आभारी मानले. पर्णकुटीत राहणाऱ्या रामलल्लाचे भव्य मंदिर उभं राहणार असल्याचं नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितलं.  भूमिपूजन झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांना संबोधित केलं. राम मंदिराच्या टपाल तिकीटाचंही मोदींच्या हस्ते अनावरण करण्यात आलं. आज प्रभू रामाचा जयघोष संपूर्ण जगभरात होत आहे असं सांगत मोदींनी सर्व देशवासी आणि जगभरात असलेल्या भारतभक्त आणि रामभक्तांना शुभेच्छा दिल्या. नरेंद्र मोदींनी सियावर रामचंद्र की जय घोषणेने आपल्या भाषणाला सुरुवात केली. (येथे वाचा संपूर्ण बातमी)

14:09 (IST)05 Aug 2020
प्रभू श्रीराम यांच्याकडून कर्तव्याचे पालन करण्याची शिकवण - पंतप्रधान

प्रभू श्रीराम वेळेनुसार पुढे जाणं शिकवतात. त्यांनी आपल्याला कर्तव्याचं पालन करण्याचं शिकवण दिली आहे. त्यांनी बोध आणि शोध हा मार्ग दाखवलं. आपल्याला बंधुत्वातून राम मंदिराला जोडायचं आहे. जेव्हा आपण भटकलो तेव्हा विनाशाचा रस्ता उघडल्याचं दिसेल.आपल्याला आत्मनिर्भर भारताची निर्मिती करायची आहे. आज भारतासाठी श्रीरामाचा पुढे जाण्याचाच संदेश आहे. मला विश्वास आहे की आपण पुढे जाऊ आणि देशही पुढे जाईल, असा विश्वास आहे. राम मंदिर हा देशाला एकजुट करण्याचा प्रयत्न आहे, असंही मोदी म्हणाले.

14:00 (IST)05 Aug 2020
प्रभू श्रीरामाचा संदेश संपूर्ण जागापर्यंत पोहोचवणं वर्तमान, भावी पिढ्यांची जबाबदारी - पंतप्रधान

राम मंदिराकडून आस्था, श्रद्धा आणि संकल्पाची प्रेरणा मिळते. अनेक देशातील लोक प्रभू श्रीरामाला मानतात. जगातील सर्वाधिक मुस्लीम लोकसंख्या असेल्या इंडोनेशियात रामायण पूजनीय आहे. कंबोडिया, मलेशिया, थायलंड, इराण आणि चीनमध्ये राम कथांची माहिती मिळेल. नेपाळ आणि श्रीलंकेचाही संबंध जोडलेला आहे. अनेक देशांमधील लोकांना राम मंदिराचं काम सुरू झाल्याबद्दल आनंद होत असेल. प्रभू श्रीराम हे सर्वांमध्ये आहेत. ते सर्वांचे आहेत. राम मंदिर अनंक काळापर्यंत मानवाला प्रेरणा देईल. प्रभू श्रीरामाचा संदेश संपूर्ण जागापर्यंत कसा निरंतर पोहोचेल हे आपल्या वर्तमान आणि भावी पिढ्यांची जबाबदारी आहे, असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं, 

13:53 (IST)05 Aug 2020
भारताची अध्यात्मिकता हा जगासाठी प्रेरणेचा विषय - पंतप्रधान

आज देशातील नागरिकांच्या सहकार्यानं हे काम पूर्ण होत आहे. प्रभू श्रीरामाचं मंदिर म्हणजे एकजुटीचं प्रतीक आहे. श्रीराम गेल्या अनेक वर्षांपासून भारताचे स्तंभ बनले आहेत. श्रीरामाचं नाव असलेल्या शिळा देशातील अनेक भागांतून आल्या त्या एक ऊर्जा निर्माण करत आहेत. भारताची अध्यात्मिकता हा जगासाठी प्रेरणेचा विषय आहे, असंही पंतप्रधान मोदी म्हणाले.  

