scorecardresearch

‘या’ गावातील लोकांची उंची फक्त ७ वर्षापर्यंत वाढते; प्रत्येक जण आहेत फक्त २-३ फुटाचे

या गावात फक्त २ ते ३ फुटांची माणसं अनेकदा दिसतात. शास्त्रज्ञांनीही इथे खूप संशोधन केले, पण इथे माणसांची उंची का वाढत नाही यामागचे कारण कोणालाच कळू शकले नाही.

Village Of Dwarves People,
फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम

Village Of Dwarves: जग विचित्र लोक आणि रहस्यमय ठिकाणांनी भरलेले आहे. काही ठिकाणं इतकी रहस्यमय आहेत की त्यांच्याबद्दल जाणून घेऊन शास्त्रज्ञांनाही आश्चर्य वाटेल. आज आपण अशाच एका ठिकाणाविषयी सांगणार आहोत जिथे लोक जन्मापासून तर ठीक असतात, पण वयाच्या सातव्या वर्षानंतर त्यांची उंची वाढणे थांबते. त्यामुळे येथील लोक फक्त बुटकेच राहतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे येथे राहणारे बहुतेक लोक बुटकेच आहेत. हे रहस्य आजपर्यंत शास्त्रज्ञांनाही समजू शकलेले नाही.

७ वर्षांनंतर उंचीच वाढत नाही..

चीनच्या शिचुआन प्रांतात एक गाव आहे, जिथे सर्व लोक बुटकी आहेत. असे म्हणतात की जन्माच्या वेळी मुले सामान्य असतात, जसजशी त्यांची वाढ होते तसतशी त्यांची उंचीही वाढते, परंतु ७ वर्षानंतर उंची वाढणे थांबते. तसे, काही मुलांची लांबी १० वर्षापर्यंत वाढते. परंतु, त्यापैकी बहुतेकांची उंची ७ वर्षांनंतर वाढणे बंद होते. लांबी न वाढल्याने या गावाला शापित म्हटले जाते.

कोणालाच कारण माहीत नाही..

हे गाव केवळ चीनसाठीच नाही तर संपूर्ण जगासाठी एक रहस्य आहे. शास्त्रज्ञांनीही इथे खूप संशोधन केले, पण त्यामागचे कारण कोणालाच कळू शकले नाही की इथे काय आहे ज्यामुळे माणसांची उंची वाढत नाही. या भागातील नैसर्गिक साधनसंपत्ती, इथले अन्न, पाणी यासह अनेक गोष्टींचा शास्त्रज्ञांनी शोध घेतला आहे, पण इथल्या लोकांची उंची का वाढत नाही हे कळू शकले नाही.

( हे ही वाचा: ‘हे’ आहे जगातील सर्वात महाग कापड; किंमत वाचून तुम्हालाही फुटेल घाम)

लोकांचे अनेक तर्क आहेत

या गावातील अर्ध्याहून अधिक लोक बुटकेआहेत. अनेकदा येथे फक्त २ ते ३ फूट लांबीचे लोक दिसतात. माणसे बुटकी असण्यामागे येथील लोकांचे अनेक तर्कवितर्क आहेत. काही लोक म्हणतात की हे गाव शापित आहे, तर काही लोक म्हणतात की काही दशकांपूर्वी आलेल्या एका आजाराने इथल्या सर्व लोकांना वेढले होते, त्यामुळे इथल्या लोकांची उंची वाढत नाही.

उंची न वाढवण्याचा वैज्ञानिक दृष्टिकोन काय आहे

या गावातील जमिनीत पाराचे प्रमाण जास्त असल्याचे येथे संशोधन करणाऱ्या काही शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळेच त्यात तयार झालेले धान्य खाल्ल्याने माणसांची उंची वाढत नाही. याशिवाय काही शास्त्रज्ञ सांगतात की बर्‍याच वर्षांपूर्वी जपानने येथे विषारी वायू सोडला होता, ज्यामुळे येथील लोक बुटकी आहेत.

मराठीतील सर्व FYI ( Do-you-know ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-03-2023 at 12:23 IST