तंत्रजगताला नवी दिशा दाखवेल, अशा क्रांतिकारी नाविन्यपूर्ण तंत्रसंकल्पनांचे व्यासपीठ म्हणून ॲपलच्या सप्टेंबरमधील वार्षिक सोहळ्याकडे पाहिले जाते. स्टीव्ह जॉब्स यांनी सुरू केलेली ही परंपरा त्यांच्या पश्चात टिम कुक यांनी पाळली. परंतु, ती केवळ इव्हेंटपुरतीच. कारण गेल्या काही वर्षांत ॲपलच्या इव्हेंटमधील नाविन्य किंवा नवीन तंत्राविष्काराचा अभाव प्रकर्षाने जाणवू लागला आहे. अन्य स्पर्धक कंपन्यांच्या उत्पादनांत आधीपासून असलेल्या वैशिष्ट्यांना गुणवत्तापूर्ण बदलांचे वेष्टन चढवून ॲपलच्या उत्पादनांत आणण्यात आल्याची अनेक उदाहरणे अलिकडच्या इव्हेंटमधून दिसतील. कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा स्मार्टफोनमध्ये अंतर्भाव हे त्यापैकीच एक. स्पर्धक कंपन्यांचे स्मार्टफोन आधीच ‘एआय’ने स्मार्ट झाले असताना ‘ॲपल इंटेलिजन्स’ची घोषणा यंदाच्या ॲपलच्या इव्हेंटमध्ये झाली. याचा किती प्रभाव ॲपलच्या वापरकर्त्यांवर आणि ग्राहकांवर पडणार, यावर ॲपलचे गणित अवलंबून राहणार आहे.

ॲपलच्या इव्हेंटचे बदलते स्वरूप…

ॲपलचा वार्षिक सोहळा म्हणजे खरेतर त्या कंपनीच्या उत्पादनांचे सादरीकरण किंवा घोषणेचे व्यासपीठ. कंपनीचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांनी या सोहळ्यांना सुरुवातीपासूनच एक उंची गाठून दिली. आपण जे काही निर्मिले ते सर्वसामान्य ग्राहकाला सहजसोप्या शब्दांत आणि रंजकपणे खुलवून सांगण्याची जॉब्स यांनी खुबी साऱ्यांनाच भावली आणि ते एक समीकरणच बनले. पूर्वी वर्षात कधीही होणाऱ्या या सोहळ्याचेही जॉब्स यांनी एक वेळापत्रक बनवले आणि साधारणपणे ऑगस्ट-सप्टेंबरच्या दरम्यान हे सोहळे पार पडू लागले. नवीन आयफोनची घोषणा, त्याखेरीज नवीन उत्पादनांचे सादरीकरण, जोडीला जॉब्स यांचे व्याख्यान या साच्यात ॲपलचा वार्षिक सोहळा रंगू लागला. तंत्रजगताला दिशादर्शक ठरणाऱ्या किंवा उत्पादन वापराची नवी क्रांती घडवणाऱ्या उत्पादनांच्या घोषणेची उत्कंठा ॲपलचे ग्राहकच नव्हे तर एकूण तंत्रज्ञान क्षेत्राला असायची. मात्र, जॉब्स यांच्या निधनानंतर या कार्यक्रमांचे वलय काहीसे कमी झाले. विद्यमान सीईओ टिम कुक यांनी ती परंपरा कायम राखली. कंपनीच्या उत्पादनांमध्येही सातत्याने नवनवीन बदल आणि सुविधा येत राहिल्या. मात्र, गेल्या काही वर्षांत या सोहळ्यांचे जागतिक आकर्षण कमी झाले आहे, हे नक्की.

Kirit Somaiya
Kirit Somaiya : “मला न विचारताच घोषणा”, किरीट सोमय्यांनी भाजपाचा आदेश धुडकावला; म्हणाले, “पुन्हा अशी वागणूक…”
10th October Rashi Bhavishya In Martahi
१० ऑक्टोबर पंचांग: गुरुची वक्री चाल तर महागौरी…
god of chaos asteroid
काय आहे ‘God of Chaos’? अंतराळातील या अशनीचा पृथ्वीला धोका किती? शास्त्रज्ञ चिंतेत असण्याचे कारण काय?
oil and gas reserves found in the sea of ​​Pakistan how equation can change for Pakistan
पाकिस्तानच्या समुद्रात आढळला प्रचंड खनिज तेलसाठा? उत्खननाची क्षमता किती? उद्ध्वस्त अर्थव्यवस्थेची भाग्यरेखा बदलेल?
LokPoll Survey Results in Maharashtra
LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…
abrosexuality
‘Symbiosexual’नंतर आता ‘Abrosexual’ची चर्चा; काय आहे ही नवीन लैंगिक ओळख?
loksatta editorial on union minister nitin gadkari says no more subsidies on electric vehicles
अग्रलेख : विजेला धक्का
Nitin Gadkari
Nitin Gadkari : १९०० कोटींमध्ये रस्ता बांधून ८००० कोटी टोल का वसूल केला? नितीन गडकरींना थेट प्रश्न, हिशेब सांगत म्हणाले…

आणखी वाचा- काय आहे ‘God of Chaos’? अंतराळातील या अशनीचा पृथ्वीला धोका किती? शास्त्रज्ञ चिंतेत असण्याचे कारण काय?

यंदाच्या सोहळ्यात काय?

