तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मुलांच्या सुरक्षेसाठी योग्य पावले उचला; लसीकरणाच्या वेगाबाबत सोनिया गांधीनी व्यक्त केली चिंता

लसीकरणाबाबत संकोच दूर करण्यासाठी आणि लसीचा अपव्यय टाळण्यासाठी काम करा; सोनिया गांधीचा काँग्रेस सदस्यांना सल्ला

Sonia Gandhi urges Congress party workers to address Covid vaccine hesitancy prepare for third wave
सोनिया गांधी यांनी देशातील लसीकरणाच्या गतीबद्दल चिंता व्यक्त केली. (Express Photo by Tashi Tobgyal/File)

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी गुरुवारी पक्षाचे सरचिटणीस आणि प्रदेश प्रभारी यांच्यासोबत करोना परिस्थितीबाबत चर्चा करण्यासाठी बैठक घेतली. बैठकी दरम्यान त्यांनी देशातील लसीकरणाच्या गतीबद्दल चिंता व्यक्त केली. देशात करोनाच्या तिसर्‍या लाटेची शक्यता लक्षात घेता मोठ्या प्रमाणात तयारी करण्यासोबत विशेषतः मुलांच्या सुरक्षेसाठी योग्य पावले उचलण्याची गरज आहे असे सोनिया गांधी म्हणाल्या.

रोजच्या लसीकरणाचे दर तीनपट करावे लागतील, जेणेकरून वर्षाच्या अखेरीस ७५ टक्के लोकांचे संपूर्ण लसीकरण होऊ शकेल. हे लसींचा पुरवठा व साठा यावर पूर्णपणे अवलंबून आहे यात काही शंका नाही. आपण केंद्र सरकारवर दबाव कायम ठेवला पाहिजे असे सोनिया गांधी म्हणाल्या. या बैठकीत सोनिया गांधी यांनी पक्षाच्या सरचिटणीसांना लसीकरणाबाबत असलेले गैरसमज दूर करण्यासाठी काम करण्यास सांगितले तसेच लसींचा अपव्यय कमी होण्यासाठी काळजी घेण्यास सांगितले.

करोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारला मदत करण्याच्या हेतूने काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली आहे. त्यानंतर ही बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये करोनाच्या दुसऱ्या लाटेला हाताळताना झालेल्या चुकांचा उल्लेख केला होता. तिसऱ्या लाटेचा सामना करताना नेमकं काय करण्याची गरज आहे याची माहिती यामध्ये देण्यात आली होती. तिसरी लाट आल्यास आपली प्रतिक्रिया काय असावी याची ही ब्ल्यूप्रिंट असल्याचं राहुल गांधी यांनी सांगितलं होतं.

Covid 19:…तुमचे अश्रू जीव वाचवू शकत नाहीत; राहुल गांधींचा नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल

“तिसरी लाट येणार हे स्पष्ट आहे. विषाणू सतत बदलत असून सरकारला पुढील मार्ग सुचवावा हाच या श्वेतपत्रिकेचा हेतू आहे. आम्ही तज्ज्ञांशी चर्चा केली असून हे चार खांब विकसित केले आहेत. यामध्ये लसीकरण हा मुख्य खांब आहे. आक्रमकपणे आणि १०० टक्के लसीकरण करणं अत्यंत महत्वाचं आहे. सरकार पूर्णपणे तयार असलं पाहिजे. रुग्णालयं, ऑक्सिजन, औषधं या सर्व गोष्टी उपलब्ध असलं पाहिजे,” असा सल्ला राहुल गांधींनी दिला होता.

“तर दुसरा खांब श्वेतपत्रिका आहे ज्यामध्ये रुग्णांसाठी गरज असणारी औषधं, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स, बेड्स उपलब्ध आहेत याची खातरजमा करणं आहे. तिसऱ्या लाटेसाठी सरकारने तयार असणं गरजेचं आहे यावर जोर देताना राहुल गांधी यांनी याचा अर्थ दुसऱ्या लाटेत झालेल्या चुका समजून घेत त्या दुरुस्त करणं,” असल्याचं म्हटलं होतं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sonia gandhi urges congress party workers to address covid vaccine hesitancy prepare for third wave abn

ताज्या बातम्या