13:49 (IST)05 Aug 2020
मंदिरासोबत इतिहारासाचीही पुनरावृत्ती - मोदी

करोनामुळे हा कार्यक्रम काही मर्यादांचं पालन करुन होत आहे. प्रभू श्रीराम यांच्या कार्यक्रमासाठी मर्यादांचं पालन करून झालं पाहिजे तसंच देशातील नागरिकांनी केलं. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सर्वांनी एकमेकांच्या भावनांचा आदर केला होता. या मंदिरासोबत नवा इतिहास रचला जात नाही तर इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे, असं मोदी यावेळी म्हणाले,

13:46 (IST)05 Aug 2020
राम मंदिराची प्रक्रिया राष्ट्राला जोडणारी - पंतप्रधान

आता रामलल्लासाठी एका भव्य मंदिराचं निर्माण होईल. तुटणं आणि पुन्हा उभं राहणं यातून रामजन्मभूमी मुक्त झाली आहे. राम मंदिरासाठी अनेक वर्षांसाठी अनेक पिढ्यांनी प्रयत्न केला. आज दिवस त्याच संकल्प आणि त्यागाचं प्रतीक आहे, असं पंतप्रधान म्हणाले. प्रभू श्रीराम आमच्या मनात आहेत. कोणतंही काम करायचं असेल तर प्रेरणा म्हणून त्यांच्याकडेच आपण पाहतो. हे मंदिर सामूहिक शक्तीचं प्रतीक बनेल. या ठिकाणी येणाऱ्यांना प्रेरणा देईल. या मंदिरामुळे या ठिकाणी प्रत्येक क्षेत्रात संधी निर्माण होईल. संपूर्ण जगातून लोकं या ठिकाणी दर्शनासाठी येतील. खुप काही बदलेल. राम मंदिराची प्रक्रिया  राष्ट्राला जोडण्याची प्रक्रिया आहे, असं मोदी यावेळी म्हणाले.

13:37 (IST)05 Aug 2020
आज संपूर्ण भारत राममय झाला - पंतप्रधान

आज हा जयघोष केवळ याच ठिकाणी नाही तर संपूर्ण जगात याचा जयघोष होत आहे. या ठिकाणी मला आमंत्रण देण्यात आलं हे माझ्य भाग्य. या ऐतिहासिक क्षणाचं साक्षीदार होण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. या ठिकाणी येणं हे स्वाभाविक होतं. भारत आज शरयू तिरी एक स्वर्णिम अध्याय रचन आहे.आज संपूर्ण भारत राममय आणि मन दिपमय झाला आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. एवढ्या वर्षांची प्रतीक्षा आज पूर्ण झाली, असंही ते म्हणाले.

13:32 (IST)05 Aug 2020
पंतप्रधानांच्या हस्ते टपाल तिकिटाचं अनावरण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिरावर आधारित नव्या टपाल तिकिटाचं अनावरण करण्यात आलं. तब्बल पाच लाख टपाल तिकिट छापण्यात येणार आहेत.

13:22 (IST)05 Aug 2020
जगाला शांती देण्यासाठी मनाला अयोध्या बनवण्याची गरज - मोहन भागवत

जगाला शांती देण्यासाठी मनाला अयोध्या बनवण्याची गरज आहे. आपल्या मनातील अयोध्या सजवण्याची गरज आहेत. राम मंदिर पूर्ण होण्यापूर्वीच मनमंदिर तयार झालं पाहिजे, असंही मोहन भागवत म्हणाले. द्वेष, विकार, भेदभाव यांना तिलांजली देण्याची गरज आहे. तसंच संपूर्ण जगाला आपलेपण देणारी व्यक्ती असायला हवी, असंही त्यांनी सांगितलं. 

13:21 (IST)05 Aug 2020
मनातील मंदिरही उभारण्याची गरज - सरसंघचालक

गेल्या ३० वर्षांच्या कठीण संघर्षाचं फळ आज मिळालं आहे. एवढ्या वर्षांचा संघर्ष कधीही विसरता येणार नाही. आज सर्वांच्या आनंदाचा क्षण आहे. देशातील सर्वांमध्ये प्रभू श्रीराम आहेत. राम मंदिराच्या उभारणीचं काम सर्वांना वाटून देण्यात आले आहे. परंतु आपल्याला आपल्या मनात अयोध्या सजवायची आहे. या ठिकाणी जसं मंदिर बनेल तसं मनातील अयोध्या बनायला हवी. हे मंदिर उभं राहण्यापूर्वी मनातील मंदिर उभं राहायला पाहिजे, असं सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केलं.

