श्रीलंकेतील तामिळींवर होत असलेल्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार आयोगात अमेरिकेतर्फे मांडण्यात येणाऱ्या ठराव श्रीलंकेने धुडकावला आहे. श्रीलंकेची प्रतिमा मलिन करण्यासाठी तसेच श्रीलंकेला एकटे पाडण्यासाठी तयार करण्यात आलेल्या या ठरावाचा अंतिम मसुदा आम्हाला मंजूर नाही, असे स्पष्ट प्रतिपादन श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री जी. एल. पेईरीस यांनी बुधवारी येथे केले. या ठरावावर श्रीलंकेची भूमिका स्पष्ट करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. श्रीलंकेतील तामिळींवर होणाऱ्या अत्याचारांना पायबंद घालण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार आयोगाच्या बैठकीत आज अमेरिकेतर्फे एक ठराव मांडण्यात येणार आहे. या ठरावाचा अंतिम मसुदा श्रीलंकेला यापूर्वीच पाठविण्यात आला आहे. भारताने गेल्या वर्षी अशाच प्रकारच्या ठरावादरम्यान आमच्या बाजूने मतदान केले होते. यंदाही भारत आमची भूमिका समजून घेऊन आमच्याच पारडय़ात मत टाकेल’ असे पेईरीस यांनी सांगितले. श्रीलंकेतील शांतता ज्यांना पुन्हा धोक्यात आणायची आहे, त्यांना या ठरावामुळे नवे बळच मिळेल. अतिशय चुकीच्या माहितीच्या आधारे हा ठराव तयार करण्यात आला आहे, असेही ते म्हणाले.
संग्रहित लेख, दिनांक 21st Mar 2013 रोजी प्रकाशित
अमेरिकेचा ठराव श्रीलंकेला अमान्य
श्रीलंकेतील तामिळींवर होत असलेल्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार आयोगात अमेरिकेतर्फे मांडण्यात येणाऱ्या ठराव श्रीलंकेने धुडकावला आहे.
First published on: 21-03-2013 at 04:39 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Resolution of america unacceptable by shrilanka