२०१४ साली भाजपाप्रणित एनडीए आघाडीने बहुमत प्राप्त करत सत्ता स्थापन केली. २०१४ आणि २०१९ अशा दोन्ही निवडणुकींमध्ये भाजपाला बहुमत प्राप्त झाले. मात्र, २०२४ ची लोकसभा निवडणूक अनेक अर्थाने वेगळी ठरली आहे. या निवडणुकीमध्ये भाजपाला स्वबळावर बहुमत प्राप्त करता आलेले नाही. नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान पदावर बसण्यासाठी एनडीएतील घटक पक्षांवर अवलंबून रहावे लागणार आहे. या निवडणुकीमध्ये, एकीकडे एनडीए आघाडीच्या जागा घटल्या असून इंडिया आघाडीच्या जागांमध्ये चांगली वाढ झाली आहे. या निवडणुकीच्या आधीच एनडीए आघाडीचे अनेक घटक पक्ष भाजपाची साथ सोडताना दिसून आले. त्यामध्ये प्रामुख्याने पंजाबमधील शिरोमणी अकाली दल (२०२० मध्ये एनडीएतून बाहेर) आणि फूट न पडलेल्या शिवसेनेचा (२०१९ मध्ये एनडीएतून बाहेर) समावेश होता.

हेही वाचा : मायावतींच्या बसपाला उतरती कळा; मतदारांनी का नाकारलं?

Loksatta editorial uk elections kier starmer rishi sunak labour conservative party
अग्रलेख: मजुरोदय!
Online Scrutiny and Faceless Assessment System tax professional
आयकराच्या ‘बिनचेहरा’ योजनेचे भलेबुरे चेहरे!
Keir Starmer
ब्रिटनमध्ये मजूर पक्षाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार… कीर स्टार्मर!
No religious markers permitted in Indian Army dress regulations
टिळा वा तत्सम धार्मिक प्रतीकांना मनाई; लष्कराने सैनिकांना का करून दिली गणवेश नियमांची आठवण?
Controversy, Shukre commission,
शुक्रे आयोगाला प्रतिवादी करायचे की नाही यावरून वाद, मराठा आरक्षणविरोधी याचिकाकर्त्यांतच मतभेद
joe biden, Can joe biden out of candidacy by Democrats, joe biden, Donald Trump, joe biden vs Donald Trump debate, joe biden disastrous debate vs Donald Trump, Democratic Party, Republican Party, united states of America, usa,
अडखळत्या ‘डिबेट’नंतर बायडेन यांना डेमोक्रॅटिक पक्षाकडून उमेदवारी नाकारली जाऊ शकते का? त्यांना पर्याय कोण?
West Bengal Congress high command TMC Left Parties in Bengal
तृणमूल आणि डाव्यांच्या मध्ये काँग्रेस कोंडीत; पश्चिम बंगालमधील अस्तित्वासाठी काँग्रेस काय घेणार भूमिका?
Action on fake Kunbi certificates All party meeting to decide on issues of OBC
खोट्या कुणबी प्रमाणपत्रांवर कारवाई; ओबीसींच्या प्रश्नांवर सर्वपक्षीय बैठकीत निर्णय

१८ जुलै २०२३ रोजी एनडीए आघाडीने बैठक घेऊन आपल्याबरोबर २८ पक्ष असल्याची घोषणा केली. त्यावेळी इंडिया आघाडीबरोबर १८ घटक पक्ष होते. निवडणुकीआधी तेलुगु देसम पार्टी (टीडीपी), नितीश कुमार यांचा जनता दल (युनायडेट) आणि एआयडीएमकेसारख्या पक्षाने इंडिया आघाडीची साथ सोडली आणि एनडीए आघाडीत जाणे पसंत केले. आता २०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाला बहुमताचा आकडा गाठता आला नसल्याने एनडीए आघाडीला आणि त्यातील घटकपक्षांना पुन्हा एकदा महत्त्व प्राप्त झाले आहे. सायंकाळी ७ वाजेपर्यंत निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, एनडीए आघाडीने २७२ चा जादुई आकडा पार केला असला तरीही भाजपाला फक्त २३९ जागा प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे सत्तास्थापनेसाठी भाजपाला आपल्या घटक पक्षांचा आधार आवश्यक आहे. त्यामध्ये टीडीपी आणि जेडीयू या दोन पक्षांचा वाटा मोठा असणार आहे. दुसरीकडे, एनडीएतील काही घटक पक्षांना आपल्या बाजूने घेण्याचा प्रयत्न इंडिया आघाडीकडूनही केला जाऊ शकतो. अशा पार्श्वभूमीवर एनडीएतील कोणते घटक पक्ष भाजपाबरोबर राहू शकतात आणि कोणते पक्ष भाजपाची साथ सोडू शकतात आणि त्याची कारणे काय, याची माहिती घेऊयात.

