भारतातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांना इन्स्टाग्रामवर मिलियन युजर्स फॉलो करतात. यात तुम्ही देखील एक असालचं ना… रतन टाटा स्वत: सोशल मीडियावर फारसे सक्रिय नसले तरी देशभरातील जवळपास सर्व स्तरातील लोकं त्यांना फॉलो करतात. यामुळे रतन टाटा सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलोवर्स असलेले भारतीय उद्योगपती ठरले आहेत. रतन टाटा यांच्या इन्स्टाग्रामवरील फॉलोवर्सची संख्या जवळपास ८.५ मिलियन इतकी आहे. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, त्यांचे इन्स्टाग्रामवर एवढे फॉलोवर्स असतानाही ते फक्त एकाच खास अकाउंटला फॉलो करतात. त्यामुळे रतन टाटा इन्स्टाग्रामवर फॉलो करत असलेली तो खास युजर कोण आहे जाणून घेऊ…

रतन टाटा हे भारतातील सर्वात नामवंत उद्योगपती म्हणून ओळखले जातात. त्यांच्या टाटा ट्रस्टची गोष्ट अनेकांना माहितचं असेल. जमशेदजी टाटा यांनी उभा केलेला टाटा उद्योग समूह आता रतन टाटा यांनी भारतासह जगभरात पोहोचवला, ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब आहे. त्यामुळे रतन टाटा यांचे विचार, कर्तृत्व अनेकांना प्रेरणादायी आहे. रतन टाटा त्यांच्या आयुष्यातील अनेक आठवणी इन्स्टाग्रामवर शेअर करत असतात. त्यांच्या प्रत्येक फोटो आणि व्हिडीओवर लाईक्स येतात. पण तुम्हाला माहित आहे का, इन्स्टाग्रामवर ८.५ मिलियन फॉलोवर्स असलेले रतन टाटा हे टाटा ट्रस्ट या धर्मादाय संस्थेलाच फॉलो करतात.

WhatsApp Soon Allow Users To update With privately mention contacts in status updates maintaining user privacy
व्हॉट्सॲपच्या स्टेटसमध्ये इन्स्टाग्राम फीचर; फोटो, व्हिडीओ टाकताना मिळणार ‘ही’ खास सोय; ‘असा’ करा वापर
iral Video Shows Woman Police Officer Dancing On Railway Station
रेल्वे स्टेशनवर पोलिसांच्या गणवेशात नाचणाऱ्या तरुणीचा Video Viral! नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
8 point 85 percent interest rate on fixed deposits by Bajaj Finance
बजाज फायनान्सतर्फे मुदत ठेवींवर ८.८५ टक्के व्याजदर
Taiwan Earthquake
Taiwan Earthquake : भूकंपाची चाहूल लागताच कुत्र्याने घरातल्या लोकांना केले सावध, तैवान येथील भूकंपाचा व्हिडीओ व्हायरल

आठवडय़ाची मुलाखत : ‘टाटा ट्रस्ट’ला ‘टाटा सन्स’कडून मिळणारा लाभांश हेच उत्पन्न

टाटा ट्रस्ट ही रतन टाटा यांच्या मालकीची आहे. या संस्थेची स्थापना १९१९ मध्ये झाली. टाटा ट्रस्ट हे भारतातील सर्वात जुने एंडॉवमेंट फाउंडेशन आहे. कल्याणकारी कामांसाठी निधीची कमतरता भासू नये म्हणून या संस्थेची स्थापना करण्यात आली. टाटा समूहातील सर्व कंपन्यांमध्ये टाटा सन्स ही प्रमुख गुंतवणूकदार आहे. तिचा ६६ टक्के हिस्सा हा टाटा ट्रस्टकडे आहे. या शेअरचा लाभांश टाटा ट्रस्टला येतो जेणेकरून धर्मादाय निधीची कमतरता भासू नये.टाटा ट्रस्टच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य आणि संस्कृती अशा विविध क्षेत्रात काम केले जात आहे.

रतन टाटांनी तीन वर्षांपूर्वी आपलं इन्स्टाग्राम अकाउंट ओपन केलं. तेव्हापासून त्यांच्या फॉलोवर्सच्या संख्येत झपाट्याने वाढ होतेय. इन्स्टावरील त्यांचे फोटो, व्हिडीओ अनेकदा चर्चेचा विषय ठरतो. रतन टाटा कधी बालपणाचे, कधी तरुण वयातील तर कधी आपल्या आयुष्यातील एचिव्हमेंट्सबद्दल अनेक फोटो व्हिडीओ शेअर करत असतात. तर कधी चाहत्यांसोबतच्या आठवणी, गोष्टी शेअर करतात. केव्हा तरी त्यांच्या आवडीचा मेसेज, कोट्स देखील ते शेअर करतात.

अलीकडे त्याच्या तरुण वयातील एक फोटो तुफान व्हायरल झाला होता, ज्याला १० लाखांच्यावर लाईक्स आणि शेअर्स होते. तर मध्यंतरी त्यांनी भावासोबतचाही एक फोटो शेअर केला होता ज्यावर लाईक्सचा पूर आला होता. त्यांच्या प्रत्येक फोटोंना लाखोंचा घरात लाईक्स असतात.