News Flash

EPFO खातेदारांसाठी मोठी बातमी! १ जूनपासून PF अकाऊंटवर लागू होणार ‘हा’ नियम; दुर्लक्ष केल्यास होऊ शकतं नुकसान

कर्मचारी भविष्य निर्वाह संस्थेने (EPFO) आपल्या खातेधारकांसाठी नियमांत काही बदल केले आहेत

प्रातिनिधिक

EPFO New Rule: कर्मचारी भविष्य निर्वाह संस्थेने (EPFO) आपल्या खातेधारकांसाठी नियमांत काही बदल केले आहेत. जर आपण नोकरदार असाल तर हा बदल समजून घेणं तुमच्यासाठी महत्वाचं आहे. हा नवा नियम काय आहे? तसंच याचा EPF मधील योगदानावर काय परिणाम होणार आहे? हे समजून घ्या. हा नियम उद्या म्हणजेच १ जूनपासून लागू होणार असून तुमच्याकडे फक्त आजचा दिवस आहे.

PF खातं आधारसोबत लिंक करणं गरजेचं
कर्मचारी भविष्य निर्वाह संस्थेच्या नव्या नियमानुसार प्रत्येक खातेधारकाचं पीफ खातं आधारसोबत लिंक असणं गरजेचं आहे. आपल्या कर्मचाऱ्यांनी पीएफ खातं आधारच्या मार्फत लिंक करावं यासाठी त्यांना माहिती देण्याची जबाबदारी कंपनीकडे असेल. जर कर्मचाऱ्याने असं केलं नाही तर त्याला नुकसान सहन करावं लागण्याची शक्यता आहे. जसं की कंपनीकडून पीएफ खात्यात दिलं जाणारं योगदान थांबवलं जाऊ शकतं. कर्मचारी भविष्य निर्वाह संस्थेने यासंबंधी परिपत्रक प्रसिद्ध केलं आहे.

काय आहे नवा नियम?
सोशल सेक्युरिटी कोड २०२० (Social Security Code) च्या कलम १४२ अंतर्गत कर्मचारी भविष्य निर्वाह संस्थेकडून नवे नियम लागू करण्यात आले आहेत. ज्यामध्ये स्पष्टपणे जर एखादं पीएफ खातं आधारसोबत लिंक नसेल तर त्याचा ECR – इलेक्ट्रॉनिक चलान कम रिटर्न (Electronic Challan cum Return) भरला जाणार नाही. याचा अर्थ असा की, पीएफ खातेधारकाला कंपनीचा भाग मिळणार नाही. खात्यामध्ये कर्मचाऱ्यांना फक्त आपल्याकडून होणारं योगदानच दिसेल.

EPF अकाऊंटला आधारशी लिंक कसं करायचं?
जर तुम्ही अद्यापही आपलं पीएफ खातं आधारसोबत लिंक केलं नसेल तर EPFO च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन सर्वात प्रथम आधारसोबत लिंक करा आणि UAN देखील आधार व्हेरिफाईड करुन घ्या. यामुळे आपल्या खात्यात आधीप्रमाणे पीएफ योगदान कोणत्याही अडथळ्याविना सुरु राहील.

१) सर्वात प्रथम EPFO ची वेबसाईट www.epfindia.gov.in वर लॉग इन करा.
२) यानंतर Online Services वर जाऊन e-KYC Portal आणि नंतर link UAN aadhar वर क्लिक करा.
३) तुम्हाला तुमचा UAN क्रमांक आणि UAN अकाऊंटवरुन रजिस्टर मोबाइल नंबर अपलोड करायचा आहे.
४) तुमच्या मोबाइल नंबरवर OTP क्रमांक येईल.
५) आधारच्या बॉक्समध्ये आपला १२ डिजिट आधार क्रमांक भरा आणि सबमिट करा.
६) यानंतर Proceed to OTP verification पर्याय येईल त्यावर क्लिक करा.
७) यानंतर आधारची माहिती पडताळण्यासाठी आधारशी जोडला असलेला मोबाइल क्रमांक किंवा मेलवर ओटीपी जनरेट करावा लागेल.
८) पडताळणी केल्यानंतर तुमचं आधार पीएफ खात्यासोबत लिंक होईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2021 10:34 am

Web Title: epfo new rule to link adhar card to epf account sgy 87
Next Stories
1 Explained : आपल्या जेवणातलं तेल भरमसाठ महागलं! पण नेमकं असं झालं तरी का?
2 पदोन्नती आरक्षण : नेमका वाद काय? कधीपासून दिलं गेलं हे आरक्षण? कायदा काय सांगतो? जाणून घ्या!
3 समजून घ्या : कोठे आणि कसं पाहणार चंद्रग्रहण, ग्रहणासंबंधित संपूर्ण माहिती
Just Now!
X