News Flash

गौतम गंभीर म्हणतो माझ्याकडे एकच व्होटर ID !

माझ्यावर झालेल्या आरोपांमध्ये तथ्य नाही असे गंभीरने म्हटले आहे

माजी क्रिकेटपटू आणि भाजपाचे उमेदवार गौतम गंभीर यांनी पुन्हा एकदा आपल्याकडे एकच मतदान ओळखपत्र अर्थात व्होटर आयडी असल्याचं स्पष्ट केलं आहे. आपच्या उमेदवार आतिशी यांनी गौतम गंभीर यांच्यावर आरोप केले होते. ते खोडून काढत गौतम गंभीर यांनी माझ्याकडे एकच व्होटर आयडी असल्याचं स्पष्ट केलं आहे. तसेच ते राजेंद्र नगर येथील आहे असं गौतम गंभीर यांनी म्हटलं आहे.

टीम इंडियाच्या विश्वविजेत्या संघातील खेळाडू गौतम गंभीर यांनी नुकताच क्रिकेटच्या पिचवरुन राजकारणाच्या पिचवर प्रवेश केला. भाजपचे पूर्व दिल्लीतील उमेदवार म्हणून गौतम गंभीर यांना भाजपकडून तिकीट देण्यात आले. मात्र यानंतर लगेचच त्यांच्या विरोधात दोन वेळा मतदान यादीत नाव असल्याच्या आरोप करण्यात आलं असून या संदर्भात गुन्हा नोंदवण्यात आला. मात्र आपल्यावर झालेल्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नसल्याचं गौतम गंभीर यांनी म्हटलं आहे. तसेच आपल्याकडे एकच व्होटर आयडी असल्याचं स्पष्ट केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2019 7:25 pm

Web Title: i have only one voter id from rajendra nagar says gautam gambhir
Next Stories
1 ‘जेट’च्या कर्मचाऱ्यांसाठी ‘विस्तारा’चा मदतीचा हात; ५५० जणांना दिली नोकरी
2 गोमुत्रामुळे कर्करोग बरा, साध्वीचा प्रज्ञांचा दावा किती खरा?
3 मसूद अझहरप्रकरणी चीन नरमला; आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी चर्चेस तयार
Just Now!
X