scorecardresearch

Premium

VIDEO : १७ दिवस बोगद्यात, बाहेर आल्यानंतर मजूर म्हणाला, “ढिगारा कोसळल्यानंतर १० ते १५ तास…”

१२ नोव्हेंबरला चारधाम यात्रेच्या मार्गावरील निर्माणाधीन बोगद्याचा काही भाग कोसळल्यामुळे तब्बल ४१ मजूर अडकून पडले होते.

uttarakhand Silkyara tunnel rescue
बोगद्यातून बाहेर आल्यानंतर विश्वजित कुमार वर्मा या मजुराने प्रतिक्रिया दिली आहे. ( लोकसत्ता ग्राफिक्स टीम )

उत्तराखंडमधील सिलक्यारा बोगद्यात दोन आठवड्यांपेक्षा अधिक काळ अडकून पडलेल्या ४१ मजुरांची सुखरूप सुटका करण्यात मंगळवारी यश आलं. विविध यंत्रणांचा सहभाग असलेल्या या बचावकार्याची रात्री आठच्या सुमारास सांगता झाली. मोहिमेच्या अंतिम टप्प्यात ‘रॅट होल मायनिंग’ तंत्राचा वापर करून मजुरांपर्यंत पोहोचणे शक्य झाले. त्यानंतर चाके असलेल्या स्ट्रेचरच्या मदतीने मजुरांना बाहेर काढण्यात आले.

१२ नोव्हेंबरला चारधाम यात्रेच्या मार्गावरील निर्माणाधीन बोगद्याचा काही भाग कोसळल्यामुळे तब्बल ४१ मजूर अडकून पडले होते. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), उत्तराखंडचे राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ), बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (बीआरओ) यांच्यासह अनेक यंत्रणांच्या हजारो अधिकारी-कर्मचाऱ्यांनी केलेल्या अथक प्रयत्नांना मंगळवारी यश आले.

Fraud online booking tadoba
ताडोबात ऑनलाईन बुकिंगच्या नावाने फसवणूक, एक अटकेत; दुर्गापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
two dead after bike rams into divider on lalbaug flyover
मुंबईः लालबाग उड्डाणपुलावर अपघातात दोघांचा मृत्यू
Investigation of theft of gold silver vehicle nashik
सोने, चांदीच्या वाहनावरील दरोड्याचा तपास
nagpur mahavitaran marathi news, 2 outsourced employees beaten up marathi news
ऊर्जामंत्र्यांच्या शहरात महावितरणच्या दोन बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यांची एकाला मारहाण…

हेही वाचा :  “आम्ही अडकलो तेव्हा सुरुवातीचे २४ तास…”, कामगाराने सांगितला ‘तो’ अनुभव

बोगद्यातून बाहेर आल्यानंतर विश्वजित कुमार वर्मा या मजुराने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘एएनआय’शी बोलताना विश्वजित कुमार वर्माने सांगितलं, “बोगदा कोसळल्यानंतर वाटलं की, बाहेर निघण्याचे सर्व मार्ग बंद झाले. पण, आम्हाला बाहेर काढण्यासाठी कंपनीकडून सर्व प्रयत्न करण्यात येते होते. ऑक्सिजन आणि खाण्या-पिण्याच्या गोष्टींची व्यवस्था करण्यात आली होती. विदेशातून यंत्रणा मागवण्यात आल्या होत्या.”

हेही वाचा : १७ दिवस, ४१ कामगार; उत्तरकाशी ऑपरेशनमध्ये ‘या’ ऑस्ट्रेलियन व्यक्तीची ठरली मोलाची मदत

“बोगदा कोसळल्यानंतर १० ते १५ तास थोड्या अडचणी जाणवल्या. मात्र, पाण्याच्या पाईपमधून आम्हाला जेवण मिळत होतं. त्यानंतर दुसऱ्या पाईपच्या माध्यमातून जेवण, काजू, बदाम आम्हाला देण्यात आलं. तसेच, बोगद्यात अडकलेलो असताना कुटुंबियांशी बोलणं होतं होते,” असंही विश्वजित कुमार वर्माने म्हटलं.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Uttarakhand silkyara tunnel rescue operation worker vishwajeet kumar verma reaction ssa

First published on: 29-11-2023 at 10:49 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×