तेलुगु देसम पार्टी

टीडीपीने १९९६ साली पहिल्यांदा एनडीएमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी एन. चंद्राबाबू नायडू तरुण नेते होते. २०१८ साली एनडीएची साथ सोडल्यानंतर या पक्षाला मोठा फटका बसला. पक्षाला तेलंगणा विधानसभा निवडणुकीमध्ये फक्त २ तर २०१९ मध्ये झालेल्या आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीमध्ये फक्त २३ जागा मिळाल्या. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टीडीपीने यूपीएमध्ये प्रवेश केला होता. मात्र, टीडीपीने गेल्या फेब्रुवारीमध्ये पुन्हा एकदा एनडीएमध्ये प्रवेश केला. आंध्र प्रदेशमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये १७५ पैकी १३४ जागांवर टीडीपीला विजय मिळाला आहे. या लोकसभा निवडणुकीमध्ये टीडीपीला १६ जागांवर आघाडी मिळाली आहे. त्यामुळे, गेल्या दोन दशकांमध्ये पहिल्यांदाच टीडीपी ‘किंगमेकर’ ठरणार आहे.

दुसरीकडे, इंडिया आघाडीतील नेते चंद्राबाबू नायडूंना आपलेसे करण्याचा प्रयत्न करत असल्याच्या बातम्या येत आहेत. जर त्यांनी सत्तेत येण्यासाठी इंडिया आघाडीला मदत करण्याचे ठरवले तर ते अनेक मंत्रिपदाची अपेक्षा करू शकतात. मात्र, टीडीपी एनडीएबरोबरच राहण्याची दोन मुख्य कारणे आहेत. एक म्हणजे आंध्र प्रदेशमध्ये काँग्रेसला अद्यापही त्यांची गमावलेली लोकप्रियता पुन्हा मिळवता आलेली नाही. दुसरे कारण म्हणजे या निवडणुकीमध्ये टीडीपीने भाजपाबरोबर प्रचार केला आहे. निवडणुकीनंतर भाजपाची साथ सोडणे टीडीपीला राज्याच्या भविष्यातील राजकारणात आणि राष्ट्रीय राजकारणातही महाग पडू शकते.

जनता दल (युनायडेट)

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे राजकारण अविश्वासार्ह मानले जाते. त्यांनी याआधी अनेकदा एनडीए आणि इंडिया आघाडीमध्ये उड्या मारल्याने त्यांना ‘पलटूराम’ असेही संबोधले जाते. एकेकाळी पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून नितीश कुमार यांच्याकडे पाहिले जात होते. मात्र, कालांतराने त्यांची विश्वासार्हता कमी होत गेली. नितीश कुमार अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये रेल्वे मंत्री राहिले होते. मात्र, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीआधी नितीश कुमार यांनी एनडीएला रामराम केला.

२०१५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये राजद, जेडीयू आणि डाव्या पक्षांच्या आघाडीने दमदार कामगिरी करत भाजपाला आस्मान दाखवले. मात्र, लालू प्रसाद यादव यांच्या राजद पक्षाबरोबर वारंवार खटके उडाल्यानंतर त्यांनी २०१७ मध्ये युतीतून बाहेर पडणे पसंत केले. त्यानंतर ते २०२२ मध्ये पुन्हा राजदबरोबर आले आणि आता २०२४ मध्ये ते पुन्हा एनडीए आघाडीमध्ये सामील झाले आहेत.

त्यांनी वारंवार आपली निष्ठा बदलल्यामुळे त्यांच्याबद्दलची विश्वासार्हता संपल्याचे चित्र आहे. मात्र, तरीही या लोकसभा निवडणुकीमध्ये जेडीयूला १२ जागा प्राप्त झालेल्या असल्यामुळे ते ‘किंगमेकर’ ठरणार आहेत. कदाचित ते स्वत:ही ‘किंग’ होऊ शकतील, इतपत महत्त्व त्यांना आता प्राप्त झाले आहे. एनडीएमधील घटक पक्षांमध्ये जेडीयू हा तिसरा सर्वांत मोठा पक्ष आहे. त्यामुळे त्यांच्याशिवाय भाजपाला सत्तेत राहणे अवघड आहे. दुसरीकडे, सत्तास्थापनेसाठी इंडिया आघाडीने त्यांचा पाठिंबा मागितल्यास ते त्यांच्याबरोबरही वाटाघाटी करून आपल्या पदरात बऱ्याच गोष्टी पाडून घेऊ शकतात.