13:15 (IST)05 Aug 2020
३० वर्षांची आज संकल्पपूर्ती - मोहन भागवत

आजचा आनंदाचा क्षण आहे. आम्ही संकल्प केला होता. तत्कालिन सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी अनेक वर्ष काम केल्यानंतर हे काम पूर्ण होईल असं म्हटलं होतं. तिसव्या वर्षाच्या सुरूवातीला संकल्पपूर्तीचा अनुभव मिळाला. अनेकांनी आज बलिदान दिलं आहे. ते सूक्ष्म रुपात आपल्या सोबत आहेत, असं मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केलं.

13:10 (IST)05 Aug 2020
५०० वर्षांच्या स्वप्नांची पूर्तता - योगी आदित्यनाथ

राम जन्मभूमिसाठी अनेकांनी बलिदान दिलं. गेल्या ५०० वर्षांपासूनच्या स्वप्नाची पूर्तता झाली आहे. आजचा दिवस म्हणजे इतक्या वर्षांचं फलित आहे, असं योगी आदित्यनाथ म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचा भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या आमंत्रितांशी बोलत होते.

13:10 (IST)05 Aug 2020
५०० वर्षांच्या स्वप्नांची पूर्तता - योगी आदित्यनाथ

राम जन्मभूमिसाठी अनेकांनी बलिदान दिलं. गेल्या ५०० वर्षांपासूनच्या स्वप्नाची पूर्तता झाली आहे. आजचा दिवस म्हणजे इतक्या वर्षांचं फलित आहे, असं योगी आदित्यनाथ म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचा भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या आमंत्रितांशी बोलत होते.

13:07 (IST)05 Aug 2020
शांततामय वातावरणात समस्येचं निराकरण - योगी आदित्यनाथ

संविधानाच्या अंतर्गत आणि शांतातमय वातावरणात समस्यांचं निराकरण कसं होऊ शकतं हे पंतप्रधानांनी दाखवून दिलं आहे. राम मंदिराच्या प्रतीक्षेत अनेक पिढ्यांचं बलिदान आहे. संघर्ष आणि साधना सुरू होती. लोकशाहीचा आणि संविधानाच्या अंतर्गत राहून यातून मार्ग निघाला. त्याचे मी आभार मानतो, असं योगी आदित्यनाथ म्हणाले 

13:04 (IST)05 Aug 2020
पाच शतकांची प्रतीक्षा संपली, भारतीयांच्या मनातलं स्वप्न पूर्ण - योगी आदित्यनाथ

आज पाच शतकांची प्रतीक्षा पूर्ण झाली आहे. १३५ कोटी भारतीयांच्या मनातील स्वप्न पूर्ण झालं आहे. सर्वांच्या भावनांना मूर्त रुप देण्याची संधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे मिळाली आहे, असं मत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केलं. भूमिपूजनानंतर ते बोलत होते. 

12:54 (IST)05 Aug 2020
पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा संपन्न

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंत्रोच्चाराच्या गजरात भूमिपूजन सोहळा पार पडला. यावेळी पंतप्रधानांसह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि सरसंघचालक मोहन भागवत हेदेखील उपस्थित होते. यापूर्वी पंतप्रधानांनी हनुमान गढी मंदिरात पूजा केली. त्यानंतर त्यांनी या ठिकाणी वृक्षारोपणही केलं. सुरूवातीला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांचं अयोध्येत स्वागत केलं.

