Revanth Reddy : महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर आम्ही मुस्लिमांना आरक्षणात विशेष कोटा देणार आहोत अशी घोषणा तेलंगणचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी केली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार आज संध्याकाळी थंडावणार आहे. त्याआधी रेवंथ रेड्डी ( Revanth Reddy ) यांनी हे वक्तव्य केलं आहे.

काय म्हटलं आहे रेवंथ रेड्डींनी?

तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी ( Revanth Reddy ) म्हणाले, “आमचं सरकार महाराष्ट्रात आल्यानंतर आम्ही विधानसभेत आरक्षणात मुस्लिम कोटा ठेवण्याबाबत चर्चा करणार आहोत. तेलंगणामध्ये आम्ही चार टक्के कोटा दिला आहे. महाराष्ट्रात याबाबतचा निर्णय आम्ही घेऊ. आम्ही वाय. एस. राजशेखर रेड्डी मुख्यमंत्री असताना सोनिया गांधींच्या नेतृत्वात ४ टक्के कोटा देण्याचा निर्णय घेतला होता. आम्ही ११ हजार शिक्षकांच्या नियुक्त्या केल्या होत्या तेव्हा ७२० मुस्लिम शिक्षकांना नोकरी मिळाली होती. न्याय आणि हक्क प्रत्येकाला मिळाले पाहिजेत यात शंकाच नाही. त्यामुळेच राहुल गांधींनी कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत भारत जोडो यात्रा काढली होती. ” असं रेवंथ रेड्डी ( Revanth Reddy ) यांनी म्हटलं आहे.

Image Of Supriya Sule And Ajit Pawar
Supriya Sule : “मी बोलते, पण अजित पवार माझ्याशी…”, पवार कुटुंबीयांतील दुराव्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Anna Bansode statement over Sharad Pawar praise RSS
Sharad Pawar: मविआचं पुढं काय होणार? राष्ट्रवादीचे खासदार महायुतीत जाणार? शरद पवारांनी केलं स्पष्ट; म्हणाले…
Supriya Sule At Press Conference.
Supriya Sule : सुप्रिया सुळेंचं वक्तव्य, “नैतिकता सांभाळून धनंजय मुंडेंनी राजीनामा….”
jitendra awhad sharad pawar (1)
शरद पवारांकडून RSS चं कौतुक, भाजपाशी जवळीक वाढल्याची चर्चा; आव्हाड म्हणाले, “आम्ही संघाच्या विचारसरणीचं…”
Hasan Mushrif
Hasan Mushrif : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत हसन मुश्रीफ यांचं विधान चर्चेत; म्हणाले, “आता पुढील निवडणुकीच्या…”
What Suresh Dhas Said About Munni?
Suresh Dhas : सुरेश धस यांचं वक्तव्य; “मुन्नी म्हणजे राष्ट्रवादीतला एक पुरुष, त्या मुन्नीने कुठेही चर्चेला यावं, मी…”
What Bajrang Sonawane Said?
Bajrang Sonawane : अजित पवारांच्या पक्षाकडून ऑफर आली का? विचारताच बजरंग सोनावणे म्हणाले, “आम्ही आठही खासदार….”

अजित पवारांनी शरद पवारांबरोबर गद्दारी केली

शरद पवारांनी मुलीला महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात पद दिलं नाही. उलट पुतण्या अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपद दिलं आणि इतरही पदं दिली. तरीही अजित पवार यांनी शरद पवारांशी गद्दारी केली. शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसून अजित पवार मोंदीचे गुलाम झाले. अशोक चव्हाण यांनाही काँग्रेसने मुख्यमंत्रीपद दिलं होतं. त्यांच्या वडिलांनाही मुख्यमंत्री केलं होतं. त्यांनीही गद्दारी केली आणि मोदींचे गुलाम झाले असंही रेवंथ रेड्डी ( Revanth Reddy ) यांनी म्हटलं आहे.

विधानसभा निवडणूक दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक अवघी दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. निवडणुकीत काय होणार त्याची उत्सुकता लागली आहे. आज प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. महाराष्ट्रात यावेळची निवडणूक पूर्णपणे वेगळी होणार आहे. कारण महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सहा पक्षांचा सामना होणार आहे. आज सकाळी पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधी यांनी एक है तो सेफ है या मोदींच्या घोषणेची खिल्ली उडवली. महाराष्ट्राची तिजोरी म्हणजे सेफ आणि ती एक म्हणजे अदाणींना द्यायची आहे याचं सादरीकरण राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत तिजोरी आणून केलं आणि मोदी तसंच भाजपावर टीकाही केली. त्यानंतर आता रेवंथ रेड्डी ( Revanth Reddy ) यांचं हे वक्तव्य महत्त्वाचं मानलं जातं आहे.

Story img Loader