scorecardresearch

कुलगाममधील चकमकीत दोन दहशतवादी ठार

कुलगाम जिल्ह्यातील नवापोरातील मीर बाजारात बुधवारी सुरक्षा दलाबरोबर झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले.

indian army will cut soldiers
प्रातिनिधीक फोटो

जम्मू : कुलगाम जिल्ह्यातील नवापोरातील मीर बाजारात बुधवारी सुरक्षा दलाबरोबर झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. पोलिसांनी सांगितले की, संध्याकाळी दहशतवाद्यांबरोबर चकमक सुरू झाली. सुरक्षा दलाने दहशतवादी लपून बसलेल्या ठिकाणी बॉम्ब टाकले. यामध्ये दोन दहशतवादी ठार झाले. या वेळी मोठय़ा प्रमाणात शस्र्ो हस्तगत करण्यात आली.

चकमक झालेले ठिकाण हे अमरनाथ यात्रा मार्गाच्या जवळ आहे. या चकमकीचा संबंध कुलगामधील त्रुब्जी विभागात सोमवारी झालेल्या चकमकीबरोबर आहे. या वेळी दोन दहशतवादी ठार झाले होते, तर त्याच दिवशी तुलीबल भागातील सोपारे भागात सुरक्षा दलाने आणखी एका दहशतवाद्याला ठार केले होते. काश्मीर खोऱ्यात सुरक्षा दलाने या वर्षी ११८ दहशतवाद्यांना ठार केले. त्या पैकी ३२ परदेशी दहशतवादी होते, तर ७७ पाकिस्तान पुरस्कृत लष्कर ए तय्यबा आणि २६ जैश ए महम्मद या दहशतवादी संघटनेचे होते.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Two militants killed clashes kulgam security with force ysh

ताज्या बातम्या