करोना संसर्गाचे युरोप पुन्हा केंद्र होऊ शकते, जागतिक आरोग्य संघटनेनचा युरोपला इशारा

जागतिक आरोग्य संघटनेचे युरोपचे विभागीय संचालक डॉ हांस क्लाज यांचा इशारा, लशींचा पुरेसा साठा असून सुद्धा लसीकरण होत नसल्याबद्द्ल व्यक्त केली नाराजी

करोना संसर्गाबाबत युरोप हे पुन्हा एकदा जगाचे मुख्य केंद्र होऊ शकतं असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेचे युरोपचे विभागीय संचालक डॉ हांस क्लाज यांनी दिला आहे. युरोपममधील ५३ देशांमध्ये गेल्या एक महिन्याचा आढावा घेतला तर करोना संसर्गाचे प्रमाण दुप्पट झाले आहे. ही परिस्थिती अशीच राहीली तर पुन्हा एकदा गेल्या वर्षाप्रमाणे करोना संसर्गाची स्थिती ही युरोपमध्ये निर्माण होऊ शकते डॉ हांस क्लाज यांनी स्पष्ट केलं आहे.

युरोपमधील देशांकडे पुरेसा लशींचा साठा आहे. मात्र म्हणावं तसं लसीकरण झालेलं नाही. उलट काही देशांमध्ये ४० टक्के पण लसीकरण झालेलं नाही. असं असतांना विकसनशील देशांना लस पाठवल्या जात आहेत. तेव्हा उपलब्ध लसींद्वारे देशातील नागरीकांचे लसीकरण करावे, नाहीतर फेब्रुवारीपर्यंत परिस्थिती चिघळेल असं मत जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केलं आहे.

करोनाची लस उपलब्ध झाल्यावर नियम पाळण्यात लोकांमध्ये बेफिकीरपणा आलेला आहे. करोनाच्या नियमित चाचण्या करणे, करोना बाधित व्यक्तीशी संपर्कात आलेल्यांचा शोध घेणे, घरात वायुवीजन व्यवस्था योग्य ठेवणे हे करणे आवश्यक आहे. विशेषतः हिवाळा सुरु होत असल्याचा पार्श्वभुमिवर सतर्क रहाणे आवश्यक असल्याचं मत जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केलं आहे.

मास्क घालणे, अंतर ठेवणे आणि हात धुणे

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: The world health organization warns europe on the way back to what it was a year ago about corona pandemic situation asj

Next Story
पेट्रोल, डिझेल, एलपीजी दरात पुढील आठवडय़ात वाढ?