गुलाम अलींचा दिल्लीतील कार्यक्रमही उधळून लावण्याचा शिवसेनेचा इशारा

पाकिस्तानी गझल गायक गुलाम अलींची नवी दिल्लीतील गझल मैफलही उधळून लावू, असा इशारा शिवसेनेने दिला आहे.

Gulam Ali Concert, ज्येष्ठ गझल गायक गुलाम अली

पाकिस्तानी गझल गायक गुलाम अलींची नवी दिल्लीतील गझल मैफलही उधळून लावू, असा इशारा शिवसेनेने दिला आहे. शिवसेनेच्या दिल्ली शाखेने हा इशारा दिल्याचे कळते. याआधी महाराष्ट्रात मुंबई व पुणे येथील गुलाम अलींचे कार्यक्रम शिवसेनेच्या विरोधानंतर आयोजकांना रद्द करावे लागले होते.
गुलाम अलींचे मुंबई आणि पुण्यातील कार्यक्रम रद्द झाल्यनांतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुलाम अलींना नवी दिल्लीत व कोलकाता येथे मैफलीचे निमंत्रण दिले होते. यापैकी गुलाम अली यांनी अरविंद केजरीवाल यांचे निमंत्रण स्वीकारले होते. मात्र, आता दिल्ली राज्यप्रमुख मंगतराम मुंडे यांनी इशारा दिला आहे की, दिल्लीतच नव्हे, तर देशात कुठेही पाकिस्तानी कलावंतांचे कार्यक्रम होऊ देणार नाही. केवळ गुलाम अलींनाच नव्हे तर कोणत्याही पाकिस्तानी कलाकाराला भारतात कार्यक्रम करू देणार नाही तसेच पाकिस्तानी क्रीडापट्टूंना देशात खेळू देणार नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Shiv sena ban on ghulam alis show in delhi

Next Story
बराक ओबामा यांची रोम्नींवर टीका
ताज्या बातम्या