Ganesh Chaturthi 2022: गणेश चतुर्थी ३१ ऑगस्ट रोजी साजरी केली जात आहे. या दिवसापासून गणेशोत्सवाला सर्वत्र सुरुवात होईल आणि गणपती प्रत्येकाच्या घरी विराजमान होतील. गणेशोत्सव जवळपास देशभर साजरा होत असला तरी महाराष्ट्रात गणपती धुमधडाक्यात साजरा केला जातो. महाराष्ट्रातील गणपतीची पूजा खूप प्रसिद्ध आहे. गणेशोत्सवाला हजेरी लावण्यासाठी लोक ठिकठिकाणाहून महाराष्ट्रात पोहोचतात. गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा सण आहे. महाराष्‍ट्राच्‍या अनेक शहरांत भव्य गणपती मंडप आयोजित केले जातात. गणपती उत्सवात हजेरी लावण्यासाठी दूरदूरहून लोक महाराष्ट्रात येतात. यावेळी तुम्हालाही गणेशोत्सव थाटामाटात साजरा करायचा असेल तर तुम्ही देशातील प्रसिद्ध गणपती मंडळ बघू शकता. सर्वसामान्यांपासून ते दिग्गज सेलिब्रिटीही या गणपती मंडळ सहभागी होतात. देशातील सर्वात भव्य गणपती मंडळबद्दल जाणून घेऊया, तुम्ही या वर्षीच्या गणेशोत्सवाला भेट देऊ शकता.

मुंबईचा ‘लालबागचा राजा’

लालबाग बाजार, जीडी गोएंका रोड, मुंबई येथे सर्वात प्रसिद्ध गणेश मंडळ सजतो. या मंडळाला ‘लालबाग चा राजा’ म्हणतात. मुंबईतील लालबागच्या राजाच्या या मंडळाला दरवर्षी लाखो भाविक भेट देतात. १९३४ पासून येथे गणपतीची मूर्ती बसवली जात आहे. या गणपतीच्या मंडळामध्ये विराजमान असलेल्या गणेशाला नवसाचा गणपतीही मानले जाते. गणेशोत्सवाला हजेरी लावण्यासाठी अनेक सेलिब्रिटीही येथे येतात.

(हे ही वाचा: Ganesh Chaturthi: गणेश चतुर्थीला गणपतीची पूजा केल्याने ‘हे’ ग्रह होतात शांत; जाणून घ्या)

गणेश गल्ली मुंबईचा राजा

‘मुंबईचा राजा’ हे मुंबईतील गणेश गल्ली आणि लेन येथे वसलेले आहे. लालबागच्या राजापासून हाकेच्या अंतरावर हे मोठे गणपती मंडळ आहे. हे देखील मुंबईतील प्रसिद्ध मंडळपैकी एक आहे. १९२८ मध्ये गिरणी कामगारांसाठी हा गणपती मंडळ सुरू करण्यात आले होते. गणेश गली मुंबईचा राजा येथे दरवर्षी थीमवर आधारित गणेश मंडळाचे आयोजन केले जाते.

अंधेरीचा राजा

गणेशोत्सवात मुंबईच्या गणपती मंडळमध्ये अंधेरीचा राजा प्रसिद्ध आहे. १९६६ पासून येथे गणपती मंडळचे आयोजन केले जात होते. येथील १० दिवसांच्या गणेशोत्सवात अनेक सेलिब्रिटी हजेरी लावतात. अंधेरीचा राजा गणपती मंडळाची सजावट अतिशय सुंदर आणि मंत्रमुग्ध करणारी आहे.

( हे ही वाचा: Ganesh Chaturthi 2022: गणेश चतुर्थीला घरात ‘या’ प्रकारच्या मूर्तीची स्थापना करा, मानले जाते शुभ)

GBS सेवा मंडळाचा गणपती

मुंबईचा सुवर्ण गणेश म्हणून प्रसिद्ध असलेल्या GBS सेवा मंडळाचा गणपतीही खूप प्रसिद्ध आहे. येथील गणपतीची मूर्ती खऱ्याखुऱ्या सोन्याच्या दागिन्यांनी सजलेली असते. हे शहरातील सर्वात श्रीमंत मंडळ मानले जाते. वडाळ्यातील कटक रोडवरील द्वारकानाथ भवन येथे जीबीएस सेवा मंडळाचा गणपती आहे. गणेश उत्सवाच्या १० दिवसांत २४ तास विधी केले जातात, असा हा एकमेव पंडाल आहे. इथली सजावट आणि संगीत दोन्ही खास आहेत.

खेतवाडीचा राजा

गणेशोत्सवाच्या उत्सवात खेतवाडीचा राजाला देखील भेटू शकता. या मंडळाची स्थापना १९५९ मध्ये झाली. या मंडळाची विशेष बाब म्हणजे येथील गणेशमूर्तीचा आकार वर्षानुवर्षे सारखाच आहे. हाच मूर्तीकार वर्षानुवर्षे गणपतीची मूर्ती बनवत आहे.