पाच राज्यातल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत आहेत. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर, गोवा आणि पंजाब या पाच राज्यांपैकी चार राज्यांमध्ये भाजपाला मोठं यश मिळालं आहे. त्यानंतर भाजपा नेत्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. उत्तर प्रदेशात पहिल्यापासूनच भाजपा आघाडीवर असल्याने तिथे भाजपाचा विजय होऊन योगी आदित्यनाथ हेच सत्तेवर येणार असा विश्वास भाजपाकडून व्यक्त केला जात आहे.


पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनीही योगी आदित्यनाथ यांच्या विजयाबद्दल विश्वास व्यक्त केला असून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी हिंदीमध्ये एक ट्वीट केलं आहे. आपल्या ट्वीटमध्ये ते म्हणतात, “राजतिलक की करो तैयारी, आ रहे हैं भगवाधारी.” सोबतच त्यांनी योगी आदिथयनाथ यांचा विजयी मुद्रेतील फोटो पोस्ट करून त्यांचे अभिनंदन केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.


दरम्यान, पुण्यातल्या भाजपा कार्यकर्त्यांनी पाच राज्यातल्या भाजपाच्या कामगिरीबद्दल मोठा जल्लोष केला आहे. पाच राज्यातील निवडणुकीच्या निकालामध्ये ४ राज्यात भाजपने केलेल्या कामगिरीमुळे पुण्यातील भाजपाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करत आनंद व्यक्त केला. पुण्यातील नळ स्टॉप येथे भाजपा कार्यकर्त्यांनी बुलडोजरवरून साखर आणि पेढे वाटप केले. यावेळी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि जल्लोष पहायला मिळाला.
दरम्यान, आज देशातल्या पंजाब, उत्तर प्रदेश, मणिपूर, उत्तराखंड आणि गोवा या पाच राज्यांमधल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. यामध्ये पंजाब वगळता सर्वच राज्यामध्ये भाजपा आघाडीवर आहे. त्यामुळे देशभरातल्या भाजपा कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष आहे.