Mahatma became popular only after Gandhi movie ‘गांधी’ हा चरित्रात्मक चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी महात्मा गांधींना कोणीही ओळखत नव्हते, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आणि देशात वादाचा धुरळा उडाला. त्यांच्या विधानाच्या पार्श्वभूमीवर, गांधी चित्रपटापूर्वी जगभरात ज्ञात महात्मा गांधी यांच्याविषयी साक्ष देणाऱ्या काही संदर्भांचा घेतलेला हा आढावा.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका मुलाखतीत सांगितले की, महात्मा गांधींना यापूर्वी कोणीही ओळखत नव्हते आणि ‘गांधी’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच उर्वरित जगात त्यांच्याविषयी उत्सुकता निर्माण झाली. २९ मे रोजी एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत पीएम मोदी म्हणाले, “गेल्या ७५ वर्षात महात्मा गांधींची जगभरात ओळख करून देण्याची जबाबदारी आपली नव्हती का? मला माफ करा, पण महात्मा गांधींना कोणी ओळखत नव्हते. त्यांच्याबद्दलची उत्सुकता वाढली ती ‘गांधी’ चित्रपटानंतर.” मार्टिन ल्यूथर किंग आणि नेल्सन मंडेला त्यांच्यापेक्षा गांधीजी कमी नव्हते. गांधींच्या माध्यमातून गांधी आणि भारताला महत्त्व द्यायला हवे होते,” असे पंतप्रधान म्हणाले.

yogendra yadav
“लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे…”, योगेंद्र यादव यांचं मोठं विधान!
What Kangana Said?
कंगनाचा धक्कादायक दावा, “कोणतीही नवी हिरोईन आली की तिला दाऊदसमोर..”
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
Raghuram Rajan reuters
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाला तर…”, भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत माजी RBI गव्हर्नर रघुराम राजन यांचं मोठं वक्तव्य
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Updates in Marathi
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात काय आहे स्थिती? कुणाला मिळाला विजय; कोण आघाडीवर? जाणून घ्या…
devendra fadnavis analysis
“आपण तीन नाही, तर चार पक्षांशी लढत होतो, तो चौथा पक्ष म्हणजे…”; देवेंद्र फडणवीसांकडून लोकसभेतील निकालाचं विश्लेषण!
What Kiran Mane Said About Manusmruti?
“सुंदर स्त्री हीन जातीतली असली तरी तिला भोगण्यात…”, ‘मनुस्मृती’तलं वाक्य सांगत किरण मानेंची खरमरीत पोस्ट
rudra M 2 missile
शत्रूचे रडार भेदणार्‍या रुद्रम-२ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी; भारतासाठी या चाचणीचे महत्त्व काय?

अधिक वाचा: Martyrs’ Day 2024 महात्मा गांधी यांनी पाहिलेला पहिला हिंदी चित्रपट आणि राम यांचा नेमका काय संबंध आहे?

१९८२ साली ‘गांधी’ चित्रपट प्रदर्शित झाला

१९८२ साली राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जीवन प्रवासावर आधारित चरित्रात्मक चित्रपट प्रदर्शित झाला होता. गांधीजींच्या एकूण ७९ वर्षांपैकी ५६ वर्षांचा प्रवास या चित्रपटात दाखविण्यात आला आहे. या चित्रपटाचे मुख्य कथानक गांधीजींच्या अहिंसा या तत्त्वज्ञानाद्वारे त्यांनी ब्रिटिश साम्राज्याविरोधात कसा लढा दिला त्याविषयीचे आहे.

१९८३ साली ५५ व्या अकादमी पुरस्कारांमध्ये ‘गांधी’ या चित्रपटाने आठ ऑस्कर पुरस्कार पटकावले. चित्रपट दिग्दर्शक रिचर्ड ॲटनबरो यांना सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठी बाफ्टा पुरस्कार मिळाला. बाफ्टामध्ये या चित्रपटाला १६ वेळा नामांकन मिळाले, त्यापैकी पाच पुरस्कार जिंकले. शिवाय १९८३ साली बाफ्टा फेलोशिपही मिळाली.

१९८२ पूर्वी गांधीजी परिचित नव्हते का?

१९३७ साली ए. के. चेट्टियार यांनी महात्मा गांधींच्या जीवनावर आधारित एका माहितीपटावर काम करण्यास सुरुवात केली होती. १९५३ साली ‘Mahatma Gandhi: 20th Century Prophet’ हा अमेरिकन माहितीपट प्रदर्शित झाला. स्टॅनले नील यांनी या माहितीपटाचे दिग्दर्शन केले त क्वेंटिन रेनॉल्ड्स यांनी कथानक लिहिले होते. हा चित्रपट २८ एप्रिल १९५३ रोजी युनायटेड आर्टिस्ट्सने प्रदर्शित केला होता.