हेही वाचा : सत्ताधारी ‘आप’ला पंजाबमध्ये फटका; भाजपा शून्य तर काँग्रेसला ‘इतक्या’ जागांवर आघाडी

लोक जनशक्ती पार्टी (रामविलास)

लोक जनशक्ती पार्टीचे प्रमुख राम विलास पासवान हे भारतीय राजकारणातील ‘हवामानतज्ज्ञ’ म्हणून ओळखले जायचे. निवडणुकीत हवा कुणाच्या बाजूने आहे, हे बरोबर ओळखून ते त्यांच्याबरोबर जायचे. वाजपेयींच्या सत्ताकाळात रामविलास पासवान एनडीए आघाडीबरोबर होते. त्यानंतर मोदी लाट येण्यापूर्वीच हवेचा रोख ओळखून त्यांनी फेब्रुवारी २०१४ मध्ये एनडीएमध्ये पुन्हा प्रवेश केला. लोक जनशक्ती पार्टी पक्षाचा प्रभाव वाढवण्यासाठी ते आपल्या राजकीय अनुभवाचा वापर चतुराईने करायचे. मात्र, त्यांच्या मृत्यूनंतर आता लोक जनशक्ती पार्टी पक्षाचा राजकीय वारसा त्यांचे सुपुत्र चिराग पासवान यांना प्राप्त झाला आहे. ते आपल्या वडिलांचा राजकीय वारसा किती प्रभावीपणे चालवू शकतील, याबाबत साशंकता आहे. या लोकसभा निवडणुकीमध्ये लोक जनशक्ती पार्टीला पाच जागांवर आघाडी आहे. आतापर्यंत तरी लोक जनशक्ती पार्टी एनडीए आघाडीबरोबर एकनिष्ठ राहिला आहे. मात्र, सत्तेत येण्यासाठी इंडिया आघाडीला ५ जागा कमी पडू लागल्या तर अधिकाधिक मंत्रिपदे आपल्या खिशात घालून लोक जनशक्ती पार्टी आपली निष्ठा बदलू शकतो.

शिवसेना (शिंदे गट)

शिवसेनेने आजवर भाजपाच्या खांद्याला खांदा लावून हिंदुत्वाचे राजकारण केले आहे. १९८४ साली पहिल्यांदा शिवसेनेने भाजपाबरोबर युती केली. मात्र, २०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेने एनडीएशी फारकत घेतली. २०२२ मध्ये शिवसेनेमध्ये फूट पाडण्यात भाजपाला यश आले. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बहुतांश आमदार आपल्याबरोबर घेत भाजपाबरोबर सत्ता स्थापन केली. सध्या ‘शिवसेना’ हे पक्षाचे नाव आणि ‘धनुष्यबाण’ हे चिन्हदेखील शिंदे गटाकडे गेले आहे. अशीच अवस्था राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचीही आहे. अजित पवार गटाने पक्षाचे नाव आणि चिन्ह दोन्ही मिळवत भाजपाशी संग केला आहे.

या निवडणुकीमध्ये, शिवसेना-शिंदे गटाला सात जागांवर, तर शिवसेना-उद्धव ठाकरे गटाला नऊ जागांवर आघाडी आहे. मात्र, एकनाथ शिंदे गट भाजपाबरोबरच राहण्याची शक्यता अधिक आहे. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या बाजूने असलेली सहानुभूती आणि लोकसभा निवडणुकीत केलेली दमदार कामगिरी पाहता त्यांची साथ सोडून गेलेले अनेक नेते त्यांच्याकडे परतण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

रालोद आणि जेडीएस

एकेकाळी विरोधकांच्या आघाडीत असणारे हे दोन्हीही पक्ष आता एनडीए आघाडीबरोबर आहेत. उत्तर प्रदेशमधील राष्ट्रीय लोक दल आणि कर्नाटकमधील जनता दल (सेक्यूलर) या दोन पक्षांनी भाजपाबरोबर निवडणूक लढवली आहे. या दोन्हीही पक्षांना प्रत्येकी दोन जागांवर आघाडी आहे. त्यांना काही फायदा होत असल्यास ते इंडिया आघाडीची वाट धरू शकतात.