12:41 (IST)05 Aug 2020
“जय श्री राम… जय श्री राम…” जयघोषाने अयोध्याच नाही तर अमेरिकेची राजधानीही दुमदुमली

अयोध्येत आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राम मंदिराचे भूमिपूजन होणार आहे. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेची राजधानी असणाऱ्या वॉशिंग्टन डीसीमध्येही हिंदू बांधवांनी आंनंदोत्सव साजरा केला. येथे क्लिक करुन पाहा काही खास फोटो

12:40 (IST)05 Aug 2020
प्रमुख अतिथी म्हणून मोहन भागवत यांची उपस्थिती

सन्मानीय अतिथी म्हणून उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित

12:29 (IST)05 Aug 2020
लतादीदींनी टि्वट करुन 'या' दोन नेत्यांना दिलं राम मंदिर निर्माणाचं श्रेय

राम मंदिर भूमिपूजनाविषयी ट्विट करत गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी आनंद व्यक्त केला. लतादीदींनी ट्विट करत दोन नेत्यांना राम मंदिर निर्माणाचं श्रेय दिलं आहे. वाचा त्यांचं संपूर्ण ट्विट..

12:23 (IST)05 Aug 2020
पाहा भूमिपूजनाचा थेट सोहळा

पाहा भूमिपूजनाचा थेट सोहळा

12:22 (IST)05 Aug 2020
मोदींनी २९ वर्षांपूर्वी दिलेला शब्द पाळला, अयोध्येत येताच पूर्ण केलं ‘हे’ वचन

पंतप्रधान नरेंद्र मोदी राम मंदिर भूमिपूजनासाठी अयोध्येत दाखल झाले आणि २९ वर्षांपूर्वी त्यांनी दिलेला तो शब्द पूर्ण झाला. नरेंद्र मोदी १९९१ मध्ये २९ वर्षांपूर्वी अयोध्येत आले होते. यावेळी त्यांनी जेव्हा राम मंदिर उभं राहील तेव्हाच आपण पुन्हा अयोध्येत येऊ असं जाहीर केलं होतं. त्यानुसार नरेंद्र मोदी आता तब्बल २९ वर्षांनी अयोध्येत पोहोचले आहेत. योगायोगाने नरेंद्र मोदी पंतप्रधान असल्याने भूमिपूजनाचा मानही त्यांनाच मिळाला आहे. (येथे वाचा सविस्तर वृत्त)

12:12 (IST)05 Aug 2020
पंतप्रधानांच्या हस्ते वृक्षारोपण

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याहस्ते या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आलं.

12:11 (IST)05 Aug 2020
“आज अयोध्येच्या व्यासपीठावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घोषणा करावी की…”

अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याचा कार्यक्रम आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येमध्ये आज राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी अयोध्येत सुरक्षेचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या कार्यक्रमानंतर पंतप्रधान मोदी काही भाष्य करणार का याकडे सर्व देशाचे लक्ष लागलं आहे. असं असतानाच आता भाजपाच्या खासदाराने मोदींकडे एक मागणी केली आहे. मोदींनी अयोध्येमधील व्यासपीठावरून एक घोषणा करावी असं या खासदाराने म्हटलं आहे. येथे वाचा सविस्तर वृत्त 

12:06 (IST)05 Aug 2020
राम मंदिराच्या भूमिपूजनावर अरुण गोविल यांचे ट्विट, म्हणाले...

अयोध्येत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिर भूमिपूजनाचा सोहळा पार पडणार आहे. यासाठी अवघी अयोध्यानगरी सजली आहे. त्यामुळे सध्या सामान्य जनतेपासून ते कलाविश्वातील सेलिब्रिटींपर्यंत सर्वजण आनंद व्यक्त करत आहेत. दरम्यान 'रामायण' या मालिकेत राम हे पात्र साकारणारे अरुण गोविल यांनी देखील ट्विट करत आनंद व्यक्त केला आहे. वाचा सविस्तर..

12:00 (IST)05 Aug 2020
काय सुरू आहे अयोध्येत?

राम मंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत काही वेळापूर्वी दाखल झाले आहेत. मोदी यांनी रामलल्लाचे दर्शन घेतलं. त्यानंतर आता पुढील कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. (थेट प्रक्षेपण सौजन्य : एएनआय)


12:00 (IST)05 Aug 2020
पंतप्रधान भूमिपूजन स्थळी दाखल

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भूमिपूजनाच्या स्थळी दाखल झाले आहेत. तसंच त्यांनी हनुमान गढी या ठिकाणी प्रार्थनाही केली. 
 