यावर्षीचा ॲपलचा इव्हेंट ९ सप्टेंबर रोजी कॅलिफोर्नियातील कूपरटिनो येथील ॲपल पार्कमधील स्टीव्ह जॉब्स थिएटरमध्ये पार पडला. यात कंपनीने आयफोन १६, १६ प्लस, १६ प्रोसह आयपॅड १६, एअरपॉड्स ४, आय वॉच सीरिज १०ची घोषणा केली. ६.१ इंच आकाराचा डिस्प्ले, ४८ मेगापिक्सेलचा कॅमेरा, १२ मेगापिक्सेलची टेलिफोटो लेन्स, फोनच्या कडेला कॅमेरा नियंत्रणासाठी खास बटण, अद्ययावत ए-१८ प्रोसेसर, अधिक क्षमतेची बॅटरी अशी आयफोन १६ची वैशिष्ट्ये आहेत. कॅमेरा बटण हे नवीन आयफोनचे प्रमुख वैशिष्ट्य ठरू शकते. या बटणाच्या माध्यमातून स्क्रीनला टच न करता कॅमेरा हाताळणे सोपे होणार आहे. एअरपॉड्स ४मध्ये ॲपलने वापरकर्त्यांच्या श्रवणक्षमतेला हानी पोहोचणार नाही, अशा तऱ्हेने संगीत ऐकण्याचा आनंद देणाऱ्या तंत्रज्ञानाचा अवलंब केला आहे. त्याचप्रमाणे आयवॉचमध्ये सध्याच्या जीवनशैलीशी संबंधित निद्रानाशासारख्या विकारांची नोंद ठेवणाऱ्या तंत्रज्ञानाचा अंतर्भाव करण्यात आला आहे. याखेरीज ॲपलने आयओएस १८ या नवीन ऑपरेटिंग सिस्टीमचीही घोषणा केली असून ॲपल इंटेलिजन्सने युक्त अशी कार्यप्रणाली हे यंदाच्या सोहळ्याचे प्रमुख वैशिष्ट्य मानावे लागेल.

ॲपल इंटेलिजन्स काय आहे?

ॲपलच्या उत्पादनांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याची सुविधा ॲपल इंटेलिजन्समुळे उपलब्ध होणार आहे. ‘न्यू इरा टू सिरि’ अर्थात सिरिचे नवे पर्व या नावाने ॲपलने कृत्रिम बुद्धिमत्तेचा आयफोनसह अन्य उत्पादनांमध्ये वापर केला आहे. यावर्षीच्या सुरुवातीला झालेल्या जागतिक डेव्हलपरच्या परिषदेत ॲपलने आपल्या ‘एआय’ची घोषणा केली होती. त्यानुसार ॲपल इंटेलिजन्स कार्य करणार आहे. सध्याच्या ॲप आणि वैशिष्ट्यांमध्ये सुधारणा घडवून आणणारे हे तंत्रज्ञान असेल. या तंत्रज्ञानाच्या साह्याने सिरि वापरकर्त्याच्या मेलबॉक्समधील ईमेलही शोधून देऊ शकेल तसेच प्रत्येक ईमेलचा सारांश वापरकर्त्याला उपलब्ध करून देऊ शकेल. याखेरीज वापरकर्त्याच्या सवयीनुसार ॲपची मांडणी, नोटिफिकेशनची रचना या माध्यमातून होईल. शिवाय ‘एआय’ छायाचित्र निर्मितीसह संदेशाचे मसुदे तयार करणे, वेगवेगळ्या इमोजी बनवून देणे या सुविधाही ॲपल इंटेलिजन्समुळे उपलब्ध होणार आहेत. विशेष म्हणजे, हे सर्व करताना वापरकर्त्याची कोणतीही गोपनीय माहिती अगदी ॲपललाही समजू शकणार नाही, असा कंपनीचा दावा आहे.

आणखी वाचा-‘Symbiosexual’नंतर आता ‘Abrosexual’ची चर्चा; काय आहे ही नवीन लैंगिक ओळख?

ॲपलचे वरातीमागून घोडे?

ॲपल इंटेलिजन्सची महती मांडताना टिम कुक यांनी हे तंत्रज्ञान स्मार्टफोनची उपयुक्तता सध्याच्या मर्यादेपलिकडे घेऊन जाईल, असा दावा केला आहे. ॲपल इंटेलिजन्समुळे आयफोन अधिक स्मार्ट होणार हे निश्चित आहे.परंतु, कृत्रिम बुद्धिमत्तेचा स्मार्टफोनमध्ये वापर करणारी ॲपल ही पहिलीच कंपनी नाही. उलट अनेक कंपन्यांनी आपल्या स्मार्टफोनमध्ये आधीपासूनच ‘एआय’चा वापर केला आहे. अशा वेळी ॲपल इंटेलिजन्सचे आकर्षण अँड्रॉइड वापरणाऱ्यास वाटण्याची शक्यता कमीच आहे. त्यातही सध्या ॲपल इंटेलिजन्स आयफोनच्या १५ आणि १६ या आवृत्त्यांमध्येच असणार असून त्यांच्या किमती अद्याप सामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. त्यामुळे आपल्या उत्पादनांच्या विक्रीविस्ताराचे ॲपलचे गणित यातून कसे जुळणार हा प्रश्नच आहे. ॲपलच्या उत्पादनांची विशेषत: आयफोनच्या विक्रीत गेल्या काही महिन्यांत घट झाल्याचे पाहायला मिळाले आहे. एकीकडे भारतासारख्या देशात आयफोनच्या ग्राहकांची संख्या वाढत असताना अन्य देशांत विक्रीचा वेग मंदावल्याचे पाहायला मिळते. अशा स्थितीत ॲपल इंटेलिजन्समुळे आयफोनबद्दलचे आकर्षण किती वाढणार, यावर ॲपलची प्रामुख्याने भिस्त असेल.