scorecardresearch

“ श्रीनगरमध्ये कारवाईत मारले गेलेले दोन व्यावसायिक करत होते दहशतवाद्यांची मदत ”

पोलिसांनी दिली माहिती ; मेहबुबा मुफ्ती यांनी केली चौकशीची मागणी

“ श्रीनगरमध्ये कारवाईत मारले गेलेले दोन व्यावसायिक करत होते दहशतवाद्यांची मदत ”
(संग्रहित प्रातिनिधिक छायाचित्र)

श्रीनगरमध्ये लष्कराकडून दहशतवाद्यांविरोधात राबवण्यात आलेल्या ऑपरेशनमध्ये दोन व्यावसायिकांसह चार जणांचा मृत्यू झाला. हे ऑपरेशन जवानांना पार पाडले. पोलिसांनी सांगितले की, या ऑपरेशनमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा झाला, याशिवाय मारल्या गेलेल दोन व्यावसायिकांची मदत करत होते. सोमवारी सायंकाळी हैदरपुरामध्ये केल्या गेलेल्या या ऑपरेशनमध्ये डॉ. मुदसिर गुल आणि अल्ताफ भट्ट यांचे एका कॉम्प्लेक्समध्ये दुकान होते. डेंटल सर्जन मुदस्सिर गुल या कॉम्प्लेक्समध्ये कॉम्प्यूटर सेंटर चालवत होता. तर, अल्ताफ या कॉम्प्लेक्सचा मालक होता आणि तिथे हार्डवेअर आणि सिमेंटचं दुकान देखील चालवत होता.

एनडीटीव्हीने याबाबत वृत्त दिले आहे. दुसरीकडे जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी व्यावसायिकांच्या मृत्यूचे खरे कारण समोर आणण्यासाठी चौकशी आयोगाकडून चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यांनी ट्विट करत सांगितले की, ”निर्दोष नागरिकांना मानव ढालीच्या रुपात वापर करणे, चकमकीत त्यांची हत्या करणे आणि नंतर त्यांना सहजपणे ओव्हरग्राउंड वर्कर ऑफ टेररिस्ट म्हणून दर्शवणं आता भारत सरकराचा नित्याचा भाग झाला आहे. हे आवश्यक आहे की सत्य समोर आणण्यासाठी विश्वसनीय न्यायीक तपास केला जावा आणि दंडाच्या या अनियंत्रित संस्कृतीला समाप्त केलं जावं.”

तर, व्यावसायिकांच्या नातेवाईकांनी आरोप केला आहे की जवानांनी मारलं आहे. मात्र पोलिसांचे म्हणणे आहे की हे दोघंही दहशतवाद्यांच्या गोळीबारात किंवा चकमकीत मारले गेले. त्या व्यावसायिकांचे नातेवाईक अंत्यसंस्कारासाठी मृतदेहाची मागणी करत आहेत. पोलिसांचे म्हणणे आहे की कायदा व्यवस्था लक्षात घेऊन, ते मृतदेह त्या व्यावसायिकांकडे नाही सोपवू शकत. तसेच, पोलिसांनी सांगितले की चार मृतदेहांना श्रीनगरपासून १०० किलोमीटर दूर उत्तर काश्मीरमधील हंदवाडा भागात दफन केलं आहे.

काश्मीर पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी सांगितले की, मुदासिर जो कॉम्प्यूटर सेंटर चालवत होता, ते एक अनधिकृत कॉल सेंटर होते. ज्यामध्ये सहा कॉम्प्यूटर लावण्यात आले होते. कुमार यांनी हे देखील सांगितले, आम्ही मृतदेह दफन करण्यासाठी मुदासिर आणि अल्ताफच्या कुटुंबियांशी संपर्क साधला होता, कारण आम्ही कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने मृतदेह कुटुंबीयांकडे नाही सोपवू शकत होतो. आम्ही मृतदेह हंदवाडाला नेले व तिथे ते दफन केले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-11-2021 at 19:05 IST

संबंधित बातम्या