ओडीशाच्या बालासोरमध्ये झालेल्या अपघाताने सर्वत्र खळबळ उडाली होती. काही रुग्णांना तात्काळ उपचाराची सुविधा न मिळाल्याने त्यांच्या दुर्देवी मृत्यू झाला. त्यानंतर अनेक सवाल उपस्थित करण्यात आले. आपातकालिन परिस्थितीत रुग्णांना तात्काळ मदत करता येईल, अशी सुविधा रेल्वेकडे नाही का? असाही प्रश्न समोर आला आहे. भारताकडे जगातील पहिली हॉस्पिटल ट्रेन आहे. ही एक प्रकारची स्पेशल ट्रेन आहे. ज्याचा वापर भारतीय रेल्वे काही महत्वाच्या वेळी करत असते. या ट्रेनचा खासियत काय आहे? तसंच या ट्रेनचा वापर केव्हा केला जातो? याबाबत जाणून घेऊयात सविस्तर माहिती.

कोणती आहे ही ट्रेन?

भारतीय रेल्वेच्या या विशेष ट्रेनचा नाव आहे, लाइफलाइन एक्स्प्रेस. या ट्रेनच्या माध्यमातून भारतीय रेल्वे देशाच्या त्या ठिकाणी आरोग्यासंबंधीत मदत पोहोचवते, जिथे रुग्णालय नाही आहेत किंवा जिथे सहजरित्या औषधे किंवा डॉक्टर पोहोचू शकत नाहीत. ही ट्रेन पूर्णपणे हॉस्पिटलसारखी डिजाईन केलेली आहे. यामध्ये रुग्णांसाठी बेडची सुविधा आहे. आधुनिक मशिन आहे. ऑपरेशन थिएटर आहे आणि आरोग्य कर्मचारी आहेत. या ट्रेनच्या प्रत्येक कोचमध्ये तुम्हाला पॉवर जनरेटर, मेडिकल वार्ड, पॅंट्री कार आणि मेडिकल सुविधा मिळतील.

eco friendly engineering consultancy ztech india ipo to launch on may 29
पर्यावरण-स्नेही अभियांत्रिकी सल्लागार ‘झेड टेक’चा बुधवारपासून ‘आयपीओ’
Xiaomi Cinematic Vision launch its first 14 Civi rebranded Civi 4 Pro smartphone in India here is everything to know about it
Xiaomi भारतात आणणार दोन सेल्फी कॅमेराचा स्मार्टफोन; ब्लॉग, रिल्ससाठी ठरेल फायदेशीर; फीचर्स पाहा
Adani six shares at pre Hindenburg levels print eco news
अदानींचे सहा समभाग हिंडेनबर्ग-पूर्व पातळीवर; अदानी पोर्ट्सचा ‘सेन्सेक्स’मध्ये लवकरच समावेश
robbert
चिप-चरित्र: ‘एक अखेरचा प्रयत्न’..
Best Electric Car
Best Electric Car: ‘या’ इलेक्ट्रिक कार्सची सगळीकडे चर्चा, स्वस्त ते महाग; पाहा एकापेक्षा एकभारी गाड्या
TVS launches new affordable iQube base variant
बाकी कंपन्यांची उडाली झोप! TVS चा स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर देशात दाखल, सिंगल चार्जवर धावेल ‘इतके’ किमी, किंमत…
UK based drug maker AstraZeneca has recalled its global stock of the coronavirus vaccine
ॲस्ट्राझेन्काकडून कोविशिल्डचे साठे माघारी; दुष्परिणामांबाबत कबुलीनंतर कंपनीचे मोठे पाऊल
Mumbai Port Trust Bharti 2024 various vacant posts of Deputy Chief Engineer job location is Mumbai Read All Details
Mumbai Job Recruitment 2024 : मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये ‘या’ पदासाठी भरती; ८० हजारांहून अधिक पगार; जाणून घ्या अर्जाची पद्धत

नक्की वाचा – इवल्याशा सशाने महाकाय नागाची केली हवा टाईट पण फणा काढल्यानंतर घडलं असं काही…Video पाहून थक्क व्हाल

या ट्रेनला कधी आणि केव्हा चालवलं?

या ट्रेनला भारतीय रेल्वेने वर्ष १९९१ मध्ये चालवलं आहे. सुरुवातीच्या दिवसापासूनच या ट्रेनचे सर्व कोच वातानुकूलित होते. ज्या लोकांना सहजरित्या रुग्णालयात पोहोचता येऊ शकत नाही, त्या लोकांसाठी या ट्रेनला चालवलं जातं. जी माणसं देशाच्या कानाकोपऱ्यात दूर ठिकाणी राहतात, तसेच जे लोक गरीब आहेत आणि उपचारासाठी दिल्ली किंवा मुंबईत जाऊ शकत नाहीत. खासकरून दिव्यांग लोकांसाठी ही मोठी समस्या होती. भारत सरकारने अशाच लोकांसाठी अशी एक ट्रेन बनवली जी रुग्णांजवळ जाऊन त्यांना चांगलं उपचार देऊ शकेल. भारतीय रेल्वे बोर्डाच्या रिपोर्टनुसार, या हॉस्पिटल ट्रेनच्या मदतीने १२ लाख लोकांवर उपचार करण्यात आले आहेत.