11:56 (IST)05 Aug 2020
कंगनाच्या आनंदाला पारावार नाही; ‘जय श्री राम’ म्हणत केलं ट्विट

अयोध्येमध्ये भव्य राम मंदिर निर्माणाच्या भूमिपूजनाची वेळ आता हळूहळू जवळ येऊ लागली आहे. या ऐतिहासिक क्षणासाठी संपूर्ण देशातील नागरिक उत्सुक आहेत. हा आनंद सामान्यांपासून ते कलाविश्वापर्यंत प्रत्येकाच्या चेहऱ्यावर झळत असून अभिनेत्री कंगना रणौतने ट्विट करत तिचा आनंद व्यक्त केला आहे. सविस्तर वाचा

11:45 (IST)05 Aug 2020
योगी आदित्यनाथ यांनी केलं पंतप्रधानांचं स्वागत

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भूमिपूजनासाठी अयोध्येत दाखल झाले असून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांचं स्वागत केलं,

11:39 (IST)05 Aug 2020
चंद्रकांत पाटील यांनी गुढी उभारून साजरा केला आनंद

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या कोल्हापूर येथील निवासस्थानी गुढी उभारुन राम मंदिर भूमिपूजनाचा आनंद साजरा करण्यात आला.

11:35 (IST)05 Aug 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत दाखल

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हेलिकॉप्टरद्वारे अयोध्येत दाखल झाले आहेत. थोड्याच वेळात ते भूमिपूजनाच्या स्थळी पोहोचतील.

11:28 (IST)05 Aug 2020
अमेरिकेतही भूमिपूजनाचा आनंद

विश्व हिंदू परिषद, अमेरिकातर्फे राम मंदिराच्या भूमिपूजनानिमित्त आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे. तसंच आम्हाला न्याय मिळाल्याचं सांगत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभारही मानले आहेत. 

11:17 (IST)05 Aug 2020
अयोध्येनं सर्वांना एकत्र आणलं - उमा भारती

अयोध्येनं सर्वांना एकत्र आणलं. आता देश संपूर्ण जगात मान उंचावून सांगू शकेल की आमच्या देशात कोणत्याही प्रकारचा भेदभाव नाही, असं मत भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या उमा भारती यांनी व्यक्त केलं. भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी त्या अयोध्येत दाखल झाल्या आहेत.

11:14 (IST)05 Aug 2020
सरसंघचालक मोहन भागवत अयोध्येत दाखल

सरसंघचालक मोहन भागवत यांना राम मंदिराच्या भूमिपूजनाचं निमंत्रण देण्यात आलं होतं. ते नुकतेच भूमिपूजन सोहळ्याच्या ठिकाणी दाखल झाले आहेत.

11:11 (IST)05 Aug 2020
बाबा रामदेव, स्वामी अवदेशानंद गिरी सोहळ्याच्या ठिकाणी दाखल
11:08 (IST)05 Aug 2020
राम मंदिर भूमिपूजन : संजय राऊतांना झाली बाळासाहेबांची आठवण, पोस्ट केला खास फोटो

अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याचा कार्यक्रम आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येमध्ये आज राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी अयोध्येत सुरक्षेचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर मर्यादित मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडणार आहे. असं असलं तरी या सोहळ्याचा उत्साह सोशल नेटवर्किंगवरही दिसून येत आहे.शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनाही भूमिपूजन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंसंदर्भात एक ट्विट केलं आहे. येथे वाचा सविस्तर वृत्त

11:06 (IST)05 Aug 2020
‘प्रभू रामचंद्रांच्या कृपेमुळे…’; राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याविषयी चेतन भगत यांचं ट्विट

अयोध्येमध्ये आज दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते भव्य राम मंदिर निर्माणाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे. यामध्येच प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांनीदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून देशातील जनतेचं अभिनंदन केलं आहे. सविस्तर वाचा: 

10:50 (IST)05 Aug 2020
कोल्हापूर : राम मंदिर भूमिपूजनानिमित्त करवीर निवासिनी महालक्ष्मीचे मंदिरही सजले

अयोध्येत आज (दि.५) राम मंदिराचे भूमिपूजन होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिरात आज विशेष पूजेचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने मंदिराची खास सजावट करण्यात आली असून मंदिर रंगीबेरंगी प्रकाशाने उजळून गेले आहे.