१९६३ साली, ब्रिटीश-अमेरिकन निओ नॉयर क्राइम ‘नाईन अवर्स टू रामा’ प्रदर्शित झाला. त्याचे दिग्दर्शन मार्क रॉबसन यांनी केले होते. गांधीजींची हत्या होण्यापूर्वीच्या काही तासांचे चित्रण या चित्रपटात करण्यात आले आहे. हत्या रोखण्यासाठी पोलिसांनी केलेले प्रयत्न असे काल्पनिक कथानक यात उभे करण्यात आले आहे . हा चित्रपट स्टॅनले वोल्पर्टच्या नाईन अवर्स टू रामा असेच शीर्षक असलेल्या कादंबरीवर आधारित आहे.

१९६८ साली, गांधींच्या जीवनावर ‘महात्मा: लाइफ ऑफ गांधी, १८६९-१९४८’ नावाचा एक माहितीपट तयार करण्यात आला होता. या माहितीपटाचे दिग्दर्शन विठ्ठलभाई झवेरी यांनी केले होते. या चित्रपटाची निर्मिती गांधी नॅशनल मेमोरियल फंडने भारत सरकारच्या चित्रपट विभागाच्या सहकार्याने केली होती.

अधिक वाचा: स्त्रियांचे अश्रू पुरुषांमधील आक्रमकता खरंच कमी करतात? काय सांगते नवीन वैज्ञानिक संशोधन…

गांधीजींचे जगभरातील काही प्रसिद्ध आणि जुने पुतळे

१. योगी परमहंस योगानंद यांनी १९५० साली लेक श्राइन , कॅलिफोर्निया येथे अमेरिकेत गांधी वर्ल्ड पीस स्मारक बांधले. हे “महात्मा गांधींच्या सन्मानार्थ उभारले जाणारे जगातील पहिले स्मारक” होते. या स्मारकावर एक हजार वर्षे जुने चिनी सारकोफॅगस ठेवण्यात आले आहे, सारकोफॅगसच्या आत गांधीजींच्या अस्थींचा काही भाग ठेवण्यात आला होता.

२. युरोपमधील महात्मा गांधींच्या सर्वात जुन्या पुतळ्यांपैकी एक पुतळा Park Marie Josee (Commune of Molenbeek in Brussels houses) मध्ये आहे. बेल्जियममधील भारतीय दूतावासाच्या वेबसाइटवरील माहितीनुसार, प्रसिद्ध बेल्जियम कलाकार रेने क्लिकेट यांनी साकारलेला हा पुतळा गांधीजींच्या १०० व्या जयंतीनिमित्त १९६९ साली स्थापित करण्यात आला होता.

३. तत्कालीन पंतप्रधान हॅरॉल्ड विल्सन यांच्या हस्ते १७ मे १९६८ रोजी लंडनमधील टॅविस्टॉक स्क्वेअरमधील statue of “UCL alumnus या महात्मा गांधींच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यूसीएलए वेबसाइटनुसार , ब्रिटिश शिल्पकार फ्रेडा ब्रिलियंट यांनी तयार केलेली ही शिल्पकृती १९६७ साली ब्रिटनमधील भारतीय उच्चायुक्तांनी लंडनला भेट म्हणून दिली आणि तिचे अनावरण विल्सन यांनी केले होते.

४. आफ्रिकेतील जिंगा, युगांडा येथे नाईल नदीच्या उगमस्थानाजवळ गांधींचा पुतळा उभारण्यात आला होता. या संदर्भातील वृत्तानुसार , १९४८ साली महात्मा गांधींच्या अस्थींचा काही भाग युगांडातील नाईलसह जगातील अनेक प्राचीन नद्यांमध्ये विसर्जित केला गेला. नाईल नदीच्या त्याच उगमस्थानाजवळ स्मारक उभे आहे. हा पुतळा १९९७ साली स्थापन करण्यात आला होता.

एकूणच १९८२ साली प्रदर्शित झालेल्या गांधी चित्रपटापूर्वी जगात अनेक ठिकाणी गांधीजींचे पुतळे उभारण्यात आले होते आणि त्यांच्या आयुष्यावर आधारित अनेक चित्रपटही जगभरात प्रसारित झाले होते.