29 October 2020

News Flash

दिल्ली पहिल्या क्रमांकावर, RCBची मोठी झेप

चेन्नईचा संघ तळाशी

IPL 2020 Point Table : आयपीएल २०२० च्या १६ सामन्यात दिल्लीने कोलकाता संघाचा १८ धावांनी पराभव केला. या हंगामात दिल्लीचा हा तिसरा विजय आहे. या विजयासह गुणतालिकेत दिल्लीचा संघ पहिल्या क्रमांकावर पोहचला आहे. याआधी तीन विजयासह आरसीबी पहिल्या क्रमांकावर होती. मात्र, नेट रनरेटच्या आधारावर दिल्ली अव्वल स्थानावर विराजमान झाली आहे. आरसीबीचा नेटरनरेट मायनसमध्ये आहे तर दिल्लीचा प्लसमध्ये. त्यामुळे दिल्ली पहिल्या क्रमांकावर तर आरसीबी दुसऱ्या स्थानावर आहे.

शनिवारी झालेल्या पहिल्या सामन्यात आरसीबीने राज्यस्थानचा आठ विकेटने पराभव करत अव्वल स्थानावर झेप घेतली होती. दिल्लीच्या सामन्यानंतर आरसीबीचा संघ दुसऱ्या स्थानावर घरसला आहे. दिल्ली आणि आरसीबीचे अनुक्रमे ६-६ गुण आहेत. मात्र, दिल्लीचा रन रेट +0.588 आहे तर आरसीबीचा नेट रन रेट -0.954 आहे.

तिसऱ्या क्रमांकावर असणारा कोलकाता संघ पराभवानंतर पाचव्या स्थानावर घसरला आहे. कोलकाता संघाचा नेट रन रेटही मायनसमध्ये आहे. कोलकाताच्या पराभवाचा फायदा मुंबईला झाला आहे. मुंबई चार गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आहे. सनराइजर्स हैदराबाद चौथ्या तर कोलकाता पांचव्या आणि राजस्थान रॉयल्स सहा स्थानावर विराजमान आहे. या कोलकाता, हैदराबाद आणि राज्यस्थान संघाचा नेट रन रेट मायनसमध्ये आहे.

गुणतालिकेत सर्वात तळाला धोनीची चेन्नई सुपरकिंग्ज आहे. चार सामन्यात तीन पराभवासह चेन्नई आठव्या स्थानावर आहे. तर पंजाब सातव्या स्थानावर आहे. २०१४ पासून पहिल्यांदाच चेन्नई संघ तळाशी पोहचला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 4, 2020 10:38 am

Web Title: ipl 2020 delhi capitals reach number one in point table after beating kolkata nck 90
टॅग IPL 2020
Next Stories
1 Video: ‘गब्बर’ स्टाईल! पाहा शिखर धवनने घेतलेला भन्नाट झेल
2 IPL 2020 : पराभवाची कोंडी फोडण्याचे चेन्नई-पंजाबपुढे आव्हान
3 Video: सुपरहिट अय्यर! तुफान फटकेबाजी करत मिळवलं दिग्गजांच्या पंगतीत स्थान
Just